माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या क्लायंटचे काम करणारा नट ओळखीचा वाटला, पण नाव माहीत नाही आणी कुठल्या सिनेमात/ सिरीयल मध्ये काम त्याने केलय ते पण आठवेना.

समिधा सांगते गॅरीला लग्न करायला सांग आणी राधिकाला घटस्फोट द्यायला सांग>>> छान Angry आता समिधाला तिच्या नवर्याने घटस्फोट दयावा.

जेनीने मस्त काम केले. मुळात म्हणजे ती कार्पोरेट मध्ये काम करणारी प्रोफेशनल म्हणून एकदम शोभते >>> +११११११११

वाटलं होतं की चांगला चान्स आहे त्या कंपनीच्या बद्दल कळायला, काय ईकतात, काय करतात, पण presentation चं नाव काढलं आणि गेला फोकस दुसरीकडे च Lol

जेनी पुढचं पाऊल मध्येे होती का. आत्ता लागलंय पुपा जुना एपि आणि बहुतेक ती जेनीच आहे साडीमध्ये. हो तीच आहे आणि तिच्या पात्राचं नाव रूपा आहे. निगेटीव आहे वाटतं तिचा रोल.

हो तीच ती पुढचं पाऊल मधली रुपाली म्हणजे जेनी. कल्याणीची मोठी जाऊ नि रोहित (सुयश टिळक)ची बायको. Happy

शनाया अचानक सभ्य कशी झाली ..मागे एकदा एका भागा मध्ये गुरू शी भांडण करून ..दुसरी कडे interview साठी जाते व त्या बाॕस शी लगट करताना दाखविले आहे job मिळविण्यासाठी ..तेव्हा तो बाॕस तिला तीची जागा दाखवतो ...बोलतो तुला 10000 salary कोणी देणार नाही ..मग परत येते गुरू कडे...लेखक आधीचे भाग विसरला वाटत Uhoh

जेनीने मस्त काम केले. मुळात म्हणजे ती कार्पोरेट मध्ये काम करणारी प्रोफेशनल म्हणून एकदम शोभते >>> +१११११११११ >>> होना मला ही खूप आवडते ..हीच एक आॕफीस मध्ये काम करते बाकीचे फक्त काॕफी पितात..उदा.आनंद ..;) Wink Wink

अरे पण त्या जेनीची पोस्ट काय?? रिसेप्शनिस्ट ना?? आणि तिला डील क्रॅक (झीच्या भाषेत Wink ) करायला काय पाठवतात?? कार्पोरेट ऑफिस ना यांच?? कोणीही उठून काहीही काम करत यांच्याकडे.. उद्या त्या रघूभाओजीलाही पाठवतील डील क्रॅक करायला.

Biggrin
नाही गं चिंचे, ती राधाक्का म्हणते म्हणून लिहिलं तसं.
मला आधी त्या रघूचं नाव पण आठवेना सिरियल बघत नसल्यामुळे. Happy

एकूणच खुप नवथर दिग्दर्शक असावा.
लेखक तर जवळ जवळ रोज बदलतो.

नुकत्याच कॉलेजात आलेल्या मुलांनी एकांकीका करावी तसा एकूण सेट अप आहे.
व्हॅम्पनी छोटेच कपडे घालावेत, केस उडवावेत, चोरटेपणा दाखवताना गरागरा डोळे फिरवावेत ....... किती क्लिश्ये
ते आनंद, जेनी पानवल्कर मिटींग.... तिथे चोरून ऐकणारी व्यक्ती ... सगळ दुरदर्शनच्या काळातल वाटतं.
सगळ्यांचा अभिनय द्यानदीप मधला तर ती समिधा निव्वळ आमची माती आमची माणस मधली आहे.

मला तं ना असे वाटुन र्‍हायले की त्या लेखकाला आणी त्या भैताड गुरुलाच कुट कुट कुटावे.Slapping

सारे फसाद की जड येहीच दो येडे हय.Tearing hair

कपूरसरांनी गुरु आणी शन्याला सगळ्यांसमोर झापले आणी शन्याला सस्पेंड केले. यामुळे गुरुबाळ व शन्या दोघे या समजुतीत आहेत की राधिकाच या मागे आहे. त्यामुळे गुरुबाळ जाम पिसाळलयं आणी कपूर सरांचा बदला घेणारे.

समिधा सांगते गॅरीला लग्न करायला सांग आणी राधिकाला घटस्फोट द्यायला सांग>>>> आधि इशाने हाच सल्ला दिला होता. तेव्हा शन्या म्हणते कि मला लग्नच करायचे असेल तर मी माझ्या वयाच्या मुलाशी करेन. तेव्हा इशा सांगते कि फक्त लग्न करणार असे सांग कारण राधाक्का तर सोडचिठ्ठी देणार नाही आणि तोपर्यंत तुला गुरुच्या पैश्यावर मजा करता येईल.

रश्मी स्माईलीज मस्तच. गुरूला का मारताय पण, तो तरी काऊन त्या भैताड राधिकाला सहन करेल. कपूर सरळ सरळ राधिकाला ते मसाले कुटायचं काम का देत नाही.

चंपा, बहुतेक कपूर सरांचा तोच इरादा आहे, ते तिला कॉन्ट्रॅक्ट द्यायच्या विचारात आहेत, पण हे सगळं गुरुचा एक चेला चोरुन ऐकतो व गुरुला सांगतो. कारण त्याला असे वाटते की गुरु आपल्यावर खुश होऊन प्रमोशन देईल. मी कालचा भाग पाहीला नाही. मला टेन्शन आले की मी ३-४ दिवस कुठलेच भाग बघत नाही, मग इस्टोरी पुढे सरकली की मजा पहायची.

अंजू, चंपा धन्यवाद स्माईलींबद्दल.Ice Skater

मी कालचा भाग पाहीला नाही. मला टेन्शन आले की मी ३-४ दिवस कुठलेच भाग बघत नाही, मग इस्टोरी पुढे सरकली की मजा पहायची. ))))) .....मी ही तेच करते सध्या "हतोतेरेआहे " बरी वाटते .. टेंशन फ्री ...;) Wink Wink

ही राधिका कुठलाही बिझीनेस करण्याच्या लायकीची नाही. १०००० चे मसाले सॅम्पल्स म्हणून फुकटं.

त्यातल्यात कपूरला डोक असावं असा काल संशय आला.

"त्या लेखकाला आणी त्या भैताड गुरुलाच कुट कुट कुटावे.." तुला माहीतेय का की लेखकाच नाव गुरू आहे?
तो सल्ले देणारा फोटोग्राफर मित्र.

हो, लेखकाचे नाव अभिजीत गुरु आहे. बहुतेक त्याच्या ( लेखकाच्या ) मनात कुठलीतरी सुप्त ईच्छा असेल म्हणून त्याने ती या कथेद्वारा मांडली असेल.

त्यामुळे गुरुबाळ जाम पिसाळलयं आणी कपूर सरांचा बदला घेणारे. >>> मग आता काही गुरुच खर नाहिये. गेलीच समजा त्याची नोकरी. Biggrin

१०००० चे मसाले सॅम्पल्स म्हणून फुकटं.>>> रेवतीने हिला इन्टरनेट शिकवल त्याचा काहिच उपयोग केला नाही हिने. Angry

रश्मी, कपूर म्हणतो की राधिकाला असं प्रेझेंटेशन बनवून देऊ की हे काम तिलाच मिळालं पाहिजे. म्हणजे वशील्याचं तट्टूू. मागेही तिला हेच सांंगितलं होतं पण ती नाही म्हणाली होती. मोबाईलवरून तिकीट काढता येतं किंवा स्मार्ट कार्ड तरी वापरायचं, ती रेवती तरी किती आणि काय काय शिकवणार. एवढे मसाले गेले त्याचं काहीच नाही आणि ते गेलेही तिच्याच मूर्खपणामुळे. गॅरी कुठून आणणार होता दीड कोटी. खलबतं आणि खलबत्ता Happy

Biggrin शनाया अगदीच माठ आहे.... खलबत म्हणे गुरु तर.... आय नो धिस वन... खलबत म्हणजे तेच ना असं कुटतात ते..... ? असं विचारलं
अ‍ॅक्शन करुन... मस्त! गुरुला अशी मठ्ठ गर्ल फ्रेंड कशी काय आवडते बुआ. ?...आणि राधिका मात्र अडाणी, गुड फॉर नथिंग....!! काहीही!!

Pages