लेख - आवडता शब्द 'विषय कट'

Submitted by भागवत on 20 November, 2017 - 01:19

असे म्हणतात दर १२ कोसाला भाषा बदलते. शब्दाचे काय आहे पावसाचे पाणी जसे जमिनीत मुरते तसे शब्द आप-आपल्या भाषेत मुरतात. कधी एखाद्या शब्दाने माणसाला वजन प्राप्त होते तर कोणाच्या बाणेदार बोलण्याने शब्दाला धार चढते. शब्दाची श्रीमंती तुमच्या भारदस्त उच्चारात नसून शब्दाच्या आपलेपणात आहे. एखादा विशिष्ट शब्द एखाद्या माणसाची ओळख सुद्धा होऊ शकते.

मी “फास्टर फेणे” परिक्षण या संदर्भात बोलताना चर्चेतून मी बोलता-बोलता सांगीतले की फास्टर फेणे चित्रपट प्रसिद्ध होणार तेव्हा विषय कट. पण नंतर मा‍झ्या लक्ष्यात आले की "विषय कट" हा काही माझा स्वत:चा शब्द नाही. मग लक्ष्यात आले हा शब्द तर मा‍झ्या मित्राचा आवडता शब्द आहे आणि त्याचा कडून मा‍झ्या कडे आला आहे.

माझा मित्र अनिकेत सतत त्याचा बोलण्यात ‘विषय कट’ हा शब्द येतो. कोणत्याही विषयावर चर्चा झाल्यावर किंवा निर्णय झाला की तो बोलतो हे असे-असे ठरले आहे तर विषय कट. दिवसातून असे ८-१० विषय कट तर होतातच. त्याचा वाक्यात 'विषय कट' हा शब्द एका विशिष्ट हेल मध्ये ठासून म्हटला जातो.
"दिमाग खराब” हा एका मा‍झ्या एका नागपूरी मित्राचा आवडता शब्द आहे. माझा मित्रा अभिजीत नागपूरचा आहे त्या सोबत कट्टा वर बोलत असताना जाणवले. त्याचा जि‍भेवर २-३ शब्द हमखास असतात. त्यातला एक म्हणजे कल्ला. हा त्याचा ट्रेड मार्क शब्द आहे. मित्र बोलत असताना किंवा गोंधळ करत असतील आणि तो बाहेरून आला तर त्याचे वाक्य म्हणजे काय कल्ला करताय? तो दिवसातून एवढ्या वेळेस कल्ला शब्दाचा उपयोग करतो त्याचे नावच आम्ही “कल्ला” असे ठेवले आहे. त्याचा दुसरा वाक्य “तुला वाटते सगळी गंमत”. बऱ्याच वेळेस तो हे वाक्य बोलण्याच्या शेवटी जोडून टाकतो. जसे की “भागवत हे सगळे असे आहे आणि तुला वाटते सगळी गंमत.” हा अश्याच भरपूर गंमती-जंम्मती करत असतो. त्याचे ट्रेड मार्क शब्द/वाक्य तो वेगवेगळ्या हेल मध्ये अचूक म्हणतो.माझी हिंदी म्हणजे वेली सारखी आहे. तिचा पाया मराठी असून ती कुठेही वळवावी तिकडे वळते. कधी हिंदी मधील शब्द सापडला नाही तर बिनदिक्कत मराठीचा शब्द उचलून तिथे फिट्ट बसवतो. तर काही वर्षा खाली माझा नकळत ट्रेड मार्क शब्द हिंदी शब्द “ऐसा क्या?” असा होता. मी काहीही झाले तरी माझे ठरलेले बोलायचो 'ऐसा क्या?' मी खूप वेळेस पुनरावृत्ती करत असे. काही दिवसांनी माझे काही मित्र मला 'ऐसा क्या?' एका विशिष्ट आवाजात चिडवायला लागले.

मा‍झ्या एका मित्राला “कडक”, “एक नंबर” हे शब्द वापरायची खूप सवय आहे. एखाद्या गोष्ट त्याचा भाषेत “कडक” म्हणजे खूप चांगली किंवा मस्त असते. त्याने हे दोन शब्द सामाजिक माध्यमात इतक्या वेळेस वापरले की मी स्वत: या शब्दाचा उपयोग कधी पासून करतोय हेच मला कळले नाही. तेव्हा या ब्लॉग वर प्रतिक्रिया देताना या शब्दाचा तुम्ही उपयोग करू शकतो.

एखादा विशिष्ट शब्द एखाद्या प्रदेशाचा असू शकतो. मी पुण्यात नवीन आलो होतो आणि मित्राच्या खोली वर उतरलो होतो. रात्री आम्ही जेवण करून भांडी तशीच बेसीन मध्ये ठेवली होती दुसर्‍या दिवशी स्वयंपाक करण्यासाठी आल्या आणि पसारा पाहून “राडा” शब्द त्याचा मुखातून आला. राडा शब्द पहिल्यांदाच ऐकला होता. पुण्याच्या पेपर मध्ये वाचायचो “गुंडांनी या परिसरात राडा केला” पण इथे पहिल्यांदा “राडा” शब्द आला होता. मग हा सुद्धा शब्द मा‍झ्या बोलण्यात येऊ लागला.

मा‍झ्या मावशीचा आवडता शब्द जागडगुत्ता असा होता. काही मोठी समस्या उत्पन्न झाल्यास आणि फक्त चर्चेत प्रश्नाची भेंडोळीच उरली असतील तर मावशी म्हणायची काय जागडगुत्ता करून ठेवलाय. आधी या दोन शब्दावरून आम्ही मावशीला चिडवायचो. मावशी आज नाही पण आजही जागडगुत्ता शब्द कोणी उचारल्यास मावशीची आठवण येते.

तर तुमचा आवडता शब्द कोणता आहे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

"भैताडपणा" माझा अत्यंत आवडता शब्द आहे... बरेचदा वापरतो आणि मी तो जसे :
१) काही नाही, इथे आम्ही बसलो आहोत निमूट्पणे काम करायला पण आमचे काऊंटर्पार्ट करताहेत ना तिकडे भैताडपणा.
२) ए... ह्याला नीट सांगता येत नाही का रे... नुसता भैताडपणा करत बसतो.
३) भैताडपणा केल्याशिवाय कुठलेच काम जमत नाही का रे तुला ? इ. Lol

प्रतिसादा बद्दल धन्यवाद प्रसन्न हरणखेडकर !!! "भैताडपणा" मस्त शब्द आहे. Lol Lol Lol
"भैताडपणा" माझा अत्यंत आवडता शब्द आहे... बरेचदा वापरतो >> +१

हाहा मस्त लेख आणि धागा..
माझ्या तोंडात बसलेले काही शब्द ..

1) चिरकूट - हा डिप्लोमाला एवढा वापरायचो माझेच नाव चिरकूट पडलेले.

2) घंटा - हा अगदी बालपणीचा शब्द. चुकून घरात दोनचार वेळा वापरला. घरच्यांनी बघितले बघितले आणि एके दिवशी कानफाट फोडून हातात देण्यात आले. बस्स तो दिवस आणि एक आजचा दिवस. फक्त टाईपच केलाय हा शब्द.

3) शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज - याची सवय आपल्या शाहरूखमुळे लागली. चॅट करताना वापरला की पोरी खुश होतात Happy

4) बाई गं.. मी नाही बाई.. बाईबाई.. वगैरे वगैरे - एकुलता एक मुलगा बायकांमध्ये वाढल्याने कधीकधी असले गर्लिश शब्द वापरतो. पण त्याच्याच मागच्या आणि पुढच्या वाक्यात शिव्याही असल्याने कधी कोणी बायल्या म्हणून चिडवले नाही.

5) अरे ही काय कॉमेडी आहे - यातली गंमत म्हणजे प्रत्यक्षात तेव्हा काहीतरी ट्रॅजेडी घडली असते. किंवा आणखी काही घडले असते. पण कॉमेडी घडली नसते.

6) घरी जा - मला कोणाला "नाही" बोलायला आवडत नाही. त्याजागी मी "घरी जा" असे बोलतो.

7) जो मर्द होता है उसे दर्द नही होता - मला काहीही लागले किंवा मी कोणत्याही प्रॉब्लेममध्ये अडकलो की हे एकदा सहज सवयीने बोलून घेतो. हे थ्री ईडियटसमधील "आल ईज वेल" सारखे काम करते आणि मनातील दडपण तसेच वातावरणातील ताण हलका होतो.

क्रमश:
पुढचे नंतर... माझा नंबर आला

ऋन्मेऽऽष प्रतिसादा बद्दल धन्यवाद!!!
चिरकूट, घंटा, शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज,बाई गं.. मी नाही बाई.. बाईबाई.. वगैरे वगैरे, अरे ही काय कॉमेडी आहे,घरी जा, जो मर्द होता है उसे दर्द नही होता >>+1
तुम्ही तर आवडत्या शब्दा ची पोतडीच खोलली.

शीर्षकामुळे आत काय धागा आहे हे वाचकांना स्मजत नाहीये. जर शीर्षकबदल केलात तर ईतर लोकंही ईथे आपल्या आवडीचे शब्द लिहून जातील असे एक वाटते.

ऋन्मेऽऽष प्रतिसादा बद्दल धन्यवाद!!!
उत्सुकता वाढवण्यासाठी शीर्षक शॉर्ट आणि लहान ठेवलंय.
बदल करतो. धन्यवाद!!!

कोल्हापुरात्
विषय संपला- निर्णय झाला
विषय काय - चर्चा कोणती
चालतय की - ठिक आहे.
दिन एक - कानाखाली लाविन
कट्टर- कडक
टिटिएमएम- तुझ-तुझ माझ-माझ अर्थात कॊंट्रिब्युशन
फटफटी- गाडी मग ती कोणतीही असो.
भावा- मित्राला बोलवताना
जिंकलस भावा- स्तुती
कुठायस- फोनवरची सुरुवात.
लई भारी, नादखुळा

मस्त आहे हे.

हे आमचे काही
जाळधूर - एखाद्याने कोठे राडा केला तर. किंवा एखाद्याने अचानक खूप पैसे खर्च केले, बरेचसे अनावश्यक तरीही. एकदम काहीतरी अनावश्यक खर्च, भांडण, आरडाओरडा काहीही करणे

कॅसेट - एखाद्या नाट्यमय प्रसंगाचे डीटेल्ड वर्णन. उदा: "अरे दुपारी पानपट्टीजवळ टाकाटाकी झाली त्याची कॅसेट काय आहे?
*टाकाटाकी - मारामारी.

mr.pandit,फारएण्ड प्रतिसादा बद्दल धन्यवाद!!!
विषय संपला,विषय काय - चालतय की - दिन एक - कट्टर- टिटिएमएम-फटफटी-भावा- जिंकल,लई भारी, नादखुळा >> +१ एक नंबर सगळे शब्द

जाळधूर ,कॅसेट , टाकाटाकी - >> +१ लई भारी शब्द

जाळ अन धूर संगटच