सुखडी / गुळपापडी

Submitted by सायु on 14 November, 2017 - 07:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कणिक = १ वाटी
साजक तुप = १/२ वाटी
गुळ (खीसलेला) = १/२ वाटी

क्रमवार पाककृती: 

गुजराथीत सुखडी तर मराठीत गुळपापडी. गुजराथी लोक प्रसादाला सुखडी करतात.. माझ्या माहेरी शेजार गुज्जु लोकांचा होता.
त्यांच्या कडुनच आई आणि आई कडुन मी शिकले. शेजारी बीना म्हणुन खुप गोड मैत्रीण रहात होती. तीने सुखडी भाजायला घेतली
की आपोआपच पावले शाहा भाभींच्या घरा कडे वळायची... ती सुखडीचं पीठ भाजायची आणि मी त्यांच्या कीचन ओट्या वर बसुन तास न तास गप्पा मारायचे...त्यांच्या कडे गुरवारी उपास असायचा.. मग संध्याकाळची आरती आणि सुखडी चा प्रसाद घेऊनच घरी यायचे..आमच्या कडे आवडते म्हणुन त्या जास्त करायच्या आणि सोबत द्यायच्या.. गोड आठवणी माहेरच्या.. Happy असो..

तर वळु या मुळ कृती कडे..

करायला एकदम सोपी पौष्टीक, अज्जीबात वेळ खाउ नाही आणि पाका बीका ची भानगड नसल्या मुळे हमखास जमणारी ही पाककृती आहे.

कढईत १/२ वाटी तुप तापवायला ठेवा.. मग त्यात १ वाटी कणिक मंद आचे वर गुलाबीसर भाजुन घ्या...बेसनाच्या लाडुच भाजतो तसच..
तुप कमी वाटल तर एक,दोन चमचे तुप वाढवायचे.. पीठ कोरडं नको. छान खमंग भाजुन झाले की कढई गॉस वरुन उतरवुन जरा वेळ
पंख्याखाली ठेवा.. पीठ कोमट असतांना त्यात अर्धी वाटी खिसलेला गुळ घालायचा.. आणि सराट्याने छान कालवुन घ्यायचा...
ताटाला आधी तुप आणि त्यावर हे पीठ पसरवुन सुरीने वड्या कापायच्या.. खुसखुशीत सुखडी तय्यार..

प्रसादाला , किंव्हा मधल्या वेळेत खायला छान पदार्थ. मला आठवतय मी आणि माझी धाकटी बहिण आम्ही गाण्याच्या क्लासला जायच्या आधी
आई आमच्या हातावर दोन दोन सुखड्या ठेवायची.
माझी मुले देखिल तेवढ्याच आवडीने खातात... हल्ली मुलांचा कल ब्रेड , बिस्कीट कडे जास्त असतो..
त्यापेक्षा आपले पारंपारिक , पौष्टीक पदार्थ कीत्ती तरी पटीने चांगले आहेत नाही का!

वाढणी/प्रमाण: 
१ वाटीत १० ते १२ वड्या होतात..
अधिक टिपा: 

पीठ गरम असतांना गुळ घालायचा नाही, कारण गुळ वितळतो आणि मग मिश्रण पातळ होते.. मग वड्या जमत नाही..
मी एका वाटीला अर्धी वाटी गुळ असे प्रमाण सांगीतले आहे.. पण जास्त गोड आवडत असेल तर अर्ध्या च्या ऐवजी पाऊण वाटी गुळ घेऊ शकता.

माहितीचा स्रोत: 
शेजारची जिवलग मैत्रिण बीना.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

सगळ्यांना धन्स...
बेसन सोडून इतर पीठेही वापरता येतील का? प्रयोग करून बघायला हवे.+++ येस्स!! करता येतील की..
नाचणी /शिंगाडा पीठ / राजगीरा पीठ ही वापरु शकतो..

मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त! येक नंबर.

मी कालच करुन पाहिले...जसेच्या तसे प्रमाण घेउन...अत्यंत सुंदर झाली गुळपापडी.
खुप धन्यवाद. आता यात ईतर व्हेरीएशन्स करुन बघीन.
तीळ घालायचे असतील तर ते किती न कधी घालायचे ?

आत्मबंध धन्यवाद..
स्मिता, अरे व्वा करुन पाहिल्यात, छान.. फोटो पण द्यायचा की... पा. कृ आवडल्या बद्द्ल आभार..:)

Pages