त्या आतल्या द्युतीला

Submitted by अनन्त्_यात्री on 15 November, 2017 - 05:19

त्या आतल्या द्युतीला
पाहू कसे? न कळते
-जी सर्वव्यापी ऐसे
स्थलकाल भरुनी उरते

चक्षूस ना दिसे ती
पाळी न नियम कोते
क्षणमात्र लुप्त होते
क्षणि झगमगून उठते

ही तीच का मिती, जी-
-स्पर्शात रंग भरते
-ध्वनितून नव-रसांना
उधळीत गंध होते

Group content visibility: 
Use group defaults