खंत

Submitted by जातस्य on 15 November, 2017 - 13:29

""हो हो हो" करत होते मी तुझ्यावर प्रेम, अगदी जीवापाड करत होते पण तुला ते कधी जाणवलंच नाही" शलाकाचे हे शब्द ऐकून मी स्तब्ध झालो ...............................................................
......................................................................................................................................
गोष्ट आहे ०३.०५.२०१७ ची.... "काय रे असा वाळल्यासारखा का बसला आहेस?" अविनाशने विचारले... "अरे क्लायंट ने भर दुपारी २ वाजता मीटिंग ठेवली आहे यार".... आज भास्कर देवता जरा जास्तच चिडले होते आणि त्यांच्या चिडचिडीचा त्रास अख्या पुण्याला होत होता...त्यात माझी मीटिंग २ वाजता असल्यामुळे सकाळपासूनच माझा त्रागा सुरु झाला..... दुपारी ना जेवताच ऑफिसमधून मागारपट्ट्याला जायला निघालो आणि क्लायंट च्या कंपनी मध्ये पोचेपर्यंत माझा अंगाची लाही लाही झाली होती... रिसेपशन ला गेल्यावर क्लायंट ला फोने लावल्यानंतर कळाले कि २ वाजेची मीटिंग ४ पर्यंत पुढे ढकलली होती... आता तर माझ्या अंगात असलेली उष्णता सगळी डोक्यात गेली आणि मनातल्या मनात क्लायंट ला शिव्या घालत मी रिसेपशनिस्ट ला विचारले "excuse me , will you please help with canteen location ?"..... ती उत्तरली "6th floor".......तिथून माझी कूच ६व्या मजल्याकडे वळली... मी माझा तंद्रीत लिफ्ट कडे निघालो अचानक डोक्यात कोणीतरी टपली मारली...तोंडातून शिवी हासडणार तेवढ्यात समोर शलाका दिसली आणि मी काई बोलणार तेवढ्यात ती ओरडली "तू इथे काय करतोय?" परत मी काही बोलणार तेवढ्यात ती म्हणाली "चल बाहेर जाऊन बोलूयात" आणि माझा हाथ ओढत मला रिसेपशन च्या बाहेर घेऊन अली, जबरदस्तीने मी माझा हाथ सोडवून म्हणालो "अगं मी इथे एका मीटिंग ला आलोय"
ती : टिपिकल सेल्समन दिसतोय.......हाहाहाहाहा...
मी : तू इथे जॉब करतेस?
ती : हो...तुला सांगितलं होता मी पण नेहमीप्रमाणे विसरलास वाटत...
मी : तसं नाही ग... बरं आपण काहीतरी खायचे का? मला जाम भूक लागलीये....
ती : येस्स चला....
आता आम्ही दोघं पण कॅन्टीन मध्ये येऊन बसलो होतो....मी व्हेज थाळी ऑर्डर केली आणि शलाका साठी तिचा आवडीचा चिक्कू जूस सांगितला...
ती : चक्क ३ वर्ष नंतर भेटतोय आपण....
मी : हो ना...बरोबर कॉलेज संपून तीन वर्ष झालीत आता.....
आमची ऑर्डर अली आणि मी जेवायला सुरवात केली..... १० मिनिटे कोणीच काई बोललं नाही.....वातावरण जरा सिरीयस झाले आहे असे कळताच मी बोललो
मी : तुझा साखपुडा झाल्याचा कळलं.....अभिनंदन...
ती : हो एक महिना झाला आणि जानेवारी २०१८ मध्ये लग्न करणार आहोत...
मी : अरे वा...छान....
परत ५ मिनिटे शांतता.....फार awkward वाटत होता...मग तीच बोलली
ती : किती वर्ष झाले आपण भेटून पण तू अज्जुनही तसाच आहेस...थोडा स्मार्ट दिसायला लागला आहेस आणि dressing सेन्स वाढलाय एवढाच...
ती मिश्कीलपणे हसत बोलली....
मी : तसं नाही ग शालू... बऱ्याच गोष्टी चेंज झाल्या आहेत... आता पूर्वीसारखी मजा कुठे राहिली आयुष्यात.....काम एके काम आणि घर एके घर एवढ्यातच गुरफटून बसलाय आता आयुष्य...
ती : ए देवदास का मारतोय.....एवढा काय झालं....मी पण जॉब करतेच...माझा पण घर आहेच कि....मी नाही रडत बसत...
मी : अगं आता आधीसारखा पागलपणा, टूकारगिरी, गमती जमाती नाहीच उरल्या....
ती : मला तर तू आधीसारखाच टुकार आणि पागल दिसतोय...हाहाहाहा.... तसं नसता रे.....येईल सगळं रुटीन वर...
मला थोडा बारा वाटलं आणि आता माझे जोक्स म्हणजे शलाकाच्या भाषेत भिकारचोट जोक्स सुरु झालेत आणि बराच वेळ आम्ही हसत बसलो...
ती : कॉलेज मध्ये असताना आपल्याला सगळे केवढे चिडवायचे ना...सगळीकडे चर्चा अँड ऑल...
मी : सगळ्यांनी आपल्याला एक नाव पडला होता आठवतंय?
ती : उम्म्म्मम्म्म्म
मी : Mr. & Mrs .control panel ...... हाहाहा
ती : हवाच तेवढी होती आपली....अख्खा डिपार्टमेंट कंट्रोल करायचो आपण...
मी : (काहीतरी बोलणार तेवढ्यात शलाका बोलली)....
ती : किती मस्त्या करायचो आपण...नुसते खिदळत असायचो...जिकडे जाऊ तिकडे राडा.......आणि अजून एक म्हणजे तू मला गमतीने मारलेला प्रोपोज...
मी : ते कसा विसरेन मी..... अख्या डिपार्टमेंट समोर प्रोपोज केलं होता तुला आणि तू गमतीने हो पण म्हणाली होतीस.....कडक ऍक्ट झाला होता तो....
ती : तुला कोणी सांगितला कि गमतीत हो म्हणाली होती...मला तर हे पण नव्हता माहित कि तू मला गमतीने प्रपोज करतोय....
........................................................................................
मी कॉफी पिताना अचानक थबकलो आणि विचारले
मी : म्हणजे?

मला सगळं कळलं आहे हे तिच्या लक्षात आल्यावर २ क्षणा नंतर ती बोलली

ती : ""हो हो हो" करत होते मी तुझ्यावर प्रेम, अगदी जीवापाड करत होतेस पण तुला ते कधी जाणवलंच नाही" ......

शलाकाचे शब्द ऐकून मी स्तब्ध झालो....काय बोलावे हेच काळात नव्हते....

ती : मी तुला गमतीने हो म्हणालेच नव्हते ..... नंतर तू बोललास कि अगं शालू गम्मत होती तेव्हा मी पण रागात येऊन बोलले कि मी पण तुला कुठे खरे खरे हो म्हणाले मी पण मस्करी करत होते.....पण खरे सांगायचे झाले तर ती मस्करी नव्हती.......

मी : मग काय होता ते?
ती: तुला ते काय होता हे खरंच कळलं असतं तर आज माझा साखरपुडा कुणा दुसऱ्या व्यक्ती बरोबर झाला नसता.......

माझा तोंडून शब्द फुटत नव्हते....काय बोलावं हे सुचत नव्हता.....

ती : खूप मनापासून प्रेम करायचे तुझ्यावर.....मला पण खूप वेळा असा जाणवला कि तुला पण मी खूप आवडते.....पण काही दिवसांनी कळलं कि तुला जी आवडते ती मी नसून कुणी औरच आहे....आपल्या मित्र मंडळी मध्ये सगळ्यांना माहिती होता कि तू मला खूप आवडतोस....तू कोणालापण विचारलं तर तुला लोक हेच सांगतील कि शलाका तुझ्यावर खूप प्रेम करायची...पण हे तुला सोडून सगळ्यांना कळायचं....
.................
मी फक्त शांत बसून तिचा ऐकत होतो आणि माझा रडकुंडीला आलेला चेहेरा बघून ती पण बोलायची थांबली

ती : अरे तू काळजी नको करुस आता मी सावरले आहे आणि माझा आयुष्यात खुश आहे...तू पण विचार ना करता खुश राहा एवढाच.......मनातला बोलल्यावर मला अजून बरं वाटतंय....

माझा फोन वाजला आणि अचानक मी भानावर आलो ....क्लायंट तिकडून बोलला "Gaurang where are you ?" त्याला ५ मिनिटात पोचतो असे सांगून फोन ठेवल्या ठेवल्या लक्षात आला कि ४.१५ वाजले होते....

मी : शालू अगं २ तास निघून गेले कळलंच नाही......
ती : खरंच.... जसा मला पण आपल्या कॉलेज मधले ३ वर्ष अगदी ३ दिवसांसारखे वाटले होते...

तिला मधेच थांबवून मी बोललॊ

मी : शालू मला आता निघायला हवा
ती : हो पण be in touch .............

जाताना तिने मला एक जोरदार मिठी मारली आणि माझा कानात पुटपुटली "मला एक वचन दे कि तू मला समजावण्याचा प्रयत्न करणार नाहीस"
मी मान हलवून होकारार्थी उत्तर दिलं.....

नंतर तिथून निघताना विचार करत होतो आणि आज पण करतोय म्हणजे "चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घडवावा लागतात आणि त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात....पण त्यावेळी मी जो काही निर्णय घेतला तो बरोबर होता किंवा नाही??? किंवा त्याच वेळी एक ठाम असा निर्णय का नाही घेऊ शकलो????" ......ह्याची खंत मला आयुष्यभर जाणवेल.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साखरपुडाच तर झालाय... तोडून तुमच्याशी लग्न करू शकते की.. लग्न करून त्या दुसर्याबरोबर लाईफ ग्याम्बल करण्यापेक्षा हा मार्ग बेस्ट.

@च्रप्स@साधना....... हि कथा आणि माझे आयुष्य ह्यात काहीही संबंध नाहीये..... हा फक्त एक विचार आणि त्यातून बनलेले एक चित्र आहे जे शब्दरूपी मी इथे मांडले आहे......

@रास्ने .....धन्यवाद.....अजून तर लिहिणारच आहे...तुमचा असाच प्रतिसाद अपेक्षित आहे....

@अदिति.....अगदी मनातला ओळखलंत तुम्ही.....ती सावरली होती आणि जो काही निर्णय तिने घेतला होता त्यात ती खुश होती......

शेवटी जर गौरान्ग सुध्धा मनातल्या मनात म्हणाला असता, "मी तरी गम्मत कुठे करत होतो तुला प्रपोज करताना" तर अजुन चान्गला शेवट
झाला असता....

जेव्हा सांगायचं होतं तेव्हा सांगितलं नाही आणि आत्ता अचानक भेटल्यानंतर सांगून मन मोकळं झालं म्हणे... काय पण असतात एकेक ... :\