माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, त्याचे नाव पण ती घराच्या नेमप्लेटवरुन काढुन टाकते. मग ते येडं येऊन परत तिला धमकी देतं. आणी ही जोडी त्या ईशाच्या घरात रहाताना दाखवलेत. धन्य ती ईशा!

गुरुच्या सणसणीत वाजवत का नाही राधिका?? शन्याला घेऊन रहायला येणार म्हऩे. मुलाला ईमोशऩली blackmail करतोय.
तिेने सासु-सासर्यांना सांगुन टाकावं आता.

गुरुनाथ pathetic आहे, स्वतःच्या बायकोलाच घरातून बाहेर काढण्याचे चॅलेंज काय, त्या एवढ्याशा लहान मुलाला आईविरोधात भडकवणं काय! As a माणूस म्हणूनही मनातून उतरला, स्वतःच्या लफडयाची, विवाहबाह्य नात्याची लाज वाटणं सोडाच, तेच नातं मिरवतोय अभिमानाने. एवढं असेल तर बायकोला सरळ घटस्फोट देऊन करायचं ना लग्न girlfriend शी.
नक्की काय दाखवायचं आहे दिग्दर्शकाला मालिकेतून ?
त्या राधिकाला जरा जरी स्वाभिमान नावाची गोष्ट असेल तर तिनेच त्याच्या तोंडावर सरळ घटस्फोटाचे कागद फेकून हे फालतू नातं संपवावं!

त्या राधिकाला जरा जरी स्वाभिमान नावाची गोष्ट असेल तर तिनेच त्याच्या तोंडावर सरळ घटस्फोटाचे कागद फेकून हे फालतू नातं संपवावं >> हे आपण मायबोली कर कधी पासून सांगून राहीले पण ते भैताड चॅनल वाले ऐकूनच नाही राहिले बे Wink Happy

इतक्या शिव्या घालता तरी बघता ही टुकार मालिका, त्यामुळे t r p वाढतो त्यांचा आणि बंद होत नाहीय..
बघू नका, नाकटी सारखी ही पण बंद होईल

पण राधिकाला तोच नवरा हवाय फक्त शनायाशिवाय. रेवतीने स्वत:च्या डिवोर्सचा केला नसेल एवढा विचार ती राधिकाचा करते. मुलाला सगळं स्पष्ट सांगत का नाही राधिका, म्हणे त्याच्या मनावर परिणाम होईल. गुरू काय वाट्टेल ते सांगतो ते चालतं का. सोन्यासारखा संसार सोडून गेले असं राधिकाला वाटतं पण गुरूलाही तो संसार सोन्यासारखा वाटला पाहिजे ना. राधिका आणि गुरू आता वेगवेगळे वकिलाकडे जाताहेत, लवकर निकाल लागायला पाहिजे.

ज्यांना मालिका बघायची आहे पण आता संपावी असंही वाटतंय, त्यांनी जमल्यास रिपिट बघायला सुरुवात करा. ८ वाजता पहिला शो बघायचं टाळा मग आपोआप trp कमी होईल आणि शेवटाकडे नेतील नाहीतर वाटेल ते दळत बसणार. प्राईम टाईम स्लॉट मधला पहिल्या शोच्या trp गृहीत धरण्यात येतो.

खर तर अशा मलिकांतून काहीतरी पॉज़िटिव गोष्टी दाखवल्या पाहिजेत कारण समाजात अशा खुप राधिका असतील आणि त्याना योग्य मार्ग दाखवणारे कोणी असेलच असे नाही .मग किमान अशा मालिकानी तरी योग्य मार्ग दाखवावा असे वाटते.
अगदी काहीच नाही तरी किमान कायद्याची मदत नक्की कशी घेऊ शकतो ते तरी दाखवावे न

भैताड राधिका निर्णय घेत नाही, सासु -सासरे आणी मुलाला खरे काय ते सांगत नाही.

भैताड गुरुनाथ हा गुलशन ग्रोव्हर+ रणजीत्+प्रेम चोप्रा+ शक्ती कपूर+ डॅनी या व इतर पाणचट व्हिलन्स ला कोळुन प्यायला आहे.

भैताड शन्या पैसा पैसा करत हपापल्यासारखी वागतेय.

भैताड ईशा या भैताड जोडीला आश्रय देते.

भैताड लेखक डाळीत पाणी वतुन वतुन आपले प्वाट भरु बघतोय. जय हो!

हो बंदच केली होती बघायची.. पण राधिकाला माफेले च्या वेळी सगळं सत्य कळतं तेव्हा वाटलं होते आता पुढे जाईल कथानक..
पण दोघाना काय हवय ते स्पष्ट न दाखवता सिन वर सिन , डायलॉग क्रिएट करुन नुसतं पाल्हाळ सुरु केलय परत..
सो आता बिग नो.. अर्धा तास जीवनात्ला अगदी फुकट जातो..
खरतर ही सिरियल बघायला तिची वेळ कारणीभुत ठरते..त्यावेळी आपोआप टि.व्ही. लावला जातो.. कामं करता करता बघितलं नाही तरी बॅकग्राउंड्ला चालु रहातो

ढिंग चिका ढिंग चिका ढिंग चिका ए ए ए! ए ए ए! राधिकाने गॅनायाची चांगली जिरवली. आज गुरुबाळाची जिरणार आहे. ऑफिसमध्ये एक नावीन पात्र दाखवलय जो गुरुच्या वरच्या लेव्हलचा अधिकारी असतो. शन्या बाळ त्याच्याकडे आकर्षीत झालेली दाखवलीय. म्हणजे गुरु बाळ आता न घरके न घाटके. तेल गेले तुप गेले हाती आले लाटणे अशी नवीन म्हण गुरु सार्थ करेल.

मी ही मालिका पाहत नाही. सर्फिंग किंवा नुकत्याच संपलेल्या दोन मालिकांदरम्यान प्रोमोज दिसले तर तेवढंच. पण इथे वाचून सगळं कळतंच. Wink
गुरुनाथ आणि शनाया यांच्यातलं प्रेम प्लॅटोनिक + मॉनेटरी आहे का? चि आणि चि सौ का तला शब्द वापरून म्हणायचं तर अशारीर (की अशरीर?) आहे का? मग ती बायको कशी? तो तिला बच्चा म्हणतो. मग "माझ्या नवर्‍याची मुलगी" हे शीर्षक अधिक योग्य नाही का?

१) ती दुसर्याकडे आकर्षित होउन त्याला धडा मिळणे..
२) पोरखेळ करुन राधिकाने दोघाना सतावणे..
३) अथर्वच्या नावाखली राधिकाने .. गुरुला सोडण्याचा निर्णय न घेणे..
४) गुरुला अजुन पती समजणे...
५) सासु सासर्याना न सांगणे.. अथर्वला या बाबतित हळुवार पणे न समजावणे

हे सगळे मार्ग अत्यंत चुकीचे आणि रेंगाळवाणे आहेत.. लोक काहितरी घडेल आज न उद्या म्हणुन बघत राहतात..

१) डाय्व्होर्स आणि स्वतः नवर्याच्या मॉनिटरी मदतीशिवाय कस राहु शकतो ..अथर्वला कसं शिकवु शकतो.. हे समजुन घेणे..
२) कायदेशीर बाबी जाणुन घेणे..

आता वकिलही फुकट्चे इम्प्रॅक्टिकल सेंटी डायलॉग मारताना दिसु नये ही आशा

तो तिला बच्चा म्हणतो. मग "माझ्या नवर्‍याची मुलगी" हे शीर्षक अधिक योग्य नाही का? >> Rofl

कालच ह्या शिरेलीच्या पॉपुलरीटीचा प्रत्यय आला, पुन्हा एकदा.

एक मावशी घरी जायला खुप घाई करत होत्या कारण जर ऊशीर झाला असता तर त्यांच एपी मिस झाली असती.

खुप भरभरुन बोलत होत्या, गुरु अन शानाया किती वाईट, राधिका किती बिचारी सोज्वळ अन बरेच काही.

बिचारी मी, गपगुमान ऐकत होते, पर्यायच नव्ह्तां, काही बोल्ली असती तर उद्द्या त्या माझ्या मम्मीलाच बोल्ल्या असत्या तुमची मुलगी कशी ऊत्तरे देते हो.

पण मनापासुन खुप चिड येत होती.
हे चॅनेल वाल खुप चुकीचे दाखवतायेत, नेहमी का बाईने सोशिक असायला हवे , अन आदर्श बाई म्हणजे नक्की काय वाटते यांना.

त्यापेक्षा एकदा तरी असे दाखवा न कि राधीकाने खरेच गुरुवर केस केलीये, पाठवा त्याला किमान एक दिवस आत

अजुनही बरेच जण अश्या शिरेल्स ब्लाईंडली फॉलो करतात हे बघुन मनापासुन खुप वाईट वाटते.

राधिकाने गॅनायाची चांगली जिरवली>>> नक्की काय केल तिने?

तेल गेले तुप गेले हाती आले लाटणे Rofl

माझ्या नवर्‍याची मुलगी Rofl

ड.पो. >>> म्हणजे? Uhoh

गुरुनाथ आणि शनाया यांच्यातलं प्रेम प्लॅटोनिक + मॉनेटरी आहे का? चि आणि चि सौ का तला शब्द वापरून म्हणायचं तर अशारीर (की अशरीर?) आहे का? >>> त्यान्च्यात Extra martial affair तरी धड आहे का?

आता वकिलही फुकट्चे इम्प्रॅक्टिकल सेंटी डायलॉग मारताना दिसु नये ही आशा >>> अगदी अगदी मागे एकदा तो Traffic पोलिस सुद्दा गुरुला असेच सेंटी डायलॉग मारत होता, बायको हा मनाचा ब्रेक असतो वै. वै. Angry

फारच लांबण लावलय. असं वाटतंय की राधिकाने रूद्रममधल्या रागीणिसारखं फ्रिजमध्ये ठेवलेली बंदूक घ्यावी आणि ऊडवून टाकावं गुरूनाथ, शनाया आणि समिधाला. लॅपटाॅप गीफ्ट म्हणून मिळाला राधिकाला :वैताग: बीलं मोबाईलवर पण भरता येतात की. आज अगदी योग्य ट्रीटमेंट मिळाली शनायाला, जेनीने तरीही तिला वाचवलं. जेनी कसली क्यूट आहे बाहुलीसारखी. क्लायंट मिटींगसाठी शनायाला पाठवतो गुरू आणि सांगतो की काम आपल्यालाच मिळालं पाहिजे. अरे असं दाखवून आॅफिसमध्ये नऊ तास मान मोडून काम करणा-या आमच्यासारख्या गरीब पामरांचा अपमान तरी नका करू. बाकी काहीही दाखवा म्हणजे दाखवतातच, पण झीने निदान आॅफिस दाखवण्याच्या फंदात तरी पडू नये.

बाकी काहीही दाखवा म्हणजे दाखवतातच, पण झीने निदान आॅफिस दाखवण्याच्या फंदात तरी पडू नये.>>>>>+११११

पण माझा अंदाज चूकलाच. मला वाटले की शन्याबै त्या नवीन क्लायंटच्या मागे लागतील. कारण मी झलक पाहिली तेव्हा मला वाटले की तो माणुस गुरुच्याच ऑफिसमध्ये वरचा अधिकारी म्हणून आलाय. पण एपि पाहिल्यावर कळले. जेनीने मस्त काम केले. मुळात म्हणजे ती कार्पोरेट मध्ये काम करणारी प्रोफेशनल म्हणून एकदम शोभते. शन्या त्या मानाने बधिर आणी मठ्ठोबा वाटते.

आधी पण वाटले होते की शन्या श्रेयसच्या मागे लागुन लग्न करुन निघुन जाईल. पण लेखक महाशय कथा वाढवत सुटलेत. आज ईशा शनायाला सल्ला देते की गॅरीला लग्न करायला सांग आणी राधिकाला घटस्फोट द्यायला सांग. घटस्फोट म्हणजे फारच सोपी प्रोसेस वाटते ह्या नटमोगर्‍यांना.

राधिका ने जरा रुद्रम मधल्या अभय सातव च्या बायकोला भेटलं पाहिजे.
नवरा चुकला की कसं वागायचं असतं त्याचे जरा धडे मिळतील... ( ती मुक्ता ला म्हणते ना शेवटी की तू मारलं नसतस तर मीच मारल असतं माझ्या नवर्याला )
म्हणेज अगदीच या केस मधे गुरुनाथ ला मारायची गरज नाही पण तो हाड तुड करतोय तरी त्याच्या मागे शेपुट हलवत जायची अजिबातच गरज नाहिये.

खरंच जेनी खूपच गोड दिसत होती काल. शनायाच थोराड आणि मठ्ठ दिसत होती खरं तर. आणि ते कोण कस्टमर...काहीही दाखवतात.

Pages