बंजर ....

Submitted by सुप्रिया जाधव. on 8 November, 2017 - 10:13

बंजर ...

मित्राची बायको,
बायकोची मैत्रिण,
सख्खी शेजारीण,
गरजू नातेवाईक,
नाहीतर हक्काने पैसे मोजलेली
डांस बार अदाकारीण,
उरली-सुरली मोलकऱीण

अगदी कुणी कुणीही चालायचे तुला !
.
.
.
तळपता सूर्य माझ्या माथी मारून
तुझ्या क्षितिजदूर चौफेर कोसळण्याला
ना नव्हती माझी !

कोसळेनास का बाबा !!

पण एक सांग ..
अतिवृष्टीच्या पट्ट्यावर कोसळण्यात
कसला साधायचास रे पुरूषार्थ ?
कधी भेगाळल्या जमिनीवर
चार शिंतोडे शिंपडून दाखवले असतेस ?

तर तर ..

नसतीच झाली मनाची जमीन बंजर
अगदीच फळफुल नाहीत
पण निश्चित दिसली असती
टवटवीत प्रसन्न हिरवळ
निदान
आल्या-गेल्या
थकल्या भागल्या वाटसरूला सुखावणारी !

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users