८ नोव्हेंबर माझ्या नजरेतून

Submitted by सिम्बा on 5 November, 2017 - 22:26

नाव वाचून घाबरू नका :), हा धागा डीमोनीटायझेशन विषयी आहे, पण डीमोनिटायझेशन बद्दल नाही.
निश्चलीकरणाचे फायदे, तोटे याची खच्चून चर्चा येत्या काही दिवसात मिडिया मध्ये होईलच.
खुद्द मायबोलीवर बऱ्याच धाग्यांवर निश्चलीकरणाच्या विविध पैलूंची विस्तृत चर्चा झाली आहे
पण इकडे आपण आपला स्वत: चा काय अनुभव होता हे लिहूया.
- आपल्याला बातमी कशी कळली
- आपली पहिली प्रतिक्रिया.
- लोकांच्या प्रतिक्रिया.
- या दिवसात लक्षात राहण्यासारखा एखादा चांगला/ वाईट/ फजितीचा प्रसंग.
- तुमचे या पूर्ण प्रोसेस वरचे भाष्य
या पैकी एक अनेक मुद्द्यांवर तुम्ही आपले म्हणणे मांडू शकता.

सर्वाना विनंती:- जी अस्मानी सुलतानी यायची ती येऊन गेली आहे, जरी काही ठिकाणी त्याचे हादरे अजूनही जाणवत असले तरी इकडे आपण कंठशोष करून ग्राउंड झीरोवर काही फरक पडणार नाही आहे.ज्याला निश्चलीकरण देवाची देणगी वाटते त्याचे मतपरिवर्तन कोणी करू शकत नाही हे गेल्या १ वर्षात बर्याच वेळा सिध्द झाले आहे. तेव्हा कृपया कोणाच्या अनुभावाला counter करू नये. आपण पुरेसे भाग्यवान नसल्याने आपल्याला चांगले अनुभव आले नाहीत असे म्हणून सोडून द्यावे.
दुसर्या बाजूलाही तीच विनंती, ज्याची या बाबतीत कडवट मते आहेत ती माणसे महापापी आहेत समजून सोडून द्यावे.
हा धाग्यात demon ची ह्युमन साइड यावी असा प्रयत्न आहे, म्हणून हा धागा राजकारण ग्रुप बाहेर काढला आहे, तो बाहेरच राहावा म्हणून सहकार्य करावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरवात माझ्या अनुभवाने करतो
कधीतरी ५-६ नोव्हेंबर ला गुलाबोचे फोटो त्याच्या GPS फिचर सकट WA वर आले. ती नोट एकटी खोटी दिसत होती कि पाठवणार्या माणसाची यथेच्छ चेष्टा करून झाली.वरती मोठी नोट काढून कला पैसा कसा थांबेल म्हणून सरकारचे पण trolling करून झाले, पुढे ती गोष्ट मागे पडली.

८ नोव्हेंबर, पार्ल्याला ATM मधून मी ६००० काढले, एका ठिकाणी छोटी खरेदी केली त्याला १००० ची नोट देऊन सुट्टे घेतले, त्या क्षणी मला कल्पना नव्हती कि ह्याच सुट्ट्या पैशांच्या जीवावर पुढचे काही दिवस काढावे लागणार आहेत.
ट्रेन मध्ये बसलो, आणि आमच्या एका ग्रुप वर मित्राचा मेसेज आला, त्याची एक्साईटमेंट मेसेज वर सुद्धा कळत होती, धाप लागल्या सारखा क्रियापदे खात त्याने लिहिणे पूर्ण केले, सगळ्यात पहिली रीअक्शन chat सोडून गुगल वर बातमी कन्फर्म करणे हि होती.

च्यायला !! बातमी तर खरी आहे, वर परवाची गुलाबो पण चलनात येणार असे दिसतेय, हा तर मोठा गेम झाला, मोदी फारच तयारीचा निघाला, पहिल्या क्षणीतरी,२.५ लाख पेक्षा जास्त पैसे जो भरेल त्याची चौकशी, आणि जो पैसा परत येणार नाही तो काळापैसा हे लॉजिक पटण्यासारखे होते. पोलिटिकल ग्रुप वर मीच विरोधीपक्ष चालवत असल्याने तिकडे पण काहीतरी प्रतिक्रिया देणे गरजेचे होते, शेवटी “indeed its a very bold step” म्हणून गप्प बसलो, दरम्यात मेमे, उपहासात्मक मेसेज, फायनान्शिअल गुरूंची endorsment याचा मारा सुरु झाला.बिल्डींग च्या ग्रुप वर तर पूर आला होता. IT cell णे काय हे मटेरिअल तयारच ठेवलेले कि काय न कळे.
रात्री भावाशी WA chat चालू असताना म्हंटले “काही तरी मेजर चुकतेय पण त्या गोष्टीवर बोट ठेवता येत नाहीये”.

९-१० ला बँकां बंद राहणार होत्या.
९ ला स्टेशन वर पोहोचलो, तिकीट काढायला प्रचंड मोठी रांग होती कारण कळेना, जस जसे पुढे गेलो तेव्हा दिसले रांगेतला प्रत्येकजण ५०० ची नोट घेऊन १०-२० रु चे तिकीट मागत होता (घरात ज्या काही ५०० च्या नोटा असतील त्या इकडे तिकडे खपऊ, उगाच बँकेत रांगेत कशाला उभे राहा असा विचार करून) आणि तिकडेच पुढे काय वाढून ठेवले आहे याची अंधुक कल्पना आली.
तरी सरकारने इतकी मोठी घोषणा केलीये तर केली असेल बा तयारी म्हणून स्वत: ची समजूत घातली आणि गप्प बसलो.
पुढचे २ दिवस विविध लोकांचे म्हणणे वाचणे, त्यांच्या अर्ग्युमेंट मधल्या त्रुटी हेरणे ,आपला कॉमनसेन्स वापरून उत्तरे शोधायचा प्रयत्न करणे, आणि उरलेल्या वेळात ग्रुप वर वाद घालणे यात भर्ककन गेले.
बँक्सचालू झाल्या दिवशी संध्याकाळी हा सगळा मुर्खपणा आहे या ठाम निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचलो होतो. घरी परत येताना पोलिटिकल ग्रुप वर मेसेज टाकला “indeed its a very bold step , but not a very wise one”

मी ऑफिस कँटीनमधे टीवीवर बातमी बघीतली. मला पण वाटलेलं की काहीतरी भारी होतय. उर्जित पटेल बद्दल काहीतरी बातमी वाचत होते त्यामुळे लगेच या साहेबांनी काहीतरी भन्नाट केलय असं वाटलं.

सगळे लोक एटीएम कडे धावले. ज्या 100 च्या नोटा मिळतील त्या घ्यायला. 400 रुपये काढायला. पण एक मुलगी मात्र 8000 रुपये काढताना दिसली. या 1000 - 500 च्या नोटा कशाला हव्या होत्या तिला कोण जाणे!

मग पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन, विमानतळ नी हॉस्पिटलमधली गर्दी दिसू लागली दुसऱ्या दिवसापासून.

मुंबई - पुणे जायचे होते. ऑनलाइन तिकीट काढलेले नव्हते नी 400 रुपये गाडीला द्यायला नव्हते. एक महत्वाची कॉन्फरन्स बुडाली माझी!

रोज येणारे नवनवीन नियम आणि लोकांचे झुगाड बघून वाटत होतं की हे नियम बनवणारे लोक भारतीय नाहीत का? त्यांना भारतीय मानसिकता माहीत नाही का? नियम पाळणे शक्य आहे का पासून नियम पाळला जात आहे का हे कसे बघणार वगैरे काहीच विचार करू शकत नाहीत का? काही लोक या प्रकाराला यू टर्न म्हणत होते. मला तरी नाही पटले. २+२ आधी ५ सांगितले, मग जास्त वाटले म्हणून ३, मग वाढवत वाढवत सव्वातीन, साडेतीन वगैरे.

असो, काय साध्य होईल कोण जाणे पण अंमलबजावणी कशी करावी यावर काडीचा विचार कोणी केलेला नव्हता एवढं समजलं.

बातमी व्हाट्स अपवरती कळाली साडेआठ नऊच्या सुमारास न् आनंदाचं भरतं आलं (प्रांजळपणे कबूल करतो कारण 'फकिर' खात नाही आणि खाऊ देणार नाही हा विश्वास! Happy )

मग काय रात्री उशीरापर्यंत ऑनलाइन जागरण! गृपमध्ये घमासान चर्चा! आणि शेवटी विरंगुळा म्हणून कॉलेजजिवनातील काही मैत्रिणींना (ज्यांचे कुटूंब राजकारणात आहे तेही विरोधी पक्षात) दोन अडीच वाजेपर्यंत का जागताहेत म्हणून किती आहेत, मोजायला येऊ का वैगरे भरपूर चिडवून त्या रात्रीचा शेवट झाला.
दुसर्या दिवशी सकाळीच काही ग्राहकांचे कामासाठी एडव्हांस पेमेंट घ्यावे म्हणून फोन कॉल्स! वस्तू दोन महिन्यांनी द्या पण नोटा स्विकारा ही गळ. आमच्या पिताश्रींचा या गोष्टीला नकार. मग काय आमचाही नकार. Happy काळ्याचं पांढरं करण्यासाठी काही नव्हतंच. जवळचं रद्द चलन बैंकेत नेऊन भरणं होतं पण त्यासाठीच्या भल्यामोठ्या रांगेत उभं राहणं परवडण्यासारखं नव्हतं मग ते लांबणीवर टाकलं. किरकोळ पेमेंट्स जे रोखीने करावे लागायचे तेही चेक्स देऊन करायला सुरूवात झाली. यांत उद्योग क्षेत्रातील कामगार मंडळींचे हाल होत होते तरीही जेव्हा एटीएम आणि सिडीएम बाहेर रांगेत उभे राहून त्यांच्यात चर्चा झडायच्या तेव्हा 'मोदी देशाचं चांगलंच करणार' हाच सुर होता. त्रास, गैरसोय सहन करण्याची तयारी होती. अर्थात् तशी आमचीही होतीच.

घ्या. आणि मी जुन्या नोटा घेतो, माझ्याकडून कामं करुन घ्या, अशी जाहिरात करुन देखील कोणी माझ्याकडे एक फाटकी नोट घेऊन आलं नाही.
साला मेरा बॅडलकही खराब है. जब आसमानसे सोना बरसेगा, तबभी बराबर मेरेही सिरपर छाता होगा.

नोटबंदीचा सर्वात मोठा परिणाम :
लोकांचा पैश्याकडे बघण्याचा दृष्टीकोण आमूलाग्र बदलला आहे .
कसा ?
पूर्वी लोक नोटांनाच पैसा समजून कॅश घरात ठेवत असत .रोख रक्कम बघून मनाला आधार वाटे . विशेषत: ग्रामीण भागात डिजिटल मनी ही संकल्पना लोकांना समजत नसे .
पण आता तसे राहिले नाही. बॅंकेत तुमच्या खात्यावर पैसे आले म्हणजे ते तुमचेच पैसे आहेत . ते कधीही तुम्ही वापरू शकता हे लोकाना पटतेय .
प्रत्येक व्यवहार रोकडा कॅशनेच व्हायला हवा हा हव्यास नाहीसा होवून कॅश म्हणजे डोक्याला ताप अशी नवीन धारणा समाजात रूढ होत आहे .
माझ्यामते हेच नोटबंदी चे सर्वात मोठे यश आहे . कॅशलेस डिजिटल इकॉनॉमीकडे भारतासारख्या खंडप्राय देशाची वेगाने होत असलेली वाटचाल अनेक देशी विदेशी अर्थतज्ज्ञाना अचंभित करणारी आहे .

कॅश कडे पाहण्याचा माझा लुकआउट सुद्धा बदलला,
म्हणजे कार्ड/ online पेमेन्तस आधीपासून करतच असे,
पण त्या ८ नोव्हेंबर पासून पुढचे ३ महिने तरी कोणतेही ATM दिसले कि त्यात कार्ड घालून पैसे मिळतात का पहायची तीव्र इच्छा मनात यायची.
आता थोडा रिकवर झालोय Happy

<<माझ्यामते हेच नोटबंदी चे सर्वात मोठे यश आहे . कॅशलेस डिजिटल इकॉनॉमीकडे भारतासारख्या खंडप्राय देशाची वेगाने होत असलेली वाटचाल अनेक देशी विदेशी अर्थतज्ज्ञाना अचंभित करणारी आहे .>>
------ त्याच्यासाठी नोटबन्दी करायची काय अवशक्ता होती. छान जाहिरात करायची, हौशी लोकान्ना ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसिडर करायचे म्हणजे कालान्तराने लोकाना डिजीटल चे महत्व पटले असते.

किती काळा पैसा बाहेर आला, भविष्यात येणार आहे हे महत्वाचे आहे.

कॅशलेस व्यवहार आता किती पटीने होत आहेत?? किंवा ८ नोव्हेंबर नंतर वाढ झालेल्या कॅशलेस व्यवहारांमधे आत किती प्रमाणात घट झाली आहे? कॅशलेस व्यवहार वाढावेत यासाठी नोटाबंदी केली गेली होती का? या प्रश्नांची उत्तरे कात्रे साहेब देतील तर बरं

जाऊ द्या विठ्ठल, वर्ष झालं उत्तरं मागून. ते काही मिलायची नाही.

मला तर भीती आहे की अन्नधान्याचं महत्त्व पटावं म्हणून मोदीजी आज रात्री 'उद्यापासून पन्नास दिवस सगळ्यांनी अन्नाचा कणसुद्धा ग्रहण करु नये' अशी काही घोषणा करतील का काय?

{कॅशलेस डिजिटल इकॉनॉमीकडे भारतासारख्या खंडप्राय देशाची वेगाने होत असलेली वाटचाल अनेक देशी विदेशी अर्थतज्ज्ञाना अचंभित करणारी आहे .}
हो तर. पण भारतात बसून आम्हाला वेगाने होणारी ही वाटचाल दिसतच नाही हो.
सरकारपण लेस क्याश च्या जाहिराती विसरलंय. अब जमाना या चंद महीने मुद्रा के नाम।

मी ऑफिस मधुन बाहेर पडल्यावर कॅब मध्ये चाललेली चर्चा ऐकून समजले की आज रात्री १२ वाजल्या पासून नोटाबंदी झाली आहे. मी लगेच घरात कॅश किती आहे याचा आढावा घेतला, फार नाही साडेबारा हजार वगैरे होती. त्या रात्री व्हॉटसप वर नोटाबंदीच्या जोक्स ना पुरते उधाण आले होते. खूप उशिरापर्यंत रात्री विविध गृप गाजत होते, आणि आता आपला देश कसा सुधारेल आणि पुढे जाईल याच्या ही वाच्यता होऊ लागल्या, अंदाज बांधले जाऊ लागले.
पुढच्या दोन दिवसात बॅन्केत नोकरी करणार्‍या एकांची ओळख होती त्यांनी ते माझे साडेबारा हजार परस्पर बदलून देण्याची हमी दिली सो त्या नोटांची विल्हेवाट लागली.
दुसर्‍या दिवशी माझ्या एका मित्राचा वादी होता, त्याला फोन केला बोलता बोलता "बघितलंस का नै, मोदीसाहेबांनी मला वादिचं कसं भारी गिफ्ट दिलं" मी Uhoh मोड मध्ये गेले... कशाचाही अभिमान आणि आनंद होतो लोकांना.. Proud
पुढचे काही दिवस माझ्याकडे कॅश नव्हती.. भाजी वगैरे घेण्यापुरती होती. कधी गरज लागली तर वाण सामान वाला चक्क कार्ड पेमेंट घेऊ लागला होता. बाकी डॉक्टर, शॉपिंग इ. गोष्टींची पेमेन्ट्स तर बॅन्क ट्रान्स्फर, पेटीएम च्या वतीने होत होती. दरम्यान मला एका ओळखिच्यांचा फोन ही आला होता की माझ्याकडे ५० लाख कॅश आहे व्हाईट कोणी करून देते का माहित आहे का? मी परत Uhoh मोड मध्ये... म्हटलं गरिबाची चेष्टा करतोस का काय? आणि असं काळ्याचं पांढरं करून देणारे लोक त्या काळात मुंबईत खूप निर्माण झाले होते म्हणे. खरं खोटं देव जाणे.
पुढचे काही दिवस मग पेपरात सतत बातम्या येत होत्या की अमूक ठिकाणी २ करोड च्या जुन्या नोटा टाकल्या त्या आढळल्या... इ. इ.
बातमी ऐकल्या ऐकल्या काळा पैसा मस्त बाहेर निघेल, किंवा दडपलेला पैसा नोटाबंदीमुळे आता कुजेल... सर्व गटारी स्वच्छ होतील असा विचार चमकून गेला डोक्यात. पण नोटाबंदीमुळे देशाचे पुढे हित कसे झाले हे सरकारने आपल्यापर्यंत पोहोचवले नाही.
नोटाबंदीमुळे अनेकांच्या झोपा उडाल्या होत्या... काही व्यवसाय जे कॅश शिवाय दिवस सुरू करू शकत नाहीत ते, आणि दुसरे, दडपून ठेवलेल्या पैशाचं कसं काय करायचं.
पण मी सुखी होते त्यामुळे रोज छान झोप लागायची नेहमी सारखी Proud

<पुढचे काही दिवस मग पेपरात सतत बातम्या येत होत्या की अमूक ठिकाणी २ करोड च्या जुन्या नोटा टाकल्या त्या आढळल्या... इ. इ.> अर्र आमच्या पेपरात अशा बातम्या क्वचितच दिसल्या. पण बँक कर्मचार्‍यांनी मागील दाराने लोकांना नोटा एक्स्चेंज (तेही भारी रकमेच्या) करायला मदत केल्याच्या बातम्या दिसल्या. परिचयातल्या बँक कर्मचार्‍यांकडूनही असं कानावर पडत होतं.
शिवाय cash withdrawal वर बंधने असतानाही कोणाकोणाकडे लाख लाख रुपये नव्या नोटांत सापडल्याच्या, त्याही लाच देण्यासाठी किंवा दिलेल्या, तुरळक बातम्या होत्या.

माझे ८०% रकमेचे व्यवहार कार्डाने. आणि दोन महिन्यांतून एकदा १००, ५०, १० च्या नोटांमध्ये काही रक्कम किरकोळ व्यवहारासाठी, प्रवासखर्चासाठी काढून ठेवायची सवय. त्यामुळे फार अडले नाही. फक्त आहेत त्या नोटा काळजीपूर्वक वापरायचा प्रयत्न होता.
बहुतेक वेळा एटीएम शटर डाउन अवस्थेतच दिसायची. एकदा एका एटीएममध्ये नोटाभरणाचा कार्यक्रम चाललेला दिसला. लहानशी रांगही होती म्हणून म्हटलं आपणही पावन होऊ. दोन हजाराचीच एक (की दोन आठवत नाही) नोट मिळाली.
दूधवाल्याने महिन्याचे बिल डिजिटल पेमेंटने/चेकने घ्यायचे नाकारले. त्याला म्हटले हवे तर या आणि पुढल्या महिन्याचे पैसे एकदम घे. पण त्याने पाचशे पाचशेच्या नोटांत उरलेले जवळपास हजार रुपये परत केले . म्हणजे बरीच मंडळी रांगा लावून पैसे काढत होती, आणि त्यांना ते मिळतही असावेत. पेपरवाल्याने चेक घेतला.
सात तारखेलाच घरात किरकोळ दुरुस्तीसाठी म्हणून चार हजार रुपये एटीएममधून काढलेले. ते परत करायला अगदी डिसेंबरमध्ये गेलो, तरी दीड तास रांगेत उभे राहावे लागलेले. कॅश रिसीव्ह करायला मेंटेनन्स एजन्सीच्या स्टाफचा मुलगा कॅशियरच्या हाताशी होता. पेमेंट तेवढं कॅशियर स्वतः करत होता.

नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून काही दिवस कोणत्या बँकेसमोर किती रांग आहे हे पाहायचा जणू छंदच लागलेला.

नोटबंदीच्या सुरुवातीच्या दिवसांत मीटरवर पेटीएमचा स्टिकर की कव्हर लावलेला एक रिक्षावाला भेटलेला. त्याने नोटाबंदीमुळे छान छान होणार हे सांगितलेले. म्हणजे रस्त्यावर, फुटपाथवर, पुलावर वगैरे रेडिमेड कपडे विकणारे पण दिवसाला २०-२० हजाराचा धंदा करतात. आता त्यांनाही टॅक्स द्यावा लागेल. मलाही द्यावा लागेल पण मी देईन, असेही म्हणाला.

मार्चच्या अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीला पुन्हा एकदा नगदीची चणचण जाणवलेली.

आणखी एक गंमतीशीर आठवण म्हणजे १० नोव्हेंबरला मी आणि आई आधार कार्ड नोंदणी करायला गेलेलो. ते केंद्र एका बँकेजवळ असल्याने रिक्षावाल्याला बँकेचाच पत्ता सांगितला. तर रिक्षावाला आईला, "हां, सब पुराना माल निकल रहा है माँजी?" असं विचारू लागला.
दुसर्‍या दिवशी त्याच कामासाठी पुन्हा जावं लागलं तेव्हा तिथे दहावी-बारावीच्या वयाची ३-४ मुलं, कोणत्या बँकेत रांगा कमी असतात आणि `आज' कुठे नोटा बदलायला जायचं, एकमेकांना फोनवरून कळवायचं हे प्लान करत होती.

रिझर्व्ह बैंकेच्या अहवालानुसार रद्द झालेल्या नोटांपैकी ९९% नोटा पुन्हा आरबीआईकडे जमा झाल्या. याचा अर्थ काळा पैसा अर्थव्यवस्थेत नव्हताच असं नव्हे तर खुप मोठ्या प्रमाणात काळ्याचं पांढरं करण्यात लोकांना यश आलं. नोटाबंदीचं प्रमुख उद्धिष्ट त्यामुळे फसलं. अंमलबजावणीत दोष होता. याबाबतचं एक बोलकं उदाहरण सांगतो. एक साधा गल्लीतला जनरल स्टोअरवाला नोटाबंदीच्या पहिल्या पंधरवड्यात निरनिराळ्या लोकांच्या बैंकखात्याचा वापर करून (अर्थात् टक्केवारी कबूल करून) एक कोटी रूपये एवढ्या मुल्यांच जुनं चलन (ब्लैक) बैंकांत जमा करतो असं ऐकलेलं.
मला एक प्रश्न पडतो, जर रद्द झालेलं ९९% चलन अर्थव्यवस्थेत आलं नसतं, त्याऐवजी कमी आलं असतं तर आज देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती काय असली असती? कोणी आर्थिक विषयांतले जाणकार प्रकाश टाकतील का?

कोणी आर्थिक विषयांतले जाणकार प्रकाश टाकतील का?
>> भाजप्ये ज्या अर्थिक जाणकारांचं ऐकतात तेच बेस्ट असतील या प्रश्नाचं उत्तर द्यायला. म्हणजे शेफाली वैद्य यांना भेटलेला रिक्शावाला, घरोघरच्या कामवाल्या, इस्त्रीवाला, चहावाला, इत्यादी. बोकिल पण असतेल्ल.

निश्चलणीकरणाचा निर्णया मागचा हेतू चांगला असला अंमलबजावणीत दोष होता. अगदी मान्य. सध्या तरी हा निर्णय चुकल्यासारखे वाटण्याची परीस्थिती असली तरी काही जाणकारांचे असेही मत आहे की भविष्यात अर्थव्यवस्थेवर त्याचे चांगले परीणाम होतील. खरे-खोटे तेच जाणोत.

निर्णया मागचा हेतू
>> 'सरकारने सांगितलेला हेतू' म्हणजे स्मोकस्क्रीन. 'काय साध्य झाले' यावरुन 'हेतु काय होता' हे ओळखण्याची पद्धत असते राजकारणात.

८ तारखेच्या काहीच दिवस आधी भारतात आलेलो. ८ला सकाळी काही खरेदी आणि इतर खर्च करायला बरेच पैसे हजारच्या नोटात काढले. रात्री घरी आलो तर हे समजलं.
पूअर इम्प्लीमेंटेशन, पैसे छापलेले नसणे आणि इ व्यवहार नसणे याने हलकल्लोळ माजेल याची खात्री होतीच, तरी बोल्ड मूव्ह म्हणून/ काहीतरी केलं म्हणून चांगलं ही वाटलेलं. आई बाबांकडे पैसे होते, आणि ठाण्यात दोन तीन बँकांमधून पैसे ही मिळाले. त्यामुळे पुढच्या २० दिवसात म्हणावा असा त्रास काही झाला नाही.
परदेशी असलेल्या नोटा मात्र बदलता आल्या नाहीत. आता २५-३० वर्षांनी अँटिक म्हणून भाव येईल अशी आशा ठेवून आहे.
या सर्वांपेक्षा आधार कार्ड कंपल्सरी करणे आणि ते नसणे ही डोकेदुखी जास्त आहे. सगळे अकाउंट बंद करून काहीही पैसे भारतात सध्या तरी न ठेवणे हा सोयिस्कर पर्याय दिसतो आहे.

<आता २५-३० वर्षांनी अँटिक म्हणून भाव येईल अशी आशा ठेवून आहे.>
अँटिक? तुम्हाला दंड, तुरुंगवास इत्यादी काहीही होऊ शकेल.

युपी निवडणुकात घवघवीत यश मिळाले.
याचा अर्थ सपाचे व बसपाचे पैसे कापल्यावर त्यांची वाट लागली असाही होऊ शकतो.

ह्याचा अर्थ भाजपाने पैसे वाटून निवडणुका जिंकल्या असा होतो, ते चालेल का?
>>>>
हो चालेल की, माझ्या तीर्थरुपांचे काय जाणार आहे.

भाजपाने युपीत पैसे वाटले की नाही ते मला माहिती नाही पण नोटबंदीचे मुख्य कारण युपी निवडणुका होत्या असा माझा तरी अंदाज आहे.

मुख्य कारण उप्र निवडणूका असल्या तरी तो जास्त मोठ गुन्हा ठरेल.
एक राज्य जिंकण्यासाठी, पूर्ण देशाला खाईत लोटण्याचा वेडेपणा bjp करेल असे वाटत नाही.

देशाचा पंतप्रधान सगळ्या प्लॅटफोर्मवर फेल झाला आहे.अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन काँग्रेसच्या काळात जेवढा वाढीचा दर होता त्यापेक्षा खुपच कमी वेग झाला आहे.
नोटाबंदी फेल गेली आहे हे ९९ टक्के पैसा बॅकांकडे परत आल्याने समजत आहेच.असला निष्क्रीय व फक्त तोंडाची वाफ दवडणारा पंतप्रधान २०१९ ला नकोच

भाजपाने युपीत पैसे वाटले की नाही ते मला माहिती नाही पण नोटबंदीचे मुख्य कारण युपी निवडणुका होत्या असा माझा तरी अंदाज आहे.>>>
असं नसेल. कारण चौदाला तिथे ८० तले ७३ (की ७१?) खासदार बिजेपीचे आलेले. युपीत बिजेपीचंच वारं होतं-आहे. नोटाबंदीची आवश्यकता नव्हती युपी जिंकण्यासाठी.
अर्थात् युपीतील जनतेवर नोटबंदीच्या निर्णयाचा कितपत आणि कसा प्रभाव पडला ते तेथील येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतील रिझल्ट वरून लक्षात येईलच. एकोणीस साठी युपी महत्वाची भुमिका बजावणार हे निश्चित! तेथील येत्या निवडणूका जिंकणं बिजेपीसाठी महत्वाचं असेल.

हॅपी demon डे मित्रो .

लोकांच्या पुनरावलोकना साठी,
2 वर्षांपूर्वी" नोटबंदी ने काय साध्य होईल" या बद्दल स्वतः:ची काय मते होती, ती आजच्या रिऍलिटी बरोबर ताडून पाहण्यासाठी धागा वर काढत आहे.

“The two successive shocks of demonetisation and GST had a serious impact on growth in India. Growth fell off interestingly at a time when growth in the global economy was peaking up"

"For example, we build this massive statue, the Sardar Patel statue on time," Mr Rajan said amidst laughter and applause from the audience. हा हा मस्त !

https://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/indias-economic...

<<नोटबंदीचे मुख्य कारण युपी निवडणुका होत्या असा माझा तरी अंदाज आहे.>>
--------- बन्दी आणायचे खरे कारण असावे हे अजुन तरी सामान्यान्ना समजलेले नाही. ज्या कारणासाठी बन्दी (काळा पैसा) आणली होती असे सान्गण्यात आले होते ते तर नक्कीच नाही आहे. काळा पैसा, भ्रष्ट मार्गाने जमा झालेला पैसा परत मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत, पैकी कुठलाच मार्ग हाताळलेला दिसला नाही.

गंमत म्हणजे कोणी काहीही म्हणो , देशी रुपे कार्ड आणि भिम युपीआय ट्रान्सफर व्यवहार प्रचंड प्रमाणात वाढले आहेत . यामुळे व्हिसा मास्टरकार्ड कडून परदेशी जात असलेला कमिशनचा पैसा वाचला आहे . इतके की मास्टरकार्‍ड्च्या प्रमुखाला ट्रम्पतात्याकडे तक्रार करावी लागली. हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीत्या नोटबन्दीचेच यश मानता येइल .

मी स्वतः गेल्या वर्षात प्रत्यक्ष एटीएम कार्ड वापरून पैसे काढणे वगळता अन्य डिजिटल पेमेन्ट्स साठी युपीआय वापरलेले आहे . पॉस साठी कार्ड वापरणे शून्य!

"नोट बंदी हा चुकीचा निर्णय होता हे कबूल करून मोदींनी देशाची माफी मागायला हवी।" इति मनमोहन सिंग। नोट बंदीचे फायदे ह्या महान अर्थ तज्ञाला नाही कळले, पण माझ्या सारख्या अर्थ व्यवस्थेच्या विद्यार्थ्याला कसे कळले पहा।

* नोट बंदीमुळे जरी 99% पैसा बँकेत जमा झाला असला तरी 23.22 लाख खात्यातील 3.68 लाख कोटी काळा पैसा आहे हे सरकार सांगत असूनही त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं जातंय।
*18 लाख खात्यात संशयासाद रक्कम जमा झालीय। यंत्रणा वर्षाला केवळ 3 लाख खात्यांची पडताळणी करू शकतेय याचा विरोधक गैर फायदा घेऊन अप प्रचार करताहेत।
*ई रिटर्न्स आणि पेपर रिटर्न्सद्वारे आयकर भरणाऱ्यांची संख्या तब्बल 1.25 कोटींनी वाढून
5.43 कोटी झालीय। त्यामुळे सरकारी तिजोरीत येत्या काळात किती लाख कोटींची भर पडेल याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही। नोट बंदीचं हे प्रचंड यश आहे असं मला वाटतं।
*99% रक्कम बँकेत जमा झाल्यामुळे गृह कर्जावरील व्याजात मोठी घट झाली। त्यामुळे देशातील करोडो गृह कर्ज धारकांना 2 लाखापासून 10 लाखापर्यंत फायदा झाला।
* 15.28 लाख कोटी बँकांत परत आल्यामुळे त्यावरील करामुळे सरकारच्या तिजोरीत प्रचंड भर पडली। एरव्ही ह्यापैकी 4 लाख कोटींवर तरी एकही पैसा कर आकारता आला नसता।
* मार्केटमधील पैसा 17.77 लाख कोटीवरून 14.75 लाख कोटींवर आला। म्हणजे चक्क 3 लाख कोटी इतकं कमी फिरतं भांडवल आहे।
* ऍडव्हान्स टॅक्समध्ये तब्बल 41.79% वाढ झालेली पाहायला मिळाली।
* समांतर अर्थ व्यवस्था मोडून काढण्यासाठी मोदींनी मुळावरच घाव घालताना काळा पैसा निर्माण करणाऱ्या तब्बल 2 लाख 10 हजार कंपन्यांचं रजिस्ट्रेशन रद्द केलंय। त्याशिवाय 37 हजार कंपन्यांवर कडक कारवाई सुरू आहे।
*उच्च बाजारमूल्य असलेल्या 14 हजार मालमत्ताची चौकशी सूरू आहे। कारण त्यांनी रिटर्न फाईल केलेले नाहीत।
* देशभर सतत धाड सत्र सुरू ठेवल्यामुळे करोडोचा काळा पैसा बाहेर येतोय।
*एलआयसीचा प्रीमियम नोव्हेम्बर 2016 मध्ये 142% वाढला।
* नोट बंदी जाहीर झाली अन अवघ्या 3 महिन्यात म्युच्युअल फंडात 95013 कोटी गुंतवले गेले। त्याआधीच्या तिमाहीत फक्त 36021 कोटी होते।
* डिजिटल व्यवहारांची संख्या ऑगस्ट 2016 मध्ये 87 कोटी होती ती ऑगस्ट 2017 मध्ये 138 कोटी झालीय।
*जन धन खात्यातील रक्कम 48% ने वाढलीय। आता ती 65 हजार कोटी झालीय, त्यामुळे देशाच्या विकासाला हातभार लावतेय।

संजीव पेडणेकर

Pages