वडिलोपार्जित जमीनीच्या विक्रीबाबत कृपया योग्य सल्ला द्या …

Submitted by प्र. स. on 28 October, 2017 - 13:53

माझ्या वडिलांचे २०१५ मध्ये निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात मी त्यांचा मुलगा, माझी आई , बहिण व वडिलांच्या ६ बहिणी असे वारस आहोत. वडिलांच्या ६ पैकी ५ बहिणींनी २००९ मध्ये रजिस्टर हक्कसोड पत्र दिले होते.
सध्या मी, आई व माझी बायको असे आम्ही तिघेच आमच्या घरी राहतो. राहते घर हे माझ्या वडिलांनी स्वकष्टाने बांधले आहे त्यामुळे त्यांची १ बहिणीचा त्यामध्ये कोणताही अधिकार नाही. परंतु गावाकडील जमिनी मध्ये तीचे नाव व आमचची ३ नावे (मी, आई, माझी बहिण) लागली आहेत. माझ्या बहिणीचे आत्ताच लग्न झालेले आहे.
आता माझ्या आईचे माझ्या बरोबर तसेच माझ्या बायको बरोबर वागणे खूपच विचित्र आहे. आम्हाला सतत असे वाटते, जसे तिला फक्त सर्व मालमत्ता हवी आहे. आणि ती अशी वागते जसे तिला मुलागा व सुन नाही. कित्येक वेळा छोट्या काही कारणांवरून तिने आम्हा दोघांना घरातून बाहेर काढण्याची धमकी दिलेली आहे. तिच्या अश्या वागण्याने मला आता आमच्या भविष्याची काळजी वाटू लागली आहे. अशा स्तिथीत मी माझे नावावर असलेली गावाकडील जमीन (एकत्रित ) विकू शकतो का ?( फक्त माझा निर्माण होणारा हिस्सा. ) कारण मला आता खूप मानसिक त्रास होऊ लागला आहे. व मला असे वाटते त्याचा त्रास माझ्या होणाऱ्या बाळाला सुद्धा होत असेल व भविष्यात ही होईल.
जमिनीचे वर्णन काहीसे खालील प्रमाणे आहे,
एकूण जमीन १० एकर व या जमिनी वरती ७/१२ मध्ये आमच्या चौघांची नावे आहेत. (मी, आई, माझी बहिण, वडिलांची १ बहिण)
कृपया कायदेशीर सल्ला लवकरात लवकर द्यावा ही विनंती कारण हा त्रास खूपच वाढलेला आहे.....

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सरकारने सात बारा नावाचा एक अत्यंत खुळचट प्रकार बनवून ठेवला आहे ज्यात एखाद्या शेतजमिनीचे मालक म्हणून पन्नास जणांची नावे असतात पण त्या जमिनीतला कोणता भाग कुणाच्या नावावर ह्याचा मात्र उल्लेख नसतो. कुणाच्या सुपीक डोक्यातून हे आले आहे तो नक्कीच एखादा भोंदू वकील असणार. कारण आपल्याकडे शेतजमिनींचे जे असंख्य वाद सुरु आहेत त्याचे मूळ कारण सातबारा हे आहे. आणि त्यामुळे वकिलांची उखळे पांढरी होत आहेत. त्यात आणि रस्त्यालगतच्या जमिनीचा दर जास्त आणि आतल्या जमिनीचा कमी असे झाले तर अजून जोरात हाणामाऱ्या.

असो. मी वकील नाही. पण माझ्या पाहण्यात जे आले आहे त्यावरून असे सांगू शकतो कि तुमच्या नावची जमीन तुम्हाला विकता येते. ज्याला विकली आहे त्याचे नाव सातबारा वर येते. कारण मी पाहिलेली केस अशीच होती. जमिनीवरून त्यांचे वाद सुरु होते. या फंदात कशाला पडा म्हणून या सदगृहस्थांनी त्यांच्या नावचा हिस्सा अन्य एकाला विकून टाकला. म्हणजे सातबाराला आता विकत घेणाऱ्याचे नाव आहे. आणि ती व्यक्ती आता त्या वादात कोर्टाच्या तारखा तोडत आहे.

आता हे सगळे करायचे तर नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणी करावी लागेल. त्यासाठी वकील नक्कीच लागणार. त्यामुळे तुम्ही रीतसर एखादा चांगला वकील गाठून त्याच्याशी सल्लामसलत करावी हे उत्तम.

एकाच प्रश्ना साठी २ धागे का काढलेत Uhoh

तुमच्याकडे वकील नाही का लिगल सल्ले मागायला?
नसल्यास हायर करणे.
Submitted by सायो on 29 October, 2017 - 19:24 >>>> +११११११

धन्यवाद सुनील इनामदार साहेब, तुम्ही सांगितलेल्या केस प्रमाणे मला ही कोणत्याही वादात व कोर्ट कचेरी यात अडकायचे नाही...

शेत जमिनींचे कायदे सरळ सोपे नाहीत. क्लिष्ट आहेत. त्यात अनेक बाबींचा समावेश आहे. त्यामुळे तुम्हीच नव्हे तर अनेक लोकांचा याबाबत प्रचंड गोंधळ आहे. जाणकार व अनुभवी वकिलांशी सल्ला करणे हेच उत्तम राहील. मला महसूल अधिकारी संघाचा एक फोरम सापडला त्यात सरकारी अधिकाऱ्यानी यासारख्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. मला वाटते वकिलांचा सल्ला घेण्यापूर्वी तुम्ही तुमचा प्रश्न तिथे विचारयला काहीच हरकत नाही.

http://maharashtracivilservice.org/janpith?start=1

ईनामदार, त्या सातबारा एक डोकेदुखी पोस्टशी सहमत आहे. मी सुद्धा घरी आईवडीलांना सांगितलेय की तुम्ही असतानाच काय ते वाटण्या करा वा विका पण तुमच्या पश्चात माझ्या डोक्याला त्रास नको. अन्यथा मी सरळ त्या जमिनीच्या तुकड्यावर पाणी सोडणार.

@ सायो,
वकील तुम्हाला काहीच करू नका हा सल्ला द्यायचेही पैसे घेतो. तसेच तो विश्वासू आणि योग्य सल्ला द्यायच्या लायकीचा भेटेल याचीही खात्री नसते. अन्यथा लुटत राहतो. आपल्याला कायद्याच्या खाचखळगा माहीत नसल्याने काही बोलूही शकत नाही. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात ते याचसाठी. त्यामुळे कोणी अश्या केसेसमध्ये वकीलाकडे जाण्याचा मोठा निर्णय घेण्याआधी चार जाणकार आणि अनुभवी लोकांचे सल्ले मागायला ईथे धागा काढत असेल तर ईटस ओके असे मला वाटते. तसेच अश्या धाग्यावर जर चांगले माहितीपुर्ण प्रतिसाद आणि कोणाचे अनुभव आले तर फायदा सर्वांचाच Happy

नानबा, माझा हा डायलॉग ऐकून माझ्या आईवडिलांनीच आता ते कष्ट घ्यायचे ठरवलेय. किंबहुना कामालाही लागलेत. वाटण्या करून थोडे विकून थोडे ठेवून त्या जागी त्याच पैश्यातून एक माझ्या नावावर पक्के घर बांधून जाणार आहेत. मग त्यांच्यानंतर मी ते ठेवेन वा विकेन हे माझ्यावर. त्यांना डोळे मिटतानाच तेवढे समाधान. गावच्या जमिनीत पैश्यांसोबत लोकांचे ईमोशनसुद्धा खूप अडकले असतात Happy

ऋन्मेश यांच्याशी सहमत. जमीन एकट्याने विकायची असल्यास आणि कुठला भाग कोणाचा हे ठरवलेले नसल्यास आधी जमीनिची वाटणी करावी लागते. हे फार कटकटचीचे काम आहे असे ऐकून आहे. खरे खोटे माहीत नाही. पण वकीलाचा सल्ल घ्यावा.

आमचंहि असच चालु आहे थोडंफार गावच्या जमिनिच्या वाटपा बाबत. धागा चांगला आहे.. माहितगाराने विस्तृत माहिती दिली तर बरं होईल.

गावी आमची एकत्रित जमीन होती ज्यात वडीलांच आणि माझ्या तीन काकांच सातबार्‍याला नाव होत पण वडीलांनी त्यांच्या वाट्याची जमीन विकली होती अर्थात वकीलांचा सल्ला घेऊन सगळा व्यवहार केला .सगळा व्यवहार व्यवस्थित झाला काही प्राॅब्लेम आला नाही
मला वाटत तुम्ही तुमच्या वाट्याची जमीन विकू शकता पण वकीलांशी सल्लामसलत करा