फास्टर फेणे ... टॉक्क ... मस्ट वॉच

Submitted by केदार जाधव on 29 October, 2017 - 06:03

ज्यानी लहानपणी फास्टर फेणेचे कारनामे वाचले आहेत त्याना नॉस्टेल्जिक करणारा अन ज्यानी हे नाव कधी ऐकल नाही त्याना वाचायला लावेल असा चित्रपट .
सुरूवातीला अमेय वाघ अन फाफे म्हटल्यावर कुछ जम्या नही अस वाटल होत , पण त्यान धमाल केलीय .
पण चित्रपटाचा खरा हिरो आहे तो "व्हिलन अप्पा" . गिरिश कुलकर्णीचा मी "य" काळापासून फॅन आहे , पण यात तो अफाट आहे . पर्ण पेठे , सिद्द्धार्थ जाधव ठीकठाक. भूभू टू गुड.
दिलिप प्रभावळकरांबद्द्ल तर काय बोलायच ?
थ्रिलर जॉनर असल्याने कथा लिहण चुकीच आहे , पण विषयही अगदी रिलेट करणारा निवडला आहे .
चित्रपटाचा वेन अन मांडणी अप्रतिम . काही पंचेस अन रेफरेन्सेसही सही .नवीन तंत्रज्ञानाचा ऑन स्क्रीन अन ऑफ स्क्रीन वापरही अगदी मस्त .:)
रितेश असल्यामुळे काय की पण पैसाही बराच खर्च करून फिनिशिंग अगदी हिंदी लेव्हलच जाणवत Wink

मराठी कळणार्या (अन न कळणार्यानीही) नक्की पहावा असा .
पिंपळे सौदागरला रविवार १२४५चा शो हाऊसफुल्ल पाहून तर अगदी भरून आल.

तेव्हा चुकवू नकाच .............................. टॉक्क Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ताच पाहिला, पण खरे सांगायचे तर ईतका नाही आवडला जितकी अपेक्षा होती.

हो पण अमेय वाघ surprisingly छान वाटला as फाफे

काल दिवसभराग बरेच मित्रांनी आवडला असे मत दिले.
ते पाहून मी का रात्री दोन वाजता आजची दोन तिकीटे बूक करायचा व्यर्थ प्रयत्न केला. पण ज्या काही थोड्याथोडक्या स्क्रीन आहेत त्या आलमोस्ट हाऊसफुल्ल दिसल्या. अगदी सकाळचेही शो ला हीच परिस्थिती. मान वर करून बघायची तयारी नसल्याने आता पुढच्या विकांताची वाट बघायचे एवढेच हातात. तो पर्यण्त या धाग्यावर प्रतिसादात आणि ईतर परीक्षणात आणखी मतं येतील ती वाचत राहीन...

तो डोळ्यात गोट्या बसवलेला अमेय वाघ अतिशहाना नट आहे.
>>>>
सिंजी, तुम्ही फा फे ची पुस्तके वाचलेली दिसत नाहीयेत. त्यात फाफेच्या शरीरयष्टीचे अमेय सारखेच वर्णन रंगवले आहे. आणि तो एक अतिशहाणा मुलगा दाखवला आहे. त्यामुळे अमेय पर्रफेक्ट कास्ट आहे. तुम्हाला तो वैयक्तिक आवडत नसला तरी त्याची कास्टींग ही काळाची गरज होती Happy

कास्टिंग काऊच मध्ये फलतुगिरी चा ओव्हरदोस करून बेडकाने स्वतःचे फॅन्स कमी करून घेतले आहेत.. अशक्य फालतू नट आहे हा..

आताच पाहिला.मस्त आहे.स्लॉट पण चांगले मिळालेत
भुभु, फाफे, भारा भागवत, अबोली, अंबादास, लांजेकर शॉर्ट रोल सर्वच पात्रं मस्त
गि कु जबरदस्त!!!
सर्वांनी मेहनत घेतली आहे.
मुलीला फार वाव नाहीय
शेवटी अमोल टेकवडे ची अकटिंग पण छान.
मला यातली प्रिची वाक्यां पण खूप आवडली.
प्रत्येक व्हीसलब्लॉअर आयुष्यभर "इतके धोके पत्करून मीच हे काम का करावं' या द्वंद्वाशी झगडत असतो.
यात या प्रशनाची बरीच उत्तरं मिळतात.

कास्टिंग काऊच
.>>>>
ही मालिका/ पिक्चर वगैरे आहे का?
वाचल्यावर पटकन तो कास्टींग काऊचमध्ये गुंतलाय की काय असे वाटले Happy

आवडला पण खुप भारी वगैरे नाही वाटला. मराठी सिनेमा म्हणुन आवर्जुन पाहिला. फाफे ला किती सहज प्रवेश व माहिती मिळते सगळीकडे. त्याच्यापेक्षा दुप्पट असलेल्या विल्हनला सहजपणे मारतो. मंडईतले भाजीवाले सगळे निवांत बसले होते मारामारी चालू असताना. हिंदी किंवा साऊथचा एखादा पिच्चर पाहतोय असं वाटत होतं.
हा पोलीसाला सांगणार, प्रामाणिकपणा दाखवायची संधी एकदाच मिळते. की लगेच पोलीस बदलललाच.
पण फाफे म्हणुन अमेय वाघ व आजोबा आवडले.
गि.कु. भारी वाटला अमेय वाघपेक्षा.
'आता वाटतय पुण्यात आल्यासारखं'.. Lol

आवडला पण खुप भारी वगैरे नाही वाटला. मराठी सिनेमा म्हणुन आवर्जुन पाहिला. फाफे ला किती सहज प्रवेश व माहिती मिळते सगळीकडे. त्याच्यापेक्षा दुप्पट असलेल्या विल्हनला सहजपणे मारतो. मंडईतले भाजीवाले सगळे निवांत बसले होते मारामारी चालू असताना. हिंदी किंवा साऊथचा एखादा पिच्चर पाहतोय असं वाटत होतं.
हा पोलीसाला सांगणार, प्रामाणिकपणा दाखवायची संधी एकदाच मिळते. की लगेच पोलीस बदलललाच.

>> चैत्राली , या विषयावर आत्ताच वाद घालून झालाय म्हणून लिहितो. तुमच्या मताचा आदर आहेच. आणि तुम्ही लिहीलय की बाकीच सगळ आवडलय . पण आज ऑफिसमधे एकजण चित्रपट बंडलच आहे म्हणत होता . म्हटल मुद्द्यावर बोलू , तर अस कधी होत का , तस कधी होत का ? मग म्हटल तुला कुठला आवडतो , तर म्हणे कहानी बघा . मी कपाळाला हात लावला .
तसे काढले तर कच्चे दुवे अगदी हॉलोवूड, बॉलिवूड, टॉलिवूड कुठल्याही थ्रिलर मधे निघतात. ( बिग बँग मधला इंडियाना जोन्सचा एपिसोड अप्रतिम आहे Happy ) अगदी The Shawshank Redemption मधेही ढिगाने आहेत . बाँडपट तर सोडूनच द्या. ते आपण सोडून देतो , पण मराठी म्हटल की ओव्हरक्रिटीकल होतो का ?

चैत्राली, अगदी हेच माझी मैत्रीण बोल्ली मला, तीला ही हा मुवी बिल्कुल नाही आवडला.
अन यावर ऊतारा म्हनुन तीने गोलमाल दुसर्यांदा बघायचा ठरविलेय.
अन मुख्य म्हणजे मला आवडत नसताना घेऊन जाणार, बदला घ्यायला

असो, आवड आपली आपली

मी ही वर म्हटल्याप्रमाणे जरी चांगला असला तरी ह्या चित्रपटाकडुन जितक्या अपे़क्षा होत्या तितका चांगला नाही वाटला, अन हे माझ्या एकटीचे मत नसुन माझ्या ओळखीच्या बर्याच जणांचे आहे

तरी खरेच अमेय साठी एकदा तरी बघायला हवा असा आहे.

पहिल्यांदाच आवडला तो मला, नाहीतर त्याची ओवरअ‍ॅक्टींग अन बटबटे डोळे नाही सहन होत कधीच

छान वाटला मुव्ही...एकंदर फील छान होता..
अश्या रहस्यपटात काही इमप्रॅक्टिकल गोष्टी आपण नेहमीच खपवुन घेतो ..
प्रभावळकर मस्त..
अमेय डी३ मधे चांगला वाटायचा.. यात ही फाफे शोभला आहे..
सिद्धार्थ जाधव आणि भुभु पण छान ..
काही विनोदी जागा, डाय्लॉग छान आहेत..

गिरिश कु. वाह आहे.. मस्त वाटला
अमेय फार ठिकाणी सहज वाचतो पण त्याला ही कारणे दिलि आहेत सो ओके..
एकदा बघुच शकतो..

त्यानी सुभाष देसाई पण काहीतरी करुन आणला असता थोडावेळ तर (मला) अजून मजा आली असती.
गिरिश कुलकर्णी भयंकर सॉलिड व्हिलन पोटेन्शियल ठेवून आहे.व्हिलन दिसण्याचा खतर्नाक्पणा चहर्‍यावर अजिबात नसतानाही कसं टेरिफाईन्ग व्हिलन वाटावं हे त्याच्याकडून शिकावं.
(खाली किंचीत स्पॉयलर आहेत.)
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गांडूळ खत वाल्या डायलॉग चं टायमिंग भयंकर आहे.
शिवाय हिंदी पिक्चर ठसा मोडून मैत्रिण, अमोल टेकवडे, आजोबा धोक्यात आहेत हे कळल्यावर फाफे आधी आजोबाना वाचवायला प्रिफर करतो हेही आवडलं.
पोलीसाला 'जमीर को पुकारना',सीसीटिव्ही फुटेज इतक्या सहज कॉलेज पीसी वरुन मिळवणं वगैरे जरा अचाट अतर्क्य.पण काही गोष्टि स्टोरी बनवायला कराव्या लागतात.

केदार जाधव, मराठी सिनेमा आहे म्हणुन काय आवडलं ते लिहायच नाही असं नाही ना?
मला शा.खा, स.खा.चे पिच्चरहि वन टाईम watch चच आवडतात. तसाच हा हि वाटला.
पण बंडल नक्कीच नाही. मराठीतला वेगळा विषय म्हणुन, सगळ्यांच्या अभिनयासाठी नक्कीच पहाण्यासारखा आहे.
'कहानी' शी तर कंपेअर करायचं काहीच कारण नाही.(ज्यांनी कोणी केलय त्यांनी).
तो गांडुळ खतवाला dialogue खरच भयंकर होता.

बघितला शुक्रवारी . फार उच्च वगैरे नाही वाटला .
त्या पोरांच बड्या धेन्डांना ईतक्या सहज भिडणं जरा अ आणि अ वाटलं . काही ठिकाणी फाफेच तर्क लावणं जरा ताणल्यासारखं वाटलं. उदा> "जापूर" वाला सीन .
काही ठिकाणी मात्र श्वास रोखून धरला होता . शेवटचा १०० मार्कांचा प्रशन फाफे खरच कसा सोडवणार असं वाटलं.

अमेय वाघ कुठेही त्रासदायक खुपला नाही .
उलट काही ठिकाणी " ही पर्ण पेठे सारखी पाउट केल्यासारखी तोंड का करते " असा प्रश्न पडला.
गिरिश कुलकर्णी ला १०० मार्क्स . टेरिफाईन्ग . सायको . गांडूळ खताला अनुमोदन.
पुण्याची एरिअल फोटोग्राफी पहिल्यांदाच बघितली. शेवटचं शिवमन्दीर कुठलं होतं . वरून काय मस्त परिसर वाटला तो .

पपे, अवा सोडा. खरा चित्रपट आहे तो गिकुचा. त्याचा वावर, ते विकट, छद्मी हास्य, वाचीक, कायिक अभिनय, परफेक्ट संवादफेक प्रचंड छाप पाडते.
गिकुच्या फॅन्सनी तर पाहिलाच पाहिजे असा सिनेमा.

फाफे पाहिला..
आवडला...
गिरीश कुलकर्णी निव्वळ लाजवाब..
अमेय वाघ अमेझिंग डूड ..
प्रचंड वेगवान पटकथा आणि साजेशी मांडणी..
मुळात मराठीत या जॉनरचा चित्रपट एवढा सही बनू शकतो हेच खूप भारी वाटले..
रेटींग - देखनाईच मांगताय Happy

पुण्याची एरिअल फोटोग्राफी पहिल्यांदाच बघितली.
>> हो हो , हे मलाही जाणवलेल. अगदी मस्त वाटत मंडई वगैरे एरियल व्ह्यू मधून Happy

चांगलं लिहिलं आहे केदार. बघायला हवा सिनेमा.
>> धन्यवाद भास्कराचार्य , नक्की पहा . परफेक्ट नाही , पण खरच चांगला आहे Happy
मी तर फक्त आणि फक्त गिकु वर फोकस करून आणखी एकदा बघणार Wink

अडीच तास आहे पिक्चर.. मुलं निवांत बसून बघतात पिक्चर.. कारण एकदम फस्ट पेस आहे.. एक दोन ठिकाणीच जरा स्लो झालाय.

टॉक्क ! .इथे आणि चेपुवर वाचून चित्रपट पाहूयात असं ठरवलं होतं. तर मस्त आहे एकदम चित्रपट.
काही फ्लॉज जरूर आहेत पण चित्रपट एकदम वेगवान असल्याने बोर झाले नाही. गिकुने मस्त अभिनय केलाय .त्याचा तो बेरकीपणा आणि खुनशीपणा अंगावर येतो. आतापर्यतच्या त्याच्या भूमिकेपेक्षा वेगळा रोल आहे एकदम.
दिलीप प्रभावळकारांचे भारा पण जमलेत . पर्ण पेठे /सिद्धार्थ जाधव ठीक ठाक .
अमेय वाघने फाफे साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय .आणि त्यात तो यशस्वीही झालाय..तुडतुडीत , उड्या मारणारा फाफे त्याने मस्त उभा केलाय .फक्त काही ठिकाणी त्याला शेरलॉक होम्स बनवायचा प्रयत्न केलाय ते खटकलं . तसेच लगेच सहज कुठेही प्रवेश मिळतो हे ही .पण चलता है. हिंदीत असे कितीतरी फ्लॉज खपवून घेतोच.

चित्रपटाची निर्मितमूल्य पण उच्च आहे. भारांचा जो बंगला आहे त्यातली प्रॉपर्टी आवडली .रंग संगतीही सुरेख.
पण मला सगळ्यात आवडलं ते पार्श्वसंगीत . मस्त ट्यून आहे. मोबाईलची रिंगटोन म्हणून कुठे मिळेल ते शोधतेय Lol

चित्रपट मध्यन्तरानन्तर अधिक रंगतो .आपाने घातलेला १०० मार्कांचा प्रश्न फाफे कसा सोडवतो हे पाहायला मजा येते जरी ते सोडवणं परिचित असलं तरीही .त्याच श्रेय पटकथालेखकाला द्यावेच लागेल. एकाच वेळी चित्रपट अचाट आणि अतर्क्य वाटू नये आणि त्याचबरोबर कंटाळवाणा देखील वाटू नये याची पुरेपूर काळजी घेतलीये.

फाफेची पुस्तक डोक्यात ठेवून गेलात तर काही मिळणार नाही. हा फाफे आजच्या युगातील स्मार्टफोन/फेसबुक/गुगल वापरणारा आहे.त्यामुळेच मला वाटत तो बरोबरच्या बच्चेकंपनीला अपील झाला. सब टायटल असल्याने या डायलॉगचा काय अर्थ आहे असे प्रश्न विचारले गेले नाहीत..सगळे शांत बसून बघत होते . काय आवडला का पिक्चर या प्रश्नाला हो sss मजा आली असं उत्तर मिळालं.

अवांतर - वीकडेजला मराठी चित्रपटाला ६.०० चा शोला executive आणि gold हे दोन्ही क्लास भरलेले पाहून टडोपा झालं .
आमच्या पुढच्या रांगेत ओळखीचं गुजराती कुटुंब मुलांबरोबर होतं . त्यांना विचारलं तर बच्चेके क्लासमैं जो मराठी फ्रेंड है उसने ये पिक्चरके बारेमे बताया तो देखने आये असे उत्तर मिळाले.त्यांनी सैराट पण बघितला होता ही अडिशनल माहिती देखील पुरवली Happy

चित्रपट ठिकठाकच आहे. लहानपणी वाचलेले पुस्तक आणि सुमीत राघवचा फाफे खूप आवडलेला.
बाकी, गिरिश कुलकर्णी मस्तच. त्याचा देवुळ इतका आवडलेला... आणि आता हा...

अक्खा चित्रपट, आम्ही मित्र मैत्रीणेंनी ट्टॉक्क.... चे प्रतिध्वनी काढून मजा केली.... त्यात एका बोबड्या मित्राने स्वतःच चँलेज घेतले की तो तसाच आवाज काढून दाखवेल... आणि मूवी बघायच्या एवजी त्यातच प्रँक्टीस करत होता.

काल रात्री पुन्हा एकदा बघितला , फक्त गिकु वर फोकस करून , दुसर्यांदा बघतानाही अजिबात बोअर झाल नाही .
गिकु चेहर्याने काय अभिनय करतो ! सही एकदम .

Pages