संभाजी : येत आहेत

Submitted by मी - सागर on 7 September, 2017 - 02:50

संभाजी : येत आहेत

झी मराठी वर लवकरच वेळ आजून माहीत नाही पण कुठलीतरी शिरेल बंद होणार असा दिसतंय.

Upcoming Sambhaji Maharaj serial teaser

https://www.youtube.com/watch?v=AjKvkh1Qweo

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांची कामं छान वाटत आहेत मला. कालच्या आणि आजच्या एपिसोडमध्ये राजाऊ तर अगदी भाव खाऊन गेली. मला फार आवडली. महाराजांच्या मुली किती देखण्या आहेत दिसायला. Happy

शंभुराजेंची आई म्हणजे सईबाई का? तिला ती दासी किती भडकवते आहे उगाच? आता शंभुराजेंचं लग्न राजाऊ शी झाल्यावर सईबाई वचपा म्हणून तिला पाण्यात पाहणार का येताजाता? ती दासी जाच करवणार का राजाऊ चा?

अरे देवा.. उंच माझा झोका ते अजून चांदरात आहे ते आता ही मालिका. सासूसून वाद, कटकारस्थानं, मानापमान आणि कौटुंबिक कलह दाखवल्याशिवाय झी कोणतीच सिरीयल टेलिकास्ट करू शकत नाही का?

झीच्या पूर्वीच्या मालिका या मानाने खूप प्रगल्भ होत्या असं म्हणावं लागेल नाईलाजाने. आपण नक्की कुठे जातो आहोत?

खरय.पियू. ऐतिहासिक पेक्षा सासु-सुन कटकारस्थान वाटतीये.
संभाजीला ऊगीच डोळे मोठे करावे लागतायत राग आलाय दाखवण़्यासाठी. त्यापेक्षा राजावुचा अभिनय छाने.
सईबाई तर गेल्यात ना? ह्या सोयराबाई ना?

सईबाई तर गेल्यात ना? ह्या सोयराबाई ना?>>>
हो.. सईबाई शंभूराजे बाळ असतानाच गेल्या.. सोयराबाई आणि इतर राणीवसा म्हणजे शंभूराजांच्या सावत्र आई

मागे मी एक फ्लॅशबॅकचा सीन पाहिला ज्यात महाराजांना शंभू राजेंना बघून आठवते की ते पोटात असताना त्यांच्या आईला पण असेच डोहाळे लागले होते आणि त्यांचे पण समाधान होत नव्हते.

आता माझ्या नजरेचा दोष किंवा काय असेल ते.. पण मला त्या आत्ताच्या चिडलेल्या राणी आणि त्या महाराजांसोबत फ्लॅशबॅकमध्ये तलवारबाजी करणाऱ्या कलाकार सेम वाटल्या. कोणी आहे का माझ्यासारखं?

शंभुराजेंची आई म्हणजे सईबाई का? तिला ती दासी किती भडकवते आहे उगाच? >> कुणाबद्दल बोलते आहेस पियू . अरे शंभू राजांची आई सईबाईंच पण त्यांचे निधन शम्भू राजे लहान असतानाच झाले. मालिके मध्ये ज्या दाखवत आहेत त्या सोयराबाई आहेत. शिवाजी राजांना सईबाई धरून एकूण आठ राण्या होत्या . सई बाई वारल्यानंतर शंभू राजांवर जिजाबाई ( आजी ) ने जास्त माया केली त्यानंतर पुतळा बाई यांनी. सुरवाती सुरवातीला सोयराबाई चांगल्याच होत्या पण नंतर नंतर त्या राग राग करायला लागल्या . बाकीच्या राण्यांचा इतिहासात जास्त उल्लेख नाहीये Happy

झालं. राजाऊ उठून दिसावी म्हणून त्या उमादेवींना उगाच आगाऊ आणि गर्विष्ठ दाखवलं आहे. सिरीयल कोणतीही असो.. झीचे फंडे तेच Angry

अगं सुजा.. तुझ्या कमेंटच्या वरची माझी कमेंट वाच ना >> हो ग मी जेव्हा कॉमेंट टायपत होते . त्याच वेळी तुझी कॉमेंट आली असं मला वाटलं पण तस नव्हतं . माझी टायपून ती पोस्ट केल्यावर तुझी कॉमेंट वाचली मी . . असं होत कधी कधी मिस्टिक Wink Happy

शिवाजी राजांना सईबाई धरून एकूण आठ राण्या होत्या >>> सहा होत्या बहुतेक, वाचलंय कुठेतरी.>> नाही अंजु आठ .
गुगलवरून नाव साभार .सईबाई निंबाळकर ,सोयराबाई मॊहिते,पुतळाबाई पालकर ,लक्ष्मीबाई विचारे, काशीबाई जाधव,सगणाबाई शिंदे,गुणवंतीबाई इंगळे आणि सकवारबाई गायकवाड

पियु, सईबाई संभाजी ची आई. ती पहिल्या एपिसोडमधेच गेली. पुर्वा गोखले ने सईबाईंची भुमिका केलेली.
आता शंभुराजांचा राग करणारी राणी सोयराबाई. स्नेहलता वसईकर आहे ती.

शंभुराजेंची आई म्हणजे सईबाई का?>>>> नाही सोयराबाई.
सईबाई पहिल्याच एपि मधे गेलेल्या दाखवल्या आहेत.
Submitted by अंकु on 25 October, 2017 - 09:54

अर्र्र्र्र्र्र्र्र माझा हा प्रतिसाद चुकला. सईबाईनी शंभु बाळाच्या जन्मानंतर गेलेल्या दाखवल्या आहेत,, अनै हे सगळ पहिल्याच एपिसोड मधे दाखवल आहे.अस लिहायला हव होत.

राजाऊ च नाव लग्नानंतर बदलतात का ????ती मुलगी छान दिसते आहे.स्त्री ही तलवार च आहे वगैरे संवाद मात्र लाऊड वाटतात तिच्या तोंडी.
तो काच लपविण्याचा अनि शोधण्याचा खेळ खेळावा अस वाटतय. Proud मात्र नंतर् ची आवराआवरी खुप करत बसावी लागेल.

राजाऊ फारच स्मार्ट आणि गोड. महाराजांची निरीक्षणशक्ती आणि स्मरणशक्ती किती अफाट होती हे छोट्या छोट्या प्रसंगातून दिसतं. पुतळाबाई आणि सोयराबाई सोडल्या तर बाकीचा राणीवसा वयाने अगदीच लहान वाटतो.

मालिका सुरु झाल्यापासून काही ना काही कारणाने एकही भाग पूर्ण पणे मन लावून निवांत पाहता आला नव्हता. कालचा भाग मात्र नीट सलग पाहिला . मस्त वाटला कालचा भाग. कालचा भाग शिवाजी महाराजांच्या मिर्जा राजे जयसिंग यांच्याबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहावर होता.
मिर्जा राजे झालेला कलाकार म्हणजे 'बाजीगर' मधला 'खरा' विकी मल्होत्रा ! सगळ्याच कलाकारांचा कालच्या भागातला अभिनय आवडला. मोघेंनी पण हतबल झालेले राजे आपल्या पाणीदार डोळ्यांनी छान वठवले. या आधीच्या भागांमधे त्याला ओझरतं पाहिलं तेव्हा शिवाजी महाराज म्हणून शोभत नाही असंच वाटलं होतं.
छोट्या शंभूराजांचा त्यांच्या सर्व मातोश्रींचा जगदंबेशी एकरुपता दाखवून देणारा संवाद पण आवडला.
रच्याकने, काल मालिकेत इतका समरस झालो होतो की सहज वाटून गेलं, की मिर्जा राजेंनी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या पकडलेल्या आणि मिर्जाराजेंना वाचून दाखवलेल्या पत्रावर भरवसा ठेवला असता, तर आज इतिहास किती वेगळा असता Sad

रच्याकने, काल मालिकेत इतका समरस झालो होतो की सहज वाटून गेलं, की मिर्जा राजेंनी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या पकडलेल्या आणि मिर्जाराजेंना वाचून दाखवलेल्या पत्रावर भरवसा ठेवला असता, तर आज इतिहास किती वेगळा असता >>>>
हो आणि शंभू राज्यांना ओलीसही ठेवायला नको होत.

आता न चुकता मालिका पाहिली जात आहे. मधला आग्र्याच्या दरबारातला महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात सादर केलं जातं तो एक भाग मात्र चुकला. भाषा, संवाद, काही प्रसंग कधी कधी खटकतात , पण तरीही रोज आवर्जुन पाहिली जाते. सर्वच कलाकारांचं काम आवडतंय. छोटा संभाजी छान काम करतोय. २-३ एपिसोड्स आग्र्यातले प्रसंगच असल्याने येसु दिसली नाही त्यामुळे चुकल्यासारखं वाटलं Happy
कालचा भाग आग्र्यावरुन सुटका या वर होता. फौलाद खान पेटारे तपासतो आणि मग पेटार्‍यातून (!) महाराज बाहेर निघतायत असा कालचा भाग होता.

विषप्रयोगाचे भाग बघितले होते. वाटणीचं काय झालं. काय मागितलं शंभूराजांनी. चहयेद्या मध्ये आली होती टीम. >> कालच झाला वाटणीचा भाग. शंभूराजांनी वाटणी नाही मागितली. मस्त होता कालचा भाग पण..

धन्स स्नेहा. सावत्र आई कशीही वागली तरी शंभूराजे कधीही स्वत:चा तोल सुटू देत नाहीत. नेताजी पालकरांना ते मुसलमानाच्या वेषात ओळखतात व त्यांना ऊलटसुलट प्रश्न विचारतात ईस्लाम धर्माबद्दल, ते सगळी उत्तरे बरोबर देतात पण शेवटी त्यांच्या टोचलेल्या कानावरून शंभूराजे त्यांना ओळखतातच, तोही एपि मस्त होता. वाटणीचा एपि झी५ वर नक्की बघणार.

इथे पाहत नाही का कोणीच हि मालिका ? गेले २-४ दिवस झाले खुप छान चालली आहे.>>>>
म्हणून कोणी लिहीत नाहीये वाटतं . पिसं काढण्यासारखं काहीच नाहीए ना.

चांगलीच आहे हो मालिका. पण नाही बघवली गेली. खरे सांगु का! आतापर्यंत शाळेत इतिहास वाचला, ऐकला. शिवाजी महाराज होते ३०० वर्षापूर्वी, त्यांनी स्वराज्य घडवले. संभाजी राजे होते की शूर वीर, त्यांनी अवघ्या मुघल सत्तेला दमवलं. या विश्वात मी रममाण होते, म्हणजे जणू काही शिवाजी महाराज आणी संभाजी राजे माझ्या जवळ वावरत आहेत, जिवंत आहेत. पण सिरीयल मध्ये जसे अनाजी पंत, मोरोपंत, सोयराबाई यांचे कपट दिसु लागले, महाराजांना विष दिले गेल्याचे बघीतले, संभाजी राजांचे हाल बघीतले, तशी ही मालिका मी गेले ३ दिवस तरी नाही बघीतली. सहन होत नाही, संताप होतो या दोघांचे हे हाल बघुन. पुढे महाराज गेल्यावर तर अजीबात बघवणार नाही, त्यामुळे बघणेच सोडलेय. Sad

सहन होत नाही, संताप होतो या दोघांचे हे हाल बघुन. पुढे महाराज गेल्यावर तर अजीबात बघवणार नाही, त्यामुळे बघणेच सोडलेय. Sad >> हो ना. मलाही महाराजांना विष दिलेले तेव्हा पाहवत नव्हती मालिका.. खरच सहन होत नाही आणी संताप होतो या दोघांचे हे हाल बघुन.

इथे पाहत नाही का कोणीच हि मालिका ? गेले २-४ दिवस झाले खुप छान चालली आहे.>> शक्यतो चुकवत नाही. हि मालिका आवडण्याची कारण म्हणजे त्यात काम करणारे कलाकार छान आहेत, अभिनय हि छान करत आहेत, इतिहासा विषयी आवड. या मालिकेचे आर्ट डायरेक्शन पण मस्त आहे. गोदावरी चा निवाडा, विष प्रयोग, आणि वाटणी चे एपिसोडस् खूप छान. संभाजी राजे वाटणी टाळण्यासाठी जे छोटे प्रेझेन्टेशन देतात, त्यामुळे आजच्या काळातील पाँवर पाँईन्ट प्रेझेन्टेशन ची आठवण येते.
जनरली ज्या मालिका चांगल्या आहेत त्यावर जास्त कमेंट येत नाही. >>
दुर्दैवाने खरयं, पण जे चांगल आहे त्याच कौतुक व्हायला हव.

अनाजी पंत, मोरोपंत, सोयराबाई यांचे कपट दिसु लागले..
सहन होत नाही, संताप होतो या दोघांचे हे हाल बघुन.. +१
मी पण हे सुरू झाल्यावर पहाय्ची सोडली. शिवाजी महाराज गेल्यावर तर अजीबातच बघवणार नव्ह्तं.

Pages