Submitted by अनन्त्_यात्री on 25 October, 2017 - 00:14
जरी अज्ञात देशाचा
किनारा गाठला होता
तरी वारा शिडामधला
जरा खंतावला होता
दूरवरचे दिवे तिथले
झळाळून पेटले होते
तरी अंधार हटवादी
जरा रेंगाळला होता
वितळत्या चंद्रबिंबाने
दशदिशा भारल्या होत्या
तरी त्या चांदरातीचा
कवडसा गोठला होता
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान
छान
आवडली..
आवडली..
व्हीबी, मेघा. प्रतिसादाबद्दल
व्हीबी, मेघा. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
छान खूप सुंदर
छान खूप सुंदर
प्रशांत तिवारी,
प्रशांत तिवारी, प्रतिसादाबद्दल आभार!