कूट प्रश्न

Submitted by सेन्साय on 23 October, 2017 - 14:58

.

.

लाट धावते लाटे मागुनी
तरी किनारा भेटेना
आकाश लोपते आकाशी
तरी क्षितिज भेटेना

माणुसकीच्या वाटा हरवल्या
ओळख कुठे सापडेना
जाती पातीत तो भेदावला
माणूस कुठे मिळेना

होकायंत्र शोधते दिशेला
उत्तर दक्षिण आणि पूर्वेला
उर्ध्वाभिमान अध:महिमान
प्रीत मावळली पश्चिमेला

हीरा छेदितो हीऱ्याला
कर्म काही चुकेना
लोभ भुलवितो लोभाला
चक्रव्यूह काही सुटेना

कूटप्रश्न येथे कायम उरतो
पैसा पैशास का जगतो
श्वास का श्वासास मारतो
आणि...
"मी" फक्त ..
स्वार्थ जोपासतो

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कूटप्रश्न येथे कायम उरतो
पैसा पैशास का जगतो
श्वास का श्वासास मारतो
आणि...
"मी" फक्त ..
स्वार्थ जोपासतो

सुंदर !

<<<कूटप्रश्न येथे कायम उरतो
पैसा पैशास का जगतो
श्वास का श्वासास मारतो
आणि...
"मी" फक्त ..
स्वार्थ जोपासतो>>>
केवळ अप्रतीम...