संधी

Submitted by अतुलअस्मिता on 20 October, 2017 - 11:38

मावळतीचा गंध त्यात
प्रकाशाचा अंधुक दिवा
जगणे जीवन समग्र हे
सावरून साऱ्या जीवा

उगवतीचे रंग सुन्न
त्यात कोळशाची छटा
टिपूसाची झाली वाफ
सावरून साऱ्या बटा

आडोशाचा काजवा मंद
नभोनिळे आवाहन मग
बुबुळी तरंगे उत्कर्ष की
सावरून जळे हीमनग

श्वेत बोचरी केतकी
थांबे शिवालयाच्या पायथी
सुगंधावा जीव सारा
सावरून संसार माथी

Group content visibility: 
Use group defaults

छान सुंदर रचना!
आवडली.
अतुलजी, उगवतीचे रंग सुन्न कसे? Happy