जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण. ११९ देशांमध्ये १०० वा क्रमांक

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 October, 2017 - 18:49

जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण. ११९ देशांमध्ये १०० वा क्रमांक

सविस्तर बातमीची लिंक - http://www.loksatta.com/desh-videsh-news/india-down-45-ranks-since-2014-...

साल २०१४ - भारत ५५ व्या स्थानापर्यंत आलेला.
साल २०१७ - भारताची थेट १०० व्या स्थानावर घसरण झाली आहे.

कसे ठरवतात हा ग्लोबल हंगर ईंडेक्स म्हणजेच जागतिक भूक निर्देशांक याचा थोडा शोध घेतले असता खालील चार निकष सापडले.

1) the proportion of the undernourished as a percentage of the population
2) the proportion of children under the age of five suffering from wasting
3) the proportion of children under the age of five suffering from stunting
4) the mortality rate of children under the age of five.

विकीवरून साभार - https://en.wikipedia.org/wiki/Global_Hunger_Index

भारताबाबत बोलायचे झाल्यास,

- भारतातील बालकांची शारीरिक स्थिती अत्यंत चिंताजनक आहे.
- देशातील पाच वर्षांहून कमी वय असलेल्या एक पंचमांश बालकांचे वजन त्यांच्या उंचीच्या तुलनेत अतिशय कमी आहे.
- एक तृतीयांश बालकांचे वजन त्यांच्या वयाच्या तुलनेत अतिशय कमी आहे.
- भारताचा समावेश गंभीर परिस्थिती असलेल्या देशांच्या यादीत करण्यात आला आहे.

दक्षिण आशिया प्रांताचा विचार केल्यास, भारताची स्थिती केवळ अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या तुलनेत चांगली आहे यात आनंद मानायचा, की बांग्लादेश देखील आपल्या पेक्षा चांगल्या स्थितीत आहे याचे दुख करायचे हे ज्याच्या त्याच्या दृष्टीकोणावर आहे.

मात्र गेल्या तीनच वर्षात ११९ देशांच्या या यादीत ५५ ते थेट १०० व्या क्रमांकापर्यंत घसरण चिंताजनक आहे. देशातील मध्यमवर्ग हळूहळू चंगळवादाकडे वळत असताना त्याच वेळी तळातील वर्ग आणखी गाळात रुततोय. कुठे अच्छे दिन आले आहेत तर कुठे ते आणखी बुरे होत आहेत. आर्थिक विषमतेची दरी जिथे काळागणिक कमी व्हायला हवी तिथे ती वाढत आहे याचेच हे निर्देशांक आहेत. नक्की काय चुकतेय आणि काय करायला हवे? राजकारणाला बाजूला ठेवून चर्चा झाली तर आवडेल. मी स्वत: यातला काही तज्ञ नाहीये, ना अभ्यासू लेखक आहे. पण डोळ्याला आसपास जे जाणवतेय तेच आज कुठेतरी आकड्यात उमटलेले दिसले म्हणून ईथे मांडले, धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोदी लहानपणी गरिब होते .त्यातूनच ते घडले.म्हणून मोदी प्रत्येकाच्या व्यक्तीमत्व विकासासाठी लोकांना गरिब करत आहेत.यालाच म्हणायचे अच्छे दीन.

2014, India’s ranking on this index was 55th, but at that time only 76 countries were included in the ranking.
In the Global Hunger Index in 2017, he said, 44 countries which were not part of the index in 2014 and which have always had better development indices compared to India, have been included.

From here -
http://indianexpress.com/article/india/global-hunger-index-ranking-bjp-a...

खुद्द भारत सरकारने, भारतातल्या परिस्थितीत, वयोमानाप्रमाणे वजन, उंची किती असायला पाहिजे याची काही प्रमाणे केली आहेत का?
पुष्कळदा कुठल्यातरी इंग्लंड, अमेरिकेतल्या मुलांची वजने, उंची प्रमाण धरून ही तुलना केली जाते.
नि मग अमेरिकेतले मूर्ख लोक स्वतःचा उदारपणा दाखवायला भारतातल्या कुणा श्रीमंत मुलाच्या शाळेला बायबल भेट देतील.

खरे तर मनुष्याचे खरे बळ त्याच्या नुसत्याच वजन उंची पेक्षा ज्ञानावर सुद्धा अवलंबून असते. म्हणूनच भारतातले थोर पुरुष, स्त्रिया इ. त्यांच्या ज्ञानाबद्दल, त्यांच्या जगाला उपयोगी पडण्याच्या कार्याबद्दल प्रसिद्ध आहेत, वजन, उंची बद्दल नाही.

खरे तर मनुष्याचे खरे बळ त्याच्या नुसत्याच वजन उंची पेक्षा ज्ञानावर सुद्धा अवलंबून असते.

>>>>>

जिथे लोकांना किमान भूक भागवायला पोटभर अन्न मिळतेय की नाही हा विषय आहे तिथे आपण बळ मिळवायच्या गप्पा करत आहात.

हे वाचा,

विश्व खाद्य दिवस: दुनिया में भूखे लोगों की क़रीब 23 फ़ीसदी आबादी भारत में रहती है
http://dhunt.in/2YjFG
via NewsHunt.com