दशहरा काही दंतकथा

Submitted by अविनाश जोशी on 7 October, 2017 - 04:05

दशहरा काही दंतकथा

माझ्या एका लेखात दसऱ्याला दशहरा हा शब्द वापरला आहे. शब्द वापरताना मला विशेष काही वाटले नाही पण काहींना तो शब्द खटकला. दशहरा हा शब्द संस्कृत असून व्युत्पत्ती शास्त्राप्रमाणे त्याचे दोन अर्थ होतात.

दश (दहावा)+ अहर (पाय मोडता अ आहे) अर्थ दिवस = दहावा दिवस
दुश (अपभ्रश) दुष्ट, पापी, पाप + हर (नष्ट करणे, निर्मूलन करणे) = वाईट गोष्टींचा नाश

त्यामुळे दशहरा शब्दाला अजून काही किनार नसावी
दसऱ्याच्या दंतकथांबद्दल काहींनी विचारले आहे. मला माहिती असलेल्या पाच खालील प्रमाणे ..
१. महिषसुराचा वध
ही कथा बहुतेक सर्वांनाच माहिती आहे. बंदासुर दैत्य आणि त्याचे दोन सरदार चंडा आणि मुंडा हे अतिशय त्रासदायक ठरल्यावर दुर्गेने कालीचे रूप घेतले. बंडासुर हा महिष (रेडा) स्वरूपात वावरत असल्याने त्याला महिषसूर म्हणत. आणि याच नावावरून त्याच्या गावाला म्हैसूर असे नाव पडले अशी आख्यायिका आहे. नऊ दिवस आणि नऊ रात्रीच्या घनघोर युद्धानंतर कालीने राक्षसांचा एका टेकडीवर वध केला. ज्या टेकडीवर वध केला त्या टेकडीला चामुंडा हिल्स आणि देवीला चामुंडेश्वरी नाव पडले. आणि हा दिवस विजयादशमी किंवा दशहरा म्हणून प्रसिद्ध झाला. वाडियार कुटूंबाची (म्हैसूरचे राजघराणे ) चामुंडेश्वरी कुलदैवत झाली . आणि या कारणामुळेच म्हैसूरचा दशहरा अत्यंत उत्साहात साजरा होतो.
२. राम रावण युद्ध
रामाने नऊ दिवस देवीची आराधना केली आणि नऊ दिवसाच्या युद्धानंतर रावणाचा वध केला. तो दिवस म्हणजे विजयादशमी.
३. पांडवांचा अज्ञातवास
जुगारात हरल्यामुळे पांडवांना बारा वर्ष वनवासानंतर एक वर्ष अज्ञातवासात जायचे होते. विराट नगरीत अज्ञातवास करताना पांडवांनी शस्त्रे वन्नी (शमी) च्या झाडावर लपून ठेवली होती. अज्ञातवास सपंतांना विराट राजाचे गोधन कौरव पळवून नेत होते. पांडवांनी वन्नीच्या झाडाची पूजा करून शस्त्रे काढली आणि विराट राजाला गोधन परत मिळवून दिले. तो दिवस म्हणजे दसरा.
म्हैसूरचे वडियार राजघराणे स्वतःला पांडवांचे/यादवांचे वंशज समजतात आणि त्यामुळे बहुतेक समारंभात शमीच्या झाडाची पूजा होते.
इथे एक वडियार कुटुंबाची चमत्कारिक हकीकत आठवली म्हणून सांगतो . वडियार राजाने तिरुमला राजाला मारून त्याचे राज्य घेतले. त्याच्या बायकोला अलमेलम्मा दागिने काढायला भाग पाडले तिने कड्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आणि मरताना शाप दिला की म्हैसूरच्या राजघराण्याला मुलं होणार नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या चारशे वर्षात बहुतेक वेळेला दत्तक पुत्र घेऊनच म्हैसूरचे राजघराणे चालू आहे. .
४. कौत्साची गुरुदक्षिणा
कौत्स नावाचा देवदत्त ब्राम्हणांचा मुलगा होता. तो वरतंतू नावाच्या गुरुकडे पैठणला शिक्षण घेत होता. चौदा वर्षाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कौत्साने गुरुदक्षिणा द्यायची इच्छा व्यक्त केली. वरतंतूने पहिल्यांदा नकार दिला पण नंतर कौत्साची परीक्षा घेण्यासाठी गुरुदक्षिणा मागितली. प्रत्येक वर्षाच्या शिक्षण पोटी एक कोटी सुवर्ण मोहरा अशा चौदा कोटी सुवर्ण मुद्रा त्याने मागितल्या. कौत्स रघुराजाकडे गेला. रघु राजा हा दानशूर म्हणून प्रसिद्ध होता कौत्साने त्याच्याकडे चौदा कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या.
रघुराजाने नुकताच विश्वजीत यज्ञ करून सर्व संपत्तीचे दान केले होते. त्याने कौत्साकडे तीन दिवसाचा वेळ मागितला आणि इंद्रावर स्वारी करून सुवर्ण मुद्रा मिळवायचे ठरवले. इंद्राला हे समजताच त्याने कुबेराला शमी आणि आपट्याच्या झाडावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव करायला सांगितलं. त्या संपूर्ण सुवर्ण मुद्रा घेऊन कौत्स वरतंतू कडे गेला. पण त्याने चौदा कोटीं चं सुवर्णमुद्रा ठेऊन घेतल्या कौत्साने उरलेल्या सुवर्णमुद्रा गोरगरिबांना वाटल्या. तेव्हा पासून आपट्याची पानं सोने म्हणून देण्याची प्रथा आहे.
५. गायत्री देवीची बारा वर्षे तपस्या केल्यानंतर ही ती प्रसन्न न झाल्यामुळे शंकराचार्यांनी तपस्या सोडायचे ठरवले. ते उठणार तोपर्यंत त्यांना गायत्री देवीची मागून हाक ऐकू आली. शंकराचार्य तिला म्हणाले इतका वेळ तू आली नाहीस आता येऊन काय उपयोग? गायत्री देवी म्हणाली मागे वळून पहा त्यांनी मागे वळून पहिले तर जंगले आणि डोंगरांनी प्रदेश व्याप्त होता. गायत्री त्यांना म्हणाली तुझी पहिली हाक एकल्यावरच मी निघाले होते पण तुझ्या गत जन्माची पापे ओलांडेपर्यंत माझा एवढा वेळ गेला. त्यानंतर शंकराचार्यांनी गरजू लोकांकरिता सुवर्णवर्षाव करायला सांगितला. दंत कथेनुसार हा वर्षाव आपट्याच्या झाडावर झाला त्यामुळे आपट्याला सोने म्हणायची पद्धत झाली. (शन्कराचार्याच्या ऐवजी दुसरे नाव असण्याची शक्यता आहे.) उप दंत कथेत सुवर्णवर्षाव आवळ्याच्या स्वरूपात झाला .
लेखन सीमा

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आ. रा.रा. साहेब
म्हणण्याचा उद्देश इतकाच होता की, जिथे मऊ लागतं तिथे लोकं कोपराने खणायला लागतात.

तुम्ही काहीही म्हणा हो. एकूण एकच.
रावणाला पुजणारे लोक आहेत भारतात. तेही शेकडो वर्षांपासून.
रावण जो देव आहे त्याच्याबद्दल नको नको ते बोलून कोपरापासून खणणारे आहेतच ना?

Pages