दशहरा काही दंतकथा

Submitted by अविनाश जोशी on 7 October, 2017 - 04:05

दशहरा काही दंतकथा

माझ्या एका लेखात दसऱ्याला दशहरा हा शब्द वापरला आहे. शब्द वापरताना मला विशेष काही वाटले नाही पण काहींना तो शब्द खटकला. दशहरा हा शब्द संस्कृत असून व्युत्पत्ती शास्त्राप्रमाणे त्याचे दोन अर्थ होतात.

दश (दहावा)+ अहर (पाय मोडता अ आहे) अर्थ दिवस = दहावा दिवस
दुश (अपभ्रश) दुष्ट, पापी, पाप + हर (नष्ट करणे, निर्मूलन करणे) = वाईट गोष्टींचा नाश

त्यामुळे दशहरा शब्दाला अजून काही किनार नसावी
दसऱ्याच्या दंतकथांबद्दल काहींनी विचारले आहे. मला माहिती असलेल्या पाच खालील प्रमाणे ..
१. महिषसुराचा वध
ही कथा बहुतेक सर्वांनाच माहिती आहे. बंदासुर दैत्य आणि त्याचे दोन सरदार चंडा आणि मुंडा हे अतिशय त्रासदायक ठरल्यावर दुर्गेने कालीचे रूप घेतले. बंडासुर हा महिष (रेडा) स्वरूपात वावरत असल्याने त्याला महिषसूर म्हणत. आणि याच नावावरून त्याच्या गावाला म्हैसूर असे नाव पडले अशी आख्यायिका आहे. नऊ दिवस आणि नऊ रात्रीच्या घनघोर युद्धानंतर कालीने राक्षसांचा एका टेकडीवर वध केला. ज्या टेकडीवर वध केला त्या टेकडीला चामुंडा हिल्स आणि देवीला चामुंडेश्वरी नाव पडले. आणि हा दिवस विजयादशमी किंवा दशहरा म्हणून प्रसिद्ध झाला. वाडियार कुटूंबाची (म्हैसूरचे राजघराणे ) चामुंडेश्वरी कुलदैवत झाली . आणि या कारणामुळेच म्हैसूरचा दशहरा अत्यंत उत्साहात साजरा होतो.
२. राम रावण युद्ध
रामाने नऊ दिवस देवीची आराधना केली आणि नऊ दिवसाच्या युद्धानंतर रावणाचा वध केला. तो दिवस म्हणजे विजयादशमी.
३. पांडवांचा अज्ञातवास
जुगारात हरल्यामुळे पांडवांना बारा वर्ष वनवासानंतर एक वर्ष अज्ञातवासात जायचे होते. विराट नगरीत अज्ञातवास करताना पांडवांनी शस्त्रे वन्नी (शमी) च्या झाडावर लपून ठेवली होती. अज्ञातवास सपंतांना विराट राजाचे गोधन कौरव पळवून नेत होते. पांडवांनी वन्नीच्या झाडाची पूजा करून शस्त्रे काढली आणि विराट राजाला गोधन परत मिळवून दिले. तो दिवस म्हणजे दसरा.
म्हैसूरचे वडियार राजघराणे स्वतःला पांडवांचे/यादवांचे वंशज समजतात आणि त्यामुळे बहुतेक समारंभात शमीच्या झाडाची पूजा होते.
इथे एक वडियार कुटुंबाची चमत्कारिक हकीकत आठवली म्हणून सांगतो . वडियार राजाने तिरुमला राजाला मारून त्याचे राज्य घेतले. त्याच्या बायकोला अलमेलम्मा दागिने काढायला भाग पाडले तिने कड्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आणि मरताना शाप दिला की म्हैसूरच्या राजघराण्याला मुलं होणार नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या चारशे वर्षात बहुतेक वेळेला दत्तक पुत्र घेऊनच म्हैसूरचे राजघराणे चालू आहे. .
४. कौत्साची गुरुदक्षिणा
कौत्स नावाचा देवदत्त ब्राम्हणांचा मुलगा होता. तो वरतंतू नावाच्या गुरुकडे पैठणला शिक्षण घेत होता. चौदा वर्षाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कौत्साने गुरुदक्षिणा द्यायची इच्छा व्यक्त केली. वरतंतूने पहिल्यांदा नकार दिला पण नंतर कौत्साची परीक्षा घेण्यासाठी गुरुदक्षिणा मागितली. प्रत्येक वर्षाच्या शिक्षण पोटी एक कोटी सुवर्ण मोहरा अशा चौदा कोटी सुवर्ण मुद्रा त्याने मागितल्या. कौत्स रघुराजाकडे गेला. रघु राजा हा दानशूर म्हणून प्रसिद्ध होता कौत्साने त्याच्याकडे चौदा कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या.
रघुराजाने नुकताच विश्वजीत यज्ञ करून सर्व संपत्तीचे दान केले होते. त्याने कौत्साकडे तीन दिवसाचा वेळ मागितला आणि इंद्रावर स्वारी करून सुवर्ण मुद्रा मिळवायचे ठरवले. इंद्राला हे समजताच त्याने कुबेराला शमी आणि आपट्याच्या झाडावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव करायला सांगितलं. त्या संपूर्ण सुवर्ण मुद्रा घेऊन कौत्स वरतंतू कडे गेला. पण त्याने चौदा कोटीं चं सुवर्णमुद्रा ठेऊन घेतल्या कौत्साने उरलेल्या सुवर्णमुद्रा गोरगरिबांना वाटल्या. तेव्हा पासून आपट्याची पानं सोने म्हणून देण्याची प्रथा आहे.
५. गायत्री देवीची बारा वर्षे तपस्या केल्यानंतर ही ती प्रसन्न न झाल्यामुळे शंकराचार्यांनी तपस्या सोडायचे ठरवले. ते उठणार तोपर्यंत त्यांना गायत्री देवीची मागून हाक ऐकू आली. शंकराचार्य तिला म्हणाले इतका वेळ तू आली नाहीस आता येऊन काय उपयोग? गायत्री देवी म्हणाली मागे वळून पहा त्यांनी मागे वळून पहिले तर जंगले आणि डोंगरांनी प्रदेश व्याप्त होता. गायत्री त्यांना म्हणाली तुझी पहिली हाक एकल्यावरच मी निघाले होते पण तुझ्या गत जन्माची पापे ओलांडेपर्यंत माझा एवढा वेळ गेला. त्यानंतर शंकराचार्यांनी गरजू लोकांकरिता सुवर्णवर्षाव करायला सांगितला. दंत कथेनुसार हा वर्षाव आपट्याच्या झाडावर झाला त्यामुळे आपट्याला सोने म्हणायची पद्धत झाली. (शन्कराचार्याच्या ऐवजी दुसरे नाव असण्याची शक्यता आहे.) उप दंत कथेत सुवर्णवर्षाव आवळ्याच्या स्वरूपात झाला .
लेखन सीमा

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुबेर हिमालयातला असेल तर भारत - नेपाळ कडे पेटंट जाते पहिल्या विमानाचे. सीमारेषा निश्चित केल्या की नेमका भारत की नेपाळ कळू शकेल.

सीताशुद्धी नी बिभीषणाला १३ दिवसांचे सुतक - हे मला लॉजिकल वाटते.

पुढे कुबेर पण पळून गेला त्यामुळे टेकनोलॉजि चे काय झाले ते कळले नाही>>>>>

ती टेक्नोलोजि एकोणिसाव्या शतकात गिरगावात सापडली.

बरं,
रामावतारावर थोडा ब्रेक घेऊन मूळ महिषासुरमर्दिनी च्या गोष्टी कडे वळू,

ही देवी, सर्व देवांचे तेज एकत्र करून बनली होती,
>>>
तया तेजांचें अभ्यंतरीं ॥ येकी उदेली खेचरी ॥ जे आद्यशक्ती आदिकुमरी ॥ योगनिद्रा ॥४६॥
रुद्रापासाव तिचें वदन ॥ सौम्यदेवापासाव स्तन ॥ तिन्हीअग्नींपासाव नयन ॥ जाणा तयेचे ॥४७॥
यमरायापासाव केश ॥ विष्णुतेजाचे बाहु निर्दोष ॥ वरुणापासाव घोर वास ॥ जाहलें राया ॥४८॥
नितंब तो देवतेजांशु ॥ इंद्राचा दंडप्रदेशु ॥ करांगुळिया अष्टवसु ॥ सूर्य अंगोळिका ॥४९॥
विरंचीपासाव चरण ॥ वायुतेजाचे जाहले श्रवण ॥ प्रजापतीचे दिव्यदशन ॥ नासिक कुबेराचें ॥ ॥५०॥
आणिक अन्यतेजांचें सहज ॥ सर्वदेवांचें रुपबीज ॥ तें पाहतहोते ठेले चोज ॥ ब्रह्मादिसर्व ॥५१।।
>>>>>
एक एक देवाच्या अंशतेजा पासून हीचा एक एक अवयव बनला आहे,
म्हणजेच प्राचीन काळी फक्त टेस्टट्युब बेबी बनवायचे तंत्रच अवगत होते असे नाही, तर ऑन डिमांड बेबी बनवायचे तंत्र वापरात होते,
म्हणजे आजच्या काळात सुश सारखे नाक, ऐश्वर्या सारखे डोळे, माधुरी सारखी जीवणी वगैरे स्पेसिफिकेशन घेऊन बाळ जन्माला घालू शकतो ( ती टेकनोलॉजि लिंगनिरपेक्ष असावी, त्यामुळे इतर पॅरामिटर घेऊन मेल बेबी जन्माला घालू शकू कदाचित)

चामुंडा हिल्स च्या आसपास उत्खनन केले तर कदाचित मूळ संहिता मिळू शकेल

http://www.newsleakcentre.com/news/goggle-map-taking-२1-days-to-travel-from-srilanka-to-ayodhya-whats-the-connection-between-dusshera-and-diwali-days/

गुगल मॅप नुसार श्रीलंकेहून अयोध्येला जायला २१ दिवस लागतात. हा योगायोग नक्कीच नसावा.

रामाने बरे श्रीलंकेतून विमान मिळवले, नाहीतर आम्हाला ८०००० कोटी कर्ज काढून बुलेट ट्रेन आणावी लागतेय.
बाकी मला पण ते सीताशुद्धी, विभिषणाचे सुतक वगैरे चे लॉजिक पटले.
अयोध्येला जाताना बहुतेक किष्किंधेला पण भेट दिली असावी. सुग्रीवाला तिथे ड्रॉप देऊन, बालीच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पन करुन मग पुढे अयोध्येला गेले असावेत.

एव्हढ्या सगळ्या प्रवासाची वर्णने ऐकूनच भूक लागली.
तर आता दसर्‍याला कोणती पक्वान्ने खाण्याची प्रथा आहे याचीहि चर्चा व्हावी.
माझ्या आठवणीत श्रीखंड पुरी असे.
आ़जकाल चिकन टिक्का नि लँब रोगन जोश खात असतील. आधी भरपूर स्कॉच, रम, सिंगल माल्ट होत असणारच!!
काय आहे, कालमानाप्रमाणे जुन्या चालिरिती टाकून नव्या प्रथा सुरु केल्या पाहिजेत म्हणजे धर्माची नि समाजाची प्रगति होते.

दसऱ्याच्या भोवती असणाऱ्या कथांचा गुंता पहिल्या वर दसर्याला जिलेबी असणे संयुक्तिक वाटते,
किंवा मग सुत्तरफेणी

एकंदरीत रामाला घरी जायची फार घाई होती असे दिसत नाही. इतके लांब आलोच आहोत तर सगळी कामे करून जाऊ असा उद्देदश असणार.
कारण राम त्यानंतर कधीच दक्षिणेत आला नाही ना त्यांचे कुणी वंशज. इतकेच काय महाभारतात अठरा अक्षोहानी सैन्य मारले गेले पण राज्य विस्तारला कुणीही नर्मदेच्या खाली आले नाहीत.

काय कारण असावे?

<<<<दसऱ्याच्या भोवती असणाऱ्या कथांचा गुंता पहिल्या वर दसर्याला जिलेबी असणे संयुक्तिक वाटते,
किंवा मग सुत्तरफेणी>>>

पण करायला श्रीखंड सोपे,

गेले पण राज्य विस्तारला कुणीही नर्मदेच्या खाली आले नाहीत.>>>>
तेंव्हा ट्रेकिंग/हायकींग एव्हढे प्रसिद्ध नसल्याने दंडकारण्यात फिरण्यासाठी कारण नसावे बहुतेक.

इतकेच काय महाभारतात अठरा अक्षोहानी सैन्य मारले गेले पण राज्य विस्तारला कुणीही नर्मदेच्या खाली आले नाहीत.

>>> धसका घेतला असेल हो बायका पळवणार्‍यांचा....

Lava and Kusha - They were the twin sons of Rama and his wife Sita. Lava ruled south Kosala while Kusha ruled north Kosala, including Ayodhya. Kusha married "Nagkanya" Kumuddhati", sister of Kumuda. After Kusha the following kings of the solar dynasty ruled Ayodhya:
Śuddhodana
Sumitra - He was the last king of Ayodhya from Raghuwanshi dynasty. In the fourth century BC, emperor Mahapadma Nanda of the Nanda Dynasty forced Sumitra to leave Ayodhya. He went to Rohtas with his sons. His son Kurma established his rule over Rohtas

. Lava ruled south Kosala while Kusha ruled north Kosala, >>>>
हे कोसल देश कुठेसा आला हो?
1) कोसलांची कौसल्या, म्हणजे रामाची मुले आजीच्या देश वर राज्य करत होती-----> रामा कडे कोसल देश होता----->तो त्याने लढून घेतला नाही असे मानले, तर याचा अर्थ प्राचीन संस्कृतीत मुलीच्या वाट्याला संपत्तीचा हिस्सा येत असे, म्हणून कोसल देश आधी कौसल्येस, मग रामास आणि मग लव कुशास मिळाला,

2)लाहोर शहर लवाने वसवले म्हणतात, म्हणजे कोसल देश = आजचा पाकिस्तान/पंजाब का?

निरागस विनोद निरागस असतात, पण ऑफेन्ड होणारे कशानेही ऑफेन्ड होऊन रिअ‍ॅक्ट होतात. ते अयोग्य वाटते.

असं असतं का? म्हणजे अमुक विनोद हा टवाळवर्गीय आहे हे खुद्द टवाळवर्गीय असल्याशिवाय समजत असेल काय? >>> तुमच्याबद्दल कोणताही आकस नाही पण तुमच्याकडुन अभ्यासु प्रतिसादाची अपेक्षा असते नेहमी, बाकी वरचा प्रतिसाद तुम्हाला अजुनही चांगला वाटत असेल तर सही जा रहे हो. राग नसावा प्रतिसाद संपादित करतोय धन्यवाद शुभरात्री Happy

तुमच्याबद्दल कोणताही आकस नाही पण तुमच्याकडुन अभ्यासु प्रतिसादाची अपेक्षा असते नेहमी,
>> ह्याबद्दल मनापासून धन्यवाद! पण मी एकाच छापाच्या भूमिकेत अडकणारा माणूस नाही. तेव्हा कधीमधी होणार्‍या, झालेल्या, होऊ शकणार्‍या अपेक्षाभंगाबद्दल क्षमस्व.

आ़जकाल चिकन टिक्का नि लँब रोगन जोश खात असतील. आधी भरपूर स्कॉच, रम, सिंगल माल्ट होत असणारच!!
<<
तांदुळात घालून मसाल्यांसह शिजवलेले हरणाचे मांस, हा बिर्‍याणीचा सर्वात प्राचीन डॉक्युमेंटेड प्रकार रामायणात वर्णन कलेला आहे, अन त्या बिर्याणीपायीच सीतेने रामाला कांचनमृगापाठी पाठवले. चोळी बिळी नंतर शाकाहार्‍यांनी घुसडली आहे त्यात.

२. राम रावण युद्ध
रामाने नऊ दिवस देवीची आराधना केली आणि नऊ दिवसाच्या युद्धानंतर रावणाचा वध केला. तो दिवस म्हणजे विजयादशमी.
<<
काय कल्ला नाय.
९ दिवस आराधना, प्लस ९ दिवस युद्ध. एकूण १८ झाले ना? प्लस "नंतर" = एकूणीस.

तांदुळात घालून मसाल्यांसह शिजवलेले हरणाचे मांस, हा बिर्‍याणीचा सर्वात प्राचीन डॉक्युमेंटेड प्रकार रामायणात वर्णन कलेला आहे, अन त्या बिर्याणीपायीच सीतेने रामाला कांचनमृगापाठी पाठवले. चोळी बिळी नंतर शाकाहार्‍यांनी घुसडली आहे त्यात.>>> संदर्भ आहे का??
तेहि बन निकट दसानन गयऊ | तब मारीच कपट मृग भयऊ ||
अति बिचित्र कछु बरनी न जाई | कनक देह मनि रचित बनायीं ||
सीता परम रुचिर मृग देखा | अंग अंग सुमनोहर बेषा ||
सुनहु देव रघुबीर कृपाला | एही मृग कर अति सुन्दर छाला ||
सत्य संध प्रभु बधि करि एही | आनहु चर्म कहति बैदेही ||
संदर्भ तुलसी रामायण
------------------------------------------------------
जीवन् न यदि ते अभ्येति ग्रहणम् मृग सत्तमः |
अजिनम् नरशार्दूल रुचिरम् तु भविष्यति
संदर्भ वाल्मिकी रामायण,अरण्यकांड अध्याय ४३
दोन्हिंचा अर्थ एकच सीतेला ते सुवर्ण हरीण हवे होते त्यासाठी तिने रामाकडे हट्ट धरला. यात कोठेही संस्क्रुत मध्ये लिहिले नाही की तिला बिर्याणी हवी होती. Happy

<परम रुचिर मृग>
रुचिर म्हणजे काय? Wink

जिवंत हाती आला नाही, तर सुंदर मृगाजिनाचं सीट कव्हर बनवूया ? असा अर्थ आहे होय?

मंदार दिलीप जोशी,
"कोणीही संस्कृत ग्रंथाचा हवाला देऊन काही सांगू लागले की आपण फक्त मूळ श्लोक कोट करायला सांगायचा,...." हे आठवले.

-----------पण हरणाचा जीव न घेता, हत्या न करता थोडक्यात निष्पाप जीवाची हत्या न करता चामडं मिळवण्याची कोणती पद्धत रामायणात आहे का सांगितलेली? तेही कळवा.

सुदर्शन राजाने हे नवरात्रीचे व्रत केले आणि देवीने त्याला कौशल राज्य दिले . ह्याच्याच वंशात रामाचा जन्म झाला.
सुदर्शन
अग्निवर्ण
शीघ्रग
मरू
प्रशुश्रुवा
अंबरीश
नहुष
ययाती
नाभाग
अजा
दशरथ
राम
अशी वनशावळ आहे. कौशल ची राजधानी अयोध्या

-पण हरणाचा जीव न घेता, हत्या न करता थोडक्यात निष्पाप जीवाची हत्या न करता चामडं मिळवण्याची कोणती पद्धत रामायणात आहे का सांगितलेली? तेही कळवा.>> रामाने त्या हरणाला तेव्हाच बाण मारला जेव्हा मारिच ने रामाच्या आवाजात लक्ष्मणाला हाक मारली
बादवे गोहत्येचे समर्थन करणार्‍यांना हरिण कस काय निष्पाप वाटत कळत नाही. Happy

राम लक्ष्मण आणि सीता वनवासात काय खात होते भाऊ?

कंदमुळे खाऊन राह्यला ते काय ऋषीमुनी होते का? का देवाला काहीही चालत होता.

Pages