The Fire Triangle

Submitted by सेन्साय on 6 October, 2017 - 07:31

.

.

आग.... विधात्याने सर्जनशीलतेसाठी, मानवी जीवन विकासासाठी निर्माण केलेले पंच महाभूतापैकी एक महत्वाचे तत्व. ह्या अग्नीचा आपल्या सोयीसाठी वापर करायला शिकला तो क्षण मानवी उत्क्रांतीतील महत्वाचा टप्पा ठरला आणि मग निसर्ग साखळीत नगण्य असलेल्या ह्या मानवाने आपला ठसा अख्ख्या सृष्टीवर उमटवत दबदबा निर्माण करून ठेवला तो आजतागायत कायम आहे. आदिम मानव जी गोष्ट अनुभवातून शिकला ती आपण आजच्या आधुनिक युगात का बरं विसरत चाललो आहोत हा प्रश्न मला कधीकधी पडतो; जेव्हा अनेक भयावह विचार प्रवृत्तीच्या घटना वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर आजूबाजूला घडत असताना पाहायला मिळतात, वृत्तपत्रात वाचायला मिळतात !

आग म्हटलं कि त्यासाठी तीन महत्वाचे घटक कार्यरत असतात - प्राणवायू, उष्णता आणि इंधन.

पुरेसा प्राणवायू (ऑक्सिजन) असेल आणि त्या पदार्थाचा ज्वलन बिंदू साधला जाईल एवढी उष्णता निर्माण होणारे / करणारे इंधन (ज्वालाग्राही पदार्थ) उपलब्ध असेल तरच आग लागू शकते. म्हणजेच येथे एक गोष्ट लक्षात घेता येईल कि ह्या तीनपैकी एकाही गोष्टीचा अभाव आग लागण्यासाठी अडथळा ठरू शकतो.

.

.
ह्या आगीचा राक्षस आपल्याला कसा गिळत राहतो त्याची थोडक्यात उदाहरणे पाहूया.

१) मानवी हिंसा / खून -
कित्येकवेळा आपण वाचतो/पाहतो कि अगदी शुल्लकशा कारणातून बाचाबाचीचे रुपांतर त्यातील एकाच्या हत्येत घडले, कोण कोणाला चाकूने भोसकतो तर अजून कोणी अतिशय थंड डोक्याने गळा चिरून ठार मारतो. अतिशय प्रखर क्रोधाचे प्रागटय बहुतांश अश्या हिंसेमध्ये होत असते. आगीच्या त्रिकोणातील तीन गोष्टी येथे कश्या कार्यरत झाल्या ते पाहूया.

ऑक्सिजन - समोरची व्यक्ती माझी शत्रू आहे हे भय
इंधन -परस्पर विरोधी विचारांनी भरलेली दोघांची मने
ज्वलन बिंदू - अहंकार दुखावला जाईल अशी घटना आणि त्याअनुषंगाने वाद प्रतिवाद

सामंजस्य दाखवत ह्यातील एकही घटक तात्पुरता बाजूला केला गेला तर नक्कीच हि हिंसा टळू शकते.

२) बलात्कार /स्त्रिया किंवा लहान मुलांवरील अत्याचार -
युद्ध असो कि दंगल, प्रतीपक्षाला हिणवण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्या समुदायातील स्त्रियांवरील अत्याचार. अश्या सामुहिक घटनेत दुर्बल पक्ष असहाय ठरू शकतो आणि काही थोर अपवाद सोडता प्रबळ पक्ष अनेकदा ह्या नीच मार्गाचे अनुसरण करत राहतो. ह्या सामुदायिक घटनांत कदाचित वरील नियम नीटसा मांडता येणे कठीण आहे पण वैयक्तिक पातळीवर नक्की काय घडते त्या नराधमाच्या मनात जेव्हा तो संध्याकाळी शाळेतून घरी एकट्या जाणाऱ्या छोट्या मुलास किंवा रात्री ऑफिसवरून घरी परतत असलेल्या महिलेस जबरदस्तीने आपल्या वासनापूर्तीसाठी उपभोगू लागतो. येथे सुद्धा खरं तर हा आगीचा त्रिकोण कार्यरत असतोच म्हणूनच त्याचे तीन घटक एकत्र आले तरच अश्या दुर्दैवी घटना घडत असतात. आगीच्या त्रिकोणातील तीन गोष्टी येथे कसा प्रभाव दाखवतात ते पाहूया.

ऑक्सिजन - अश्लील चर्चा, वाचन किंवा मुव्ही वगैरे सतत पाहणे. ह्यांच्या विखारी नजरेत कमकुवत सावज येते तेव्हा आग भडकण्यास पुरेसा ऑक्सिजन मिळालेला असतो.
इंधन - भावना विरहीत असंस्कारित मन / मानवी स्त्री म्हणजे निव्वळ एक मादी अशी मिळालेली चुकीची शिकवण.
ज्वलन बिंदू - एकटी स्त्री निर्जन स्थळी दिसताच तिच्या असहाय्यतेची झालेली विकृत जाणिव.

येथे ह्या दुराचाऱ्यानी स्वतःहून ह्यातील कुठलाही एक घटक टाळणे खचितच शक्य होईल असे वाटत नाही म्हणजेच येथे आपल्याला काळजी घायला पाहिजे कि माझ्यावर हा दुर्धर प्रसंग येवू नये अर्थात ह्या आगीचा त्रिकोण पूर्ण होऊ नये म्हणून मी काय काय करू शकणार आहे ! त्या निच व्यक्तिला मिळणारा ऑक्सिजन थांबवायचा तर मला माझं कमकुवतपण दाखवता कामा नये, म्हणजेच मला strong असले पाहिजे शरीराने आणि मनाने .... जे मला कराटे किंवा तत्सम मार्गाने साध्य करता येऊ शकते. आपण कोणाचं मन बदलू शकत नाही त्यामुळे येथे इंधनावर काही लक्ष न देता ज्वलन बिंदू टाळता कसा येईल हे पाहणेच इष्ट !

३) व्यसनाधीनता -
व्यसन हे काही फक्त दारू सिगारेट अफू गांजा असेच नसते तर जे जे काही आपल्या शारीरिक, मानसिक स्वास्थास अहितकारक त्या सर्वाची अतिशयोक्ती म्हणजेच व्यसन मग ते वारंवार खोटं बोलणे असो कि अति गोड किंवा अति तिखट खाणे असो. एवढेच कशाला, कोणाला अति अभ्यासाचेही व्यसन असते तर कोणाला अति व्यायामाचे. म्हणून अति तिथे माती हि म्हण सर्वदा प्रत्यंतरास येत असते. ह्यातील कुठल्याही प्रकारात आपले तीन घटक काय भूमिका घेतात ते पाहूया.

ऑक्सिजन - घरात किंवा आजूबाजूला असलेले त्यागोष्टीच्या पूर्ततेस पोषक वातावरण
इंधन - ती घटना साकार करण्यासाठी माझी वैयक्तिक मानसिकता
ज्वलन बिंदू - मिळालेल्या संधीचा दुरुपयोग

आयुष्यात अनेक कठीण प्रसंगात वरीलपैकी कुठलीही अप्रिय घटना अचानक आपल्या समोर उभी ठाकु शकते तेव्हा अश्या आपत्तीतून सहीसलामत सुटण्याचा मार्ग म्हणजे आपल्याला नको असलेला आणि त्रिकोण पूर्ण करू शकणारा तो घटक योग्य त्या दाराने बाहेर काढणे किंवा खरं तर योग्य ते दार बंद करून त्याला आपल्या जवळपास येउच न देणे !
.

- अंबज्ञ
योगेश जोशी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहलय.
ऑक्सिजन, इंधन, ज्वलनबिंदू हे सूत्र पटले >++११

धन्यवाद अंकु
एकदा डिसास्टर मैनेजमेंटचे लेक्चर शिकवत असताना हां विचार सुचला होता. Happy

धन्यवाद च्रप्स Happy
अजूनही बऱ्याच बाबतीत हे खरं तर लागू होते पण फार पसारा नको म्हणून थोडक्यात आटोपतं घेतलंय.

how to insert image हे तुमच्या मार्गदर्शनाने सोप्पं झालंय सचिनजी Happy
प्रतिसादाबदद्ल धन्यवाद पंडितजी

सही आहे हे.. ईंटरेस्टींग..
बलात्काराबाबत ज्वलन बिंदू टाळण्याचा फंडा अगदी पटला.. स्त्रीने स्वतः सक्षम बनणे आणि आपण तसे आहोत हे समोरच्याला दाखवून देणे, जेणेकरून समोरच्याच्या मनात सोपी संधी आहे आहे असे येणारच नाही .. मग प्रत्यक्षात त्या सामर्थ्याचा (कराटे वगैरेचा) वापर करण्याची वेळ येणारही नाहीच.

अदिति, नीलम, ऋन्मेश Happy
प्रोत्साहन देणाऱ्या प्रतिसादांबद्दल खुप खुप धन्यवाद

धन्यवाद दत्तात्रय Happy

आध्यात्म आणि विज्ञान नेहमीच एकमेकांस पूरक असतात हे मला पुन्हा एकदा ह्यानुशंगाने जाणवलं, म्हणून हां छोटासा लेखन प्रयास