बलात्कार .....तुझ्या अस्मितेचा की देशाचा

Submitted by कोमल मानकर on 5 October, 2017 - 04:08

पहाटेचे साडेपाच वाजले होते .वातावरणात गारवा ,अंगाला भिडणारी थंडी ,रात्रभर जोरदार पाऊस पडला होता .त्यामुळे कडाक्याची थंडी अंगाला भेदत होती .वाटेतील डांबरी रस्ता संपताना धुळीने माखलेल्या नागमोडी वळणाची सुरूवात झाली होती.पायवाट चुकल्याची मला जरा जाणिव झाली पण म्हटले चला जवळच मामाचे शेत आहे फेरफटका मारून यावा .एवढ्या सकाळी कोण असतं शेतात म्हणून तिथे गेले काही वेळ थांबले ते शेत म्हणजे गावाला लागूनच होते .तिथून रस्ता शोधत घरी आले .आणि चुपचाप येऊन बसले कारण पावसाळ्यात दोन दिवसाच्या सुट्ट्या काढून मामाकडे जाण्याचा योग आला .
ती कवलारू घरे आणि शेत हे बघण्यानात खरा आनंद वाटतो तो शहरातल्या इमारतीच्या गर्दीत मी हरवला होता .घरची पुर्ण काम आटोपली मामी आल्या आणि म्हणाल्या 'चलता का तुम्ही शेतात जरा भाजीपाला आणायचा आहे'.त्यांना कसं म्हणू की मी तर पहाटेच शेतातून आली कारण मला मुक्तछंद एकातात विहार कारायला खुप आवडतं . त्यांना होकार दिला .आम्ही गेल्यानंतर मामी आपल्या भाजीपाला तोडण्यात व्यस्त झाल्या आणि मामीसोबत आणखी तिथे चुलत मामी होत्या त्याच ही शेत शेताला लागून होते .दोघीच्याही गप्पा सुरू झाल्या मी पण मामीला मदत करू लागायला सुरूवात केली येवढ्यात त्या मामी माझ्या मामीला म्हणाल्या ,"दिपमालाला ह्या झाडाला बांधून ठेवले होते ."
मी ऐकत होते पण कोण दीपमाला कुणाची कोण ती कळत नव्हते .आणि त्या मामी दुसर्याच्या शेताकडे बोट दाखवून म्हणत होत्या त्या झाडाखाली तिला बांधून ठेवले होते दोघीची पण चर्चा सुरू होती .मी ह्या नावाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला .तेव्हा कळले ही माझीच मावशी होती .पण तिचे नाव आईच्या तोंडून किंवा घरी कुणाकडून मी ऐकले नव्हते . झाडांची गर्दी आणि सगळीकडे पसरलेली शांतता ज्या शेताच्या धुर्याच्या पलीकडला भाग त्याला पडीक म्हणतात तिथे ते झाड होते . अगदी धुर्याला लागून .नंतर तिच्या बद्दल बरच काही समजले मला.
ती वीस वर्षांची कॉलेज मध्ये जाणारी तरुणी होती .त्या दिवशी ती सकाळी तुरीच्या शेंगा आणायला शेतात गेली पण परत तिथून आठ दिवस घरी परतलीच नाही .घरचे सर्व काळजीत खुप शोध घेतला तिचा पण तिथून आठ दिवसाने शेतात काम करणार्या महिलांना ती झाडाच्या मागे दिसली .खुप वाईट अवस्थेत शरीरावर कपडे नव्हते अंगावरचे कपडे फाडून तिला त्या झाडाला बांधण्यात आले होते तोडात माती कोंबलेली होती .गुप्त अंगात खडे नाकातून रक्त शरीराच्या जखमा मधून रक्त निघत होते मुंग्या माकोड्यांनी त्यावर घर केले होते.पोटावर चाकू खुपसून मारल्याचे वार होते .तिने जीवाच्या आंकातासाठी आरडाओरड ही केला असेल पण त्या दिवशी गावातून गणपती उठणार होता तर डिजे चा आवाज .ज्यांना हे वाईट क्रुत्य करतांनी बघितले त्यांनी ही तिच्या घरच्या पर्यत निरोप न देता तिथून पळवाट काढली . पाच सहा लोकांचा ह्यात समावेश होता .आणि त्यात गावचा पाटिल होता ज्याचे शेत त्या मामाच्या शेताला लागून आहे .आणि त्यांनेच हा अमानुष अत्याचार तिच्यावर केला होता .पोलिस आले आरोपी सापडले ही शेतात खड्यात कपडे गाडून ठेवले होते तिला मारून चाकू नाल्यात फेकला .तिच्या न्यायासाठी सर्व झगडले पण त्यात गावचा पाटलाचा ही हात होता म्हणून ते सर्व बचावले .केस दाबल्या गेली .ते आरोपी आजही मोकाट फिरतात .
त्या गावचा तो कोण पाटिल होता हे ही मला समजले एक दिवस मॉम घरी नसताना आजीलाच विचारले .माझी एक क्लासमेट होती ती एकदा मला मी ज्या बस ने मामाकडे जात होती ती ही दिसली तिला विचारले तु कुठे जात आहे तेव्हा ती बोलली मामाच्या गावला .मग आम्ही सोबतच गावला उतरल्यावर समजले ते तिचे मामा आहेत .खुप वाईट वाटलेस्कुललाईफ पासून कॉलेज पर्यत आम्ही एकाच क्लास मध्ये होतो. तिच्याघरी कॉलेज मध्ये जाताना रोज मला जावे लागे सोबत जायचो आम्ही .एकदिवस तिचे मामा आले तेव्हा ती म्हणाली हे च ते माझे मामा आहे जे तुझ्या मामाच्या गावला आले होते .तेव्हा मनात मी म्हटले होते हाच तो बलात्कारी आहे ज्यांने त्या वीस वर्षांच्या दिपमाचा जीव ही घेतला .तिथे थांबने आणि तिच्या मामाकडे बघणे पण मला नकोसे झाले त्या नंतर मी त्याघरी ही नेहमीचे जाणेच बंद केले कधीतरी वाटयचं तुझ्या मामाने काय केलं ते तिला सांगाव पण त्याने काय होणार होते व्यर्थच ना !
तिथून पढे तिचे मामा दृष्टीस पडत रहाले आज ही ते सुखाने जगत आहेत एका निष्पाप मुलीचा जीव घेऊनी .तो खुनी चेहरा नजरेस आला की तिच्या सोबत घडलेली घटना आठवते . मन म्हणते दीपमाला तुझा बलात्कारी असा नजरेसमोर का येतो ?आणि मी तुझ्या न्यायासाठी ही काहीच करू शकत नाही...
निसर्गाने स्त्रीला कमजोर बनविले आणि पुरूषांनी तिला कमजोर समजले. आपली भारतीय संस्कृती म्हणजे स्त्री ही दिवसा आदीशक्तीच रूप नारी .आणि रात्रहोताच पुरूष शक्तीचा प्रयोग पण आतातर दिवसाही ह्या घटना होतातच . कधी कधी मनुष्याच्या अशा वर्तवणुकीपुढे त्यांच्या मनुष्यतेवर ही संदेह निर्माण होऊन म्हणावसे वाटते तुमच्या पेक्षा घराचं संरक्षण करणारा कुत्रा बरा!हिस्त्र पशुही असा विद्ध्वसं करण्यास दहादा विचार करेल इतकी असंवेदनशील वागणूक ते नराधम देतात.कीव येते मला त्यांच्या असंस्काराची अन् मागासलेपणाची .मुडदे बरे जळतानाही प्रकाश देतात ....बलात्कार हा स्त्रीच्या तोडक्या कपड्यावरून होत नाही .बलात्कार तर सहा वर्षांच्या मुलीसोबत ही होतो तिला ही मग कपड्याची भाषा लागु पडावी का ??दोष कपड्यात नसून वासनेने जन्मघेतलेल्या नजरेत असतो . देश स्वातंत्र झाला म्हणतो पण स्त्री कधी स्वंतत्र्य झालीच नाही ..... तुम्हाला तरी वाटतयं का की आपल्या भारतात स्त्री स्वतंत्र्य आणि सुरक्षित आहे ??

@कोमल मानकर

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

होय

ओह शीर्षक वाचून हे असे असेल वाटले नव्हते.. मन विषण्ण करणारे आहे हे. आपल्या जवळच्या कोणाशी असे करणारे अपराधी मोकाट सुटलेले बघणे हा खरेच आपल्या अस्मितेवरचा आणखी एक बलात्कार आहे. असा गुन्हा करणारे आरोपी तरी कधी सुटू नयेत कायद्याच्या कचाट्यातून..