पाहिले मी जेव्हा तुला ( भाग २ )

Submitted by अनाहुत on 5 October, 2017 - 00:02

जितकं दूर राहण्याचा प्रयत्न करतेय तेव्हढीच ओढली जातेय मी त्याच्याकडे काय होतंय मला कळत नाहीये , का आणि कस होऊ शकत असं माझ्या बाबतीत , आणि सरळ बोललेही नाही त्याच्याशी इतके दिवस . काय होतंय दुसरं काही नाही पण friend म्हणून बोलायला काय हरकत आहे , आणि इतके दिवस बोलत होतोच कि आपण , त्याला काय होतंय , बस जे वेगळं वाटत होत त्याचा विचार नको करायला . एक friend म्हणून बोलूया ना .

" Hi, कसा आहेस ? "

" अरे तुझ्याशीच बोलतेय मी , इकडे तिकडे काय बघतोय . "

" तू ... आपलं आपण माझ्याशी बोलताय ? या पामरावर फारच उपकार झाले .

" ए असं बोलणार असशील तर मी नाही बोलणार तुझ्याशी , तू असा बोलतोस म्हणूनच राग आला होता मला तुझा आणि म्हणूनच बोलत नव्हते मी तुझ्याशी . "

" खरच राग आला होता तुला ? "

" हो . "

" मग मी असं कधी पुन्हा करणार नाही . "

" नक्की ना ? "

" अगदी नक्की "

तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी smile आली

" पण तुला असं वाटतंय का मी असं काही बोलेन , आला राग तर आला मला काय फरक पडत नाही मी असाच आहे आणि असच बोलणार . "

" बघ परत तेच "

" का काय करणार आहेस "

" बोलणार नाही मी तुझ्याशी "

" ए नाही बोललीस तर नाही . "

" ठीक आहे जाते मी . "

" ए चाललीस कुठे एव्हढ्यात भांडणाचा कोटा अजून कुठं पुरा झालाय . "

" चल वेळ नाही मला "

" अग थांब ना त्याने पुढं होऊन तिचा हात पकडला . "

तिला परत थोडं अवघडल्यासारखं झालं पण तरीही स्वतःला शक्य तितकं normal ठेवत ती बोलली

" जाऊदे मला माझा mood नाही आता भांडायचा . "

" अग अशी काय करतेय गं माझी मैत्रीण ना तू तुझ्यावर इतकाही हक्क नाही का माझा ? "

" हो friends आहोत आपण पण दर वेळेस भांडायला हवच का ? "

" अग तस नाही पण आपण त्याच्याशीच भांडतो ज्याच्यावर आपला हक्क आहे आणि तुझ्यावर आहे ना माझा हक्क . "

" तो आहे रे पण दर वेळेस भांडावच असं आहे का ? "

" बर ठीक आहे मग काय करायचं आपण सांग तू . "

" एक सांग मला आपल्याला छान अस नाही का बोलता येणार ? "

" ठीक आहे बोलूया ना आपण तू सांग कोणत्या topic वर बोलायचं आपण ? "

" ummm नाही सुचत मला . तुला काय सुचतंय का ? "

" बघ असं ठरवून बोलायचं म्हटलं तर काही सुचत नाही बोलायला . "

" खर आहे तुझं . "

" पण मग काय करूया ? "

" भांडूया का ? "

" काय रे परत तेच . "

" अग ऐक ना , प्रत्येक नात्याला त्याची त्याची space असते , त्याच त्याच विश्व असत . तुझ्यामाझ्यात छान understanding आहे एकमेकांना काय बोलायच आहे हे आपण न बोलताही समजू शकतो ना .. "

खरंच असं असत तर किती बर झालं असत . आज जे मला वाटतंय ते तुला न बोलता कळलं असत तर किती बर झालं असत . हा विचार करता करता हलकंसं smile आलं तिच्या चेहऱ्यावर .

" अग काय ? एकटीच का हसतेय ? "

" आपल्यात छान understanding आहे ना तुला मी न बोलताही समजतं ना ? मग सांग ना मी का हसतेय ते ? "

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान... Happy
पण लवकर लवकर टाका ना भाग..लिंक नाही लागत मग..