गुलाब

Submitted by माउ on 29 September, 2017 - 12:07

तुला काय सांगू कुठे जात आहे
तुझे दिन सारे तुझी रात आहे..

जरा सूर दे ना झरोक्यात ये ना
इथे चंद्र अर्धा नभी गात आहे ..

कळेना कसे चांदणे आवरू मी
मनी शिंपडूनी कुणी जात आहे..

नव्याने आता भाळणे होत नाही
आठवण जुनीशी दिमाखात आहे..

बागेत थांबवेना फुलांत जीव नाही
अजून श्वास तुझ्या गुलाबात आहे ..

-रसिका

Group content visibility: 
Use group defaults

वाव्वाव्वा...एकसे बढकर एक लाजवाब खयाल!
प्रत्येकाने गझलच लिहावी,किंवा वृत्तातच लिहावे असे अजिबातच नाही काही,पण गझलेच्या खूप जवळ जाणारी (फाॅर्मॅट आणि आशय दोन्हीदृष्ट्या),सुंदर गझलियतभरी कविता!

>>>जरा सूर दे ना झरोक्यात ये ना
इथे चंद्र अर्धा नभी गात आहे ..>>>केवळ अप्रतिम!विशेष अभिनंदन या शेरासाठी!

धन्यवाद सत्यजित आणि सायुरी..
प्रत्येकाने गझलच लिहावी,किंवा वृत्तातच लिहावे असे अजिबातच नाही काही,पण गझलेच्या खूप जवळ जाणारी (फाॅर्मॅट आणि आशय दोन्हीदृष्ट्या),सुंदर गझलियतभरी कविता!>>
मी गझल लिहायला शिकत आहे Happy

>>>मी गझल लिहायला शिकत आहे>>>तुम्ही शेर लिहिताहातच! तेंव्हा मंजिल दूर नहीं! अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा!

सुंदर !