नवरात्रीचे नऊ रंग कसे आले?

Submitted by सोनू. on 22 September, 2017 - 05:05

नवरात्र आली की मुंबईत नऊ दिवस नऊ रंगांची उधळण दिसून येते. ट्रेन, रस्ते, ऑफिस, सगळं एकेका दिवशी एकाएका रंगात दिसतं. बघायला छान वाटतं. बऱ्याच ऑफिसमधे तर एचआर असे नवरंग व त्यानुसार स्पर्धा व बक्षिसे ठेवतात. एकूण वातावरण उत्साही दिसत असतं.

पण याची सुरुवात झाली कशी, हे रंग कोण ठरवतं, याबाबत सर्वांनाच माहीत असतं असं नाही. छान वाटतं, छान दिसतं, टीम स्पिरीट ते देवीचं असतं, आमच्यात करतात इथपर्यंत काहीही कारणं असतात. पण खरं काय ते बऱ्याच लोकांना माहीत नाही असं माझ्या ओळखीत तरी दिसलं.

महाराष्ट्र टाईम्स वाले पानपानभर फोटो छापतात या दिवसांत. लोक खास फोटो काढून या पेपरकडे पाठवतात व तो छापून आला का पाहायला दुसऱ्या दिवशी पेपर खरेदी करतात. अगदी याच साठी महाराष्ट्र टाईम्स ने ही खेळी खेळली होती. लोकसत्ता चा खप जास्त होतोय नी मटाचा कमी म्हणून खप वाढवण्यासाठी काय करावे यावर विचार करताना 2003 मधे ही कल्पना सुचली. स्त्रियांना टार्गेट करुन तो वाचकवर्ग वाढवायचा. झालं, रंग ठरले. ते जास्त आपलेसे, नवरात्रीत समरसणारे म्हणून वाटावे म्हणून दिवसाशी निगडीत देवी घेऊन तिचा रंग त्या दिवसासाठी निश्चित करण्यात आला. मग काय, पसरले नवरंग मुंबईवर. इतके की मटाशिवाय इतरांनाही त्यात भाग घ्यावा लागला. मुंबई बरोबरच राज्यात इतर ठिकाणीही हे लोण पसरलं.

मार्केटिंग गिमिक असो का काही असो, रंगीत शहरं बघायला छान वाटतं हे नक्की. मी पण नेहमी असे रंग वापरून रंगून जाते नऊ दिवस ( ऑफिसचे दिवस, सुट्टीत नाही Happy )

जय मटा, जय माता Wink

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोमवार मंगळवारचे रंग त्या ग्रहांच्या रंगावरून ठरले, तर अन्य पाच वारांचे रंगही त्या ग्रहांच्या रंगाशी मिळतेजुळते आहेत का?
तसंच दरवर्षी तेच नऊ रंग असतात का? (म्हणजे सात रंग कॉमन असतीलच, पण) दर वर्षी दोनदा येणारे दोन वार वेगवेगळे असतील. मग आठवा आणि नववा रंग आणि वाराचा काँबो बदलायला हवा ना?
हे गेल्या तीनचार वर्षांतले रंग नेटवर शोधून पडताळून पाहता येईल. पण इथे काही जण रंग आणि वाराचं समीकरण सांगताहेत, त्यांच्याकडून उत्तर मिळावं.

जाई +१

ऋन्मेष, हे असं सगळे मानत नाहीत म्हणूनआआमच्या सारख्यांनी निखळ मज्जा घेऊ नये का? जे मानत नाहीत तो त्यांचा दोष, आम्ही का सजा भोगायची? Uhoh

मला अनेकांचं म्हणणं कळालं नाही
फॅड आहे - हो आहे
बायका नव्या साड्या वगैरे घेतात एवढ्यासाठी - हा त्यांचा प्रश्न आहे
सगळे काही मजेत घेत नाहीत, काही नव्या प्रथा म्हणून सुरू करतायेत - बरं मग? आम्ही काय करू? त्यांना अक्कल नाही ही आमचे एचुक आहे का?

अरे! सामाजिक भान सामाजिक भान करता करता काही मुर्ख लोकांसाठी आम्ही जीवनाचा आनंद घेणं बंद करू का?

मला आवडतं असे कलर डेज सेलिब्रेट करायला.. इट इज फान!

रीया, आनंद नक्की घ्यावा. पण हे फक्त मजेसाठी चाललंय, याचं भान ठेवायला आणि वाढवायला हवंय.
अवांतर ,नवरात्रात अनवाणी चालणार्‍या लोकांचं प्रमाणही वाढताना दिसतंय. ते किती बोकाळतंय ते पुढे दिसेलच.

ज्याला ज्याच्यात आनंद आहे ते त्यानी केलं तर बिघडलं कुठे! बाकी मैत्रिणी, नातेवाईक जे करायला भाग पाडतात ते आपल्यावरच्या प्रेमाच्या हक्कापोटी. कोणाला ते हक्कांवर, स्वातंत्र्यांवर गदा वाटत असेल तर तसे रोखठोक सांगायला हवे, न लाजता.

इथे मी एकूण एक सणाचं मराठी वातावरण मिस करते. पुढच्या पिढीला जर काही वारसा द्यायचा असेल तर ती जबाबदारी पूर्ण माझी, भवताल/ समाज काही रोल प्ले करत नाही.

जेव्हा आपण आपल्या माणसांत असतो तेव्हा संस्कृति जोखड वाटते पण इथे जे स्वातंत्र्य आणि त्यामुळे पडलेली जबाबदरी आहे ती कधीकधी अति होते.

बाकी चाललंय ते चालू द्या,
या प्रकारचा एक दुसरा पैलू आहे,
https://sanatanprabhat.org/marathi/81664.html
>>>>>>
देवीच्या कृपेची 9 रंगांच्या साड्या नसायचे हे एकदा समाजमान्य झाले, की नवरात्र असेच साजरे करायचे असते असे लोकांना वाटेल.
गरीब माता भगिनींना ही हायफाय नवरात्र परवडणार नाही. ती देवीपूजन करणार नाही, म्हणजे हळूहळू त्या नास्तिक होतील,
श्रीमंती आणि धर्मशिक्षणाचा अभाव अन् मौजमजा करायला मिळाल्याने तरुण पिढी या मॅचिंग आणि गरबा-दांडियाला नवरात्र समजतील, कारण त्यांना नवरात्र म्हणजे देवीची उपासना हे ठाऊकच नसणार. यांचेही धर्मांतर करणे सोपे जाईल. थोडक्यात काय तर पराभव हा हिंदूंचाच होईल आणि याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंदु समाजच कारणीभूत आहे
>>>>>>>
आम्हाला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे म्हणणाऱ्या माता भगिनी हिंदू धर्माचे किती नुकसान करत आहेत हे पहा Wink

(*मी फक्त अजून एक पैलू दाखवला, हे माझे या विषयावरील मत नाही)

जे आधीपासून सुरूच होते ते मार्केटिंग करून massive प्रमाणावर all inclusive झालंय असे वरील चर्चेवरून वाटते. लोकांना परवडेना झाले तर परत घरगुती स्वरूपात सुरूच राहील की.
जेव्हा शतकापूर्वी लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला तेव्हा नक्कीच असाच concern तत्कालीन धर्ममार्तंडांना असणार. बघा आता लोकांना परवडत नाहीये तर लोकं परत घरच्या घरी साजरा करा अश्या विचारांवर आलीत.
Happy

म्हणूनआआमच्या सारख्यांनी निखळ मज्जा घेऊ नये का? जे मानत नाहीत तो त्यांचा दोष, आम्ही का सजा भोगायची? Uhoh
>>>>>>>>

मी कुठे तुम्हाला मजा करू नका म्हणत आहे. हे म्हणजे असे झाले सेल्फी काढायच्या नादात काही मुलं कशी जीव धोक्यात घालतात यावर चिण्ता व्यक्त करताच आम्ही नाही असा वेडेपणा करत, आम्हाला मजा येते सेल्फी काढायला, काही मुर्ख त्या नादात मरतात म्हणून आम्ही सेल्फी काढणे सोडून द्यायचे का? वगैरे वगैरे म्हटल्यासारखे झाले..
पण मी असे कोणाला उद्देशून म्हणतच नाहीये. चर्चा चालूय तर ओवरऑल सर्व बाजूने आलेले अनुभव लिहित आहे ईतकेच.

राहिला प्रश्न फॅडचा तर मी नास्तिक आणि देवधर्म न मानणारा असल्याने गणपती बसवणे, त्याच्यासमोर अकरा दिवस आरत्या करणे, देवी बसवणे, तिच्यासमोर नऊ दिवस गरबा खेळणे, दिवाळी साजरी करणे, आकाशकंदिल लाऊन चार दिवस फटाके फोडणे ईत्यादी जे काही धार्मिक सणवार आहेत त्यात आणि या नऊ दिवस नऊ रंग घालणे यात माझ्यादृष्टीने काहीच फरक नाही. जे कारण यातील एकाला फॅड बनवते आणि एकाला सण बनवते तेच मी मानत नसल्याने माझ्यासाठी हे सारे एकाच गटात आले. पण मी देखील हे सारे माझ्या आवडीनुसार कमीजास्त प्रमाणात एंजॉय करतोच की...

ईतर बाजू आणि त्याचे आलेले अनुभव यावर आपण एवढ्यासाठीच ईथे चर्चा करत आहोत की भले तुम्ही तसे करत नसाल पण कोणाच्या ऑफिसमध्ये तसे होत असेल, पुढे मागे होऊ लागले तर त्याचे भान ठेवून तसे ते होऊ देणार नाहीत.

परा, संस्कृतीत परिवर्तन होऊ नये म्हणजे मिळवलं. निरागसता टिकून राहावी, कर्मकांड होऊ नये. विशिष्ट रंग घालून न आलेल्या स्त्रीला ऑड-वुमन-ऑउट म्हणून ट्रीट करु नये.>>अनुमोदन

संस्कृतीत परिवर्तन होऊ नये म्हणजे मिळवलं. निरागसता टिकून राहावी, कर्मकांड होऊ नये. विशिष्ट रंग घालून न आलेल्या स्त्रीला ऑड-वुमन-ऑउट म्हणून ट्रीट करु नये >> असे शक्यतो होत नाही, रंगापेक्षा, सगळ्यांनी एकत्र सण साजरा करण्यावर भर असतो मोस्टली

१९९५-९६ दरम्यान मटाचा खप घसरू लागला तेव्हा तो सावरण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या राबवताना मुंबई टाइम्स ही पेज ३ प्रकारची पुरवणी सुरू केली गेली. तीत नवरात्रात दररोज वेगवेगळ्या साड्या नेसलेल्या सेलेब्रिटीजचे फोटो आणि दररोजचे रंग प्रसिद्ध होऊ लागले. पण त्या आधी छोट्याछोट्या गटांमध्ये ही प्रथा तुरळकपणे सुरू होतीच. मटा मुंटामुळे तिला संघटित स्वरूप मिळाले इतकेच.

Lol सगळ्यात बेस्ट तळटीप म्हणजे चेक्सचा शर्ट घालून चिटींग चालणार नाही, बेस कलर बघू!!!! डेंजर बरं हा डॅमेजर... जाऊ द्या, चाट पार्टी देतो तर माफ आहे सगळं...

Pages