अॉनलाईन रिचार्ज केंद्राविषयी माहिती हवी आहे

Submitted by नीलम बुचडे on 7 September, 2017 - 11:19

अॉनलाईन रिचार्ज केंद्राविषयी माहिती हवी आहे

आमच्या गावात अॉनलाईन रिचार्ज केंद्र सुरू करायचं आहे. त्यासाठी कोणती वेबसाईट वापरावी. उदा. पेटीएम, Itz cash, इ.
अशी एखादी वेबसाईट आहे का ? ज्यावर मोबाईल, डीटीएच, वीजबिल, इ. प्रकारची रिचार्ज व बिले भरता येतील आणि त्याच्याद्वारे कमिशन मिळू शकेल.
आमच्या जवळच्या शहरात चौकशी केली असता माहिती देण्यास टाळाटाळ केली गेली. गुगलवर शोधले पण विश्वासार्ह साईट कशी निवडायची याबद्दल निर्णय घेता येईन. म्हणून इथे विचारतेय. कृपया मार्गदर्शन करावे.

Group content visibility: 
Use group defaults

मला वाटते, आपण प्रत्यक्ष टेलिकॉम कंपन्यांशी (रिलायन्स, आयडिया आदी) करार करावा. त्यात कमिशन जास्त मिळण्याची शक्यता आहे.

अवांतर: आपण ऋन्मेषकडून खास प्रशिक्षण घेतलेत का??? ०७ सप्टेंबर २०१७ या एकाच दिवशी ३ धागे काढलेत, म्हणून विचारतो आहे !!! Proud

तुम्ही गावात थोड्या लोकांसाठी ही सेवा सुरु करताय. तेव्हा तुम्हाला ग्राहकांकडुन कमिशन घेउन (व स्वत:चे बँक अकाऊंट / वॉलेट वापरुन) हे करावे लागेल असे वाटते.

धन्यवाद.. रघुनाथन आणि मानव पृथ्वीकर..
सध्या मानव पृथ्वीकर यांच्या सूचनेप्रमाणे सेवा चालू केली आहे.

पेटीएम वापरतेय. लोक अगदी हसतहसत कमिशन देतात. गावात पहिलंच रिचार्ज केंद्र आहे आमचं. त्यामुळे रिझल्ट चांगला आहे. तरी कुणाकडे आणखी माहिती असल्यास कळवावी..

माफ करा, मला तसं म्हणायचं नव्हतं
>>> आपली विनयशीलता आवडली. Happy
कोणताही व्यवसाय सफल होण्याकरिता याच गुणधर्माची आवश्यकता असते.

आपल्या व्यवसायाची भरभराट होवो!
आपणांस शुभेच्छा!