Submitted by नीलम बुचडे on 7 September, 2017 - 11:19
अॉनलाईन रिचार्ज केंद्राविषयी माहिती हवी आहे
आमच्या गावात अॉनलाईन रिचार्ज केंद्र सुरू करायचं आहे. त्यासाठी कोणती वेबसाईट वापरावी. उदा. पेटीएम, Itz cash, इ.
अशी एखादी वेबसाईट आहे का ? ज्यावर मोबाईल, डीटीएच, वीजबिल, इ. प्रकारची रिचार्ज व बिले भरता येतील आणि त्याच्याद्वारे कमिशन मिळू शकेल.
आमच्या जवळच्या शहरात चौकशी केली असता माहिती देण्यास टाळाटाळ केली गेली. गुगलवर शोधले पण विश्वासार्ह साईट कशी निवडायची याबद्दल निर्णय घेता येईन. म्हणून इथे विचारतेय. कृपया मार्गदर्शन करावे.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मला वाटते, आपण प्रत्यक्ष
मला वाटते, आपण प्रत्यक्ष टेलिकॉम कंपन्यांशी (रिलायन्स, आयडिया आदी) करार करावा. त्यात कमिशन जास्त मिळण्याची शक्यता आहे.
अवांतर: आपण ऋन्मेषकडून खास प्रशिक्षण घेतलेत का??? ०७ सप्टेंबर २०१७ या एकाच दिवशी ३ धागे काढलेत, म्हणून विचारतो आहे !!!
बरेच दिवस सगळे प्रश्न मनात
बरेच दिवस सगळे प्रश्न मनात होते. एकदम बाहेर काढले.
मध्यन्तरि easybillpay नवचि
मध्यन्तरि easybillpay नवचि कं ऐकलि होति.
तुम्ही गावात थोड्या लोकांसाठी
तुम्ही गावात थोड्या लोकांसाठी ही सेवा सुरु करताय. तेव्हा तुम्हाला ग्राहकांकडुन कमिशन घेउन (व स्वत:चे बँक अकाऊंट / वॉलेट वापरुन) हे करावे लागेल असे वाटते.
धन्यवाद.. रघुनाथन आणि मानव
धन्यवाद.. रघुनाथन आणि मानव पृथ्वीकर..
सध्या मानव पृथ्वीकर यांच्या सूचनेप्रमाणे सेवा चालू केली आहे.
पेटीएम वापरतेय. लोक अगदी
पेटीएम वापरतेय. लोक अगदी हसतहसत कमिशन देतात. गावात पहिलंच रिचार्ज केंद्र आहे आमचं. त्यामुळे रिझल्ट चांगला आहे. तरी कुणाकडे आणखी माहिती असल्यास कळवावी..
अरे दोन तास वीस मिनिटात सेवा
अरे दोन तास वीस मिनिटात सेवा चालू!!! भारीये.
आणि रिझल्ट आला पण!!!
माफ करा, मला तसं म्हणायचं
माफ करा, मला तसं म्हणायचं नव्हतं अमितवजी..
सेवा आधीच सुरू झालीय. मी
सेवा आधीच सुरू झालीय. मी लिहिताना चुकले.
ओके ओके. शुभेच्छा.
ओके ओके. शुभेच्छा.
धन्यवाद
धन्यवाद
शुभेच्छा निलमजी!
शुभेच्छा निलमजी!
आपल्या व्यवसायाची भरभराट होवो
माफ करा, मला तसं म्हणायचं नव्हतं
>>> आपली विनयशीलता आवडली.
कोणताही व्यवसाय सफल होण्याकरिता याच गुणधर्माची आवश्यकता असते.
आपल्या व्यवसायाची भरभराट होवो!
आपणांस शुभेच्छा!
शुभेच्छा!
शुभेच्छा!