रात ही .... मिलनाची

Submitted by सेन्साय on 26 September, 2017 - 05:56

.

आठवणी उजळत न्हाउनि रात्री
चांदवा सांडतोय गुजगोष्टी
मोजता आपुल्या मैतर कथा
तारका मोजणे सोप्पे गं अवकाशी

मैतर तू बनलीस जिवाची
जीव लावता स्वप्ने उरातली
ओजेओजे प्रित साकारली नश्वर
स्वप्न सुंदरी तू गं माझ्या मनातली

अवखळ आयुष्य मोकाट होते
कोंदणात गुंफून तू सौंदर्यराशी
बंधित भानुतेजाला दृढ़ पाशात
चित करुनी सर्व ग्रहांची मिराशी

शुक्र चांदणीच्या साक्षीने
सांजवारा गं मंदावला
अविरत प्रीतिचा ज्वर
मात्र हां नव्याने धुंदावला

सप्त पदीच्या चालण्याने
साथ लाभली आयुष्याची
नवसंसाराची स्वप्ने रंगवते
रात ही आपुल्या मिलनाची .... !!

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख !!!

उधाणलेले तारूण्य कवेत घेण्या
दोन जिव आसुसले आहे
मिलनक्षणांना लेखणी उतरवण्या
कवी कोणी आतुरले आहे
मस्त अंबज्ञजी!

धन्स राहुल
कट्ट्यावर मी ह्याची सुरुवात लिहिलेली होती काल ,
पहिले कडवे आठवले का Happy