मुंबई यायचे आहे उदया यावे का पाऊस आहे का? सोबत दिड वर्ष चे बेबी आहे. बस ने येणार आहोत.

Submitted by Seema२७६ on 21 September, 2017 - 22:44

मुंबई यायचे आहे उदया यावे का पाऊस आहे का? सोबत दिड वर्ष चे बेबी आहे. बस ने येणार आहोत.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

कुठून येताय? आज पाऊस नाहीय. वेधशाळेच्या अंदाजानुसार आज उघडीप आहे, कालही होती. माझी मुलगी सकाळी नव्या मुंबईतून निघून कुर्ला व दुपारी तिथून निघून अंधेरी करून रात्री घरी सुखरूप परतली. यावरून सर्व व्यवस्थित असावे हा अंदाज बांधता येतो.

जिथे जाणार आहात तिथल्या राहणारया लोकांना फोन करून विचारता आले तर बघा. किंवा त्या भागात राहणारा एखादा माबोकर सांगू शकतो. स्थानिक व्यक्ती चांगला सल्ला देऊ शकते.

@ सर्वांनाच, एक जनरल प्रश्न - अशी कुठली हेल्पलाईन आहे का जी याबाबत गायडन्स देऊ शकेल. कोणाला काही आयडिया?
तुम्ही या प्रश्नाचे ऊत्तर मायबोलीवर धागा काढण्याव्यतिरीक्त कसे मिळवले असते?

टेन्शन घेण्यासारखं काही नाही. पाऊस असला तरी मुंबई काही लगेच बंद होत नाही.
पुणे - बोरीवली शिवनेरी घेऊन मग लोकल/टॅक्सी करून विरार ला जाता येईल. लहान मूल उलट ऐंजॉय करेल मस्त!

पाऊस असला तरी मुंबई काही लगेच बंद होत नाही >> मस्त! मुंबईकरांचा हा विश्वास मला आवडतो. मी स्वत:देखील याच विश्वासावर कितीही पाऊस असला तरी घराबाहेर पडतो Happy

लहान मूल उलट ऐंजॉय करेल मस्त! >>>> सध्या कडक उन्ह नाहीये आणि वातावरण ढगाळ आहे. एंजॉय करण्यासारखेच वातावरण आहे. दुपारी जेवल्यावर समुद्राच्या कडेने फेरफटका मारायला बरे वाटते.