बागकाम - अमेरीका २०१७

Submitted by स्वाती२ on 28 January, 2017 - 13:20

बघता बघता जानेवारी संपत आला. २०१७ च्या बागकामाच्या नियोजनासाठी , सल्ल्याच्या देवघेवीसाठी आणि कौतुकाने बागेचे फोटो शेअर करण्यासाठी हा धागा.

परागिभवनात मदत करणार्‍या विविध किटकांसाठी आणि पक्षांसाठी म्हणून यावर्षी काही झाडे लावणार असाल तर त्यासाठी मार्गदर्शक पुस्तीका उपलब्ध आहेत. तुम्ही ज्या भागात रहाता त्या भागासाठी खास तयार केलेल्या या मोफत पुस्तीका आहेत.
Ecoregional Planting Guides

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केशराचे कंद मागवले होते ( एकदाचे). ते लावले आहेत. ट्रायल म्हणून ५० मागवले आहेत. ते जर नीट उगवले तर पुढच्या वर्षी शे दोनशे मागवायचा विचार आहे . >>>> अरे वा! मग आम्हाला 'घरचे' केशर मिळणार तर Wink

सही शोनू !!
आम्ही केशराचे कंद मागवता मागवता राहीलो ह्यावेळी. पुढच्या वर्षी ट्राय करू आता.
कॉस्को, होमडेपोमध्ये बल्बची पोती यायला लागली. आता आणायला हवे बल्ब.

शोनू, आपल्याकडच्या थंडीत केशराचे कंद जगतात >> सायो, हो जगतात असे वाचले आहे. लँकॅस्टर भागातले फार्मर्स घरा जवळ हे कंद लावतात. केशराचा वापर सूप्स किंवा स्ट्यू मधे करतात असे वाचले आहे. आता वर्षभरात कळेलच कसे काय जगतात ते.

सायो, केशराला थंड हवा मानवते. त्याचं पीक घेणं फारसं अवघड नाही असं वाचलं. पण ते वाळवून केसर काढणे लेबर ईटेन्सिव आहे म्हणून त्याची किंमत जास्त आहे.
http://www.saffronbulbs.com/culture.htm

Pages