गाव

Submitted by वैशाली अ वर्तक on 9 August, 2017 - 07:28

गाव
काल मी पाहिला स्वप्नात एक गाव
कल्पलेला होता, जसा माझ्या मनात
चारी बाजूस तटबंदी डोंगर-माळ
जणू सज्ज उभी तयाच्या रक्षणास
तटबंदी टेकड्यांची, गट्टी जमे ढगांशी
खेळताना मुसळधार ,पाऊस पाडण्याची
सर्वत्र डोलती हिरवी गार शिवारे
वा-याच्या झुळके वर नाचती माळराने
कृषीवल फिरवी समाधानी नजर
बैलांना झाली होती चा-याची चंगळ
शेतात लागलीय धान्याची रास
बैल गाड्या घेतील बाजारपेठत धाव
नजरेस नव्हते सिमेंट चे जंगल
टुमदार कौलारू घरे होती सुंदर
कोठे दिसत नव्हते वीजेचे जाळे
रात्री चमकणार होते आकाशात तारे
सारे गाव कसे स्वच्छ अन् निर्मळ
प्रदूषणला कुठे नव्हता , थारा कणभर
काल मी पाहिला स्वप्नात एक गाव
कल्पलेला होता जस्सा माझ्या मनात
.......वैशाली वर्तक

Group content visibility: 
Use group defaults