साक्षी - ज्युनियर मास्टरशेफ - लिंबोटी - वेद - वय ९ वर्षे

Submitted by साक्षी on 4 September, 2017 - 08:06

मी केलेली मदत : गॅसवर ठेवायला, उतरायला , फोटो काढायला आणि इथे लिहायला मी मदत केली.
बशीत काढून घेणे इ. त्याने केले आहे, त्यामुळे इथला प्रमाण आणि फोटो यांची सांगड घालू नका. Wink

लागणारा वेळ : १० ते १५ मिनिटे
साहित्य : लिंबू - १/२
जिरेपूड : १/४ चमचा
काळं मीठ(नसेल तर साधं मीठ चालेल) : १/४ चमचा
साखर : १/४ चमचा

कृती :
१) लिंबाच्या फोडीतून बिया काढून टाका.
२) त्यावर वरील सर्व साहित्य पेरा.
३) छोटं कढलं घेउन त्यात लिंबाची पाठीची बाजू ठेऊन गॅस पेटवा. गॅस मंद असुद्या. मधे मधे लिंबू हलवा पण पालथं करू नका Happy
४) मीठ, सा़खर विरघळून रस बाहेर येऊ लागला की गॅस बंद करा.
५) थोडं गार झाला की चोखून चोखून रस खा.

आजारपणात तोंडाची चव जाते त्यावर हे उत्तम घरगुती औषध आहे.

माहितीचा स्त्रोत : सासुबाई सुलभा नाटेकर
1Ingredients.jpg2Mixing.jpg3LimbotiInProgress.jpg4Ready.jpg5Ready.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

पण जरा जपून खा. 'रुक रुक रुक अरे बाबा रुक' वरचे औषध आहे हे (साखर वगळता) . कारण नसताना जास्त खाल्ले तर 'आती नही' म्हणायला लावते.

मस्त आहे रेसिपी. मी लिंबोटीबद्दल ऐकलेले पण कृती पहिल्यांदाच पाहिली. वेद चे आभार। Happy Happy

आजारपणात तोंडाची चव जाते त्यावर हे उत्तम घरगुती औषध आहे.
>>>>>
हे मी करतो Happy
तसेच सफरचंदाला मीठ मीरपूड लाऊन खाणे, डाळिंबाचे दाणे एकेक करत तोंडात टाकत राहणे हे ईतर तापात चव गेलेले असतानाचे माझे खाद्यपदार्थ.

अशी एखादी पाकृ ईथे देणे मस्तच