इमारत पुनर्विकास संदर्भात सल्ला हवा

Submitted by सचिन७३८ on 13 September, 2017 - 11:28

सन ऑक्टोबर २०१३ आम्ही आमची जागा पुनर्विकासासाठी एका विकसकास दिली होती. त्या जागेवर आमच्या मालकीचा बंगला होता. तो विकसकाने विकसन करण्याच्या नावाखाली त्याच वर्षी पाडला. त्याच्यासोबत आम्ही विकसनाचा रितसर करारही केला होता तसेच मुखत्यारपत्रही त्याच्यासोबतच केले होते. मुखत्यारपत्राच्या आधारे त्याने डिसेंबर २०१३ ला ती जागा दुसऱ्या विकसकास पुनर्विकास करण्यासाठी दिली. त्याच्यासोबतही त्याने करार केला आहे. परंतु गेले ४ वर्ष दुसरा विकसक बांधकाम परवानगी न मिळण्याचे कारण सांगून इमारत विकसित करण्यास टाळाटाळ करत आहे. पहिल्या विकसकास याबाबत विचारले असता ‘मी ती जागा दुसऱ्या विकसकास दिली आहे’ असे सांगून हात वर करतो.

याबाबत काय करता येऊ शकेल? अजूनही काही डिटेल्स हवे असतील तर मी ते देतो.

Group content visibility: 
Use group defaults

तुम्ही राहतात कुठे मग बिल्डरने जागा दिली का? तात्पुरती
तुमची जागा ४ वर्ष मोकळी आहे का? असल्यास करार मोडून टाका व दुसर्याबरोबर नविन करा.

विकसक रस्ता रूंदीकरणाचे कारण सांगत आहे. पण आमच्यासोबत झालेल्या करारानंतर दीड वर्षांनी त्याच रस्त्यावर दुसरी इमारत बांधल्या गेलेली आहे.

ग्राहक मंच किंवा रेरा येथे तक्रार नोंदवायची असल्यास काय करावे लागेल?

मुखत्यारपत्र म्हणजे power of attorney का ?

विकसन करार मध्ये एक clause असतो ज्याच्यात किती वेळात काम पूर्ण होणे अपेक्षित आहे तसेच पेमेंट चे शेड्युल काय आहे , हे सर्व लिहिलेले असते.

तुम्ही त्या आधारे ते ऍग्रिमेंट रद्द करू शकत नाही का ?