"प्रेम म्हणजे ...."

Submitted by सेन्साय on 10 September, 2017 - 00:25

.

प्रेम म्हणजे नागमणि
सर्व कल्पितांचे शिरोमणि
नवागत घाली आकाशाला गवसणी
लाभार्थियेच्या घरी दिसे कायम आणिबाणी

प्रेम म्हणजे मुलायम दलदल
हवीहविशी वाटणारी
जेथे रुतत जाण्यात
धोका आहे जाणुनही
पुढची पावले अधिरतेने चालणारी

प्रेम म्हणजे मधाळ वाणी
षड्रिपु भासती येथे गोजिरवाणी
थार नसे बुद्धिला ईथे
काढाया परस्पर उणीदूणी

प्रेम म्हणजे विरहाचि राहणी
जहर लागे गोड़ अन् कड़ू असे पाणी
निव्वळ आभासी दुनियेला
कर्तबगारीची जणु तुच्छ नाणी
कल्पनेच्या बंगल्यातील दोघेच राजा राणी

प्रेम म्हणजे काय असते आणि
तुझ्या माझ्यातील एकत्वाची कहाणी
न लगे तेथ रंग रूपाची पहाणि
प्रेमपुरस्पर जिंदगीची मौजे गाऊ गाणी

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वाना Happy

षड्रिपु =मानवाचे ६ शत्रु(रिपु)
[काम क्रोध मोह मद मत्सर लोभ]