GTG - स्मोकी माऊंटन फॉल कलर्स

Submitted by राहुल on 11 August, 2009 - 15:24
ठिकाण/पत्ता: 
स्मोकी माऊंटन नॅशनल पार्क - गॅटलीनबर्ग, टेनेसी

GTG - स्मोकी माऊंटन फॉल कलर्स

स्थळ : स्मोकी माऊंटन नॅशनल पार्क - गॅटलीनबर्ग, टेनेसी

http://www.gatlinburgcabinsonline.com/cabin.asp?property_id=1216&navmont...

Property Management Office Address -
333 Ski Mountain Road
Gatlinburg, TN 37738
Phone : (865) 430-9868

चेक इन : २ ऑक्टोबर, दुपारी ३:०० नंतर
चेक आउट : ४ ऑक्टोबर, सकाळी १०:०० च्या आत.

खालील मायबोलीकरांनी आपली उपस्थीती नक्की केली आहे.

अटलांटामधून व्हॅन करून जाणारे -
१) RJ (२ मोठे + २ छोटे) २ नॉन-व्हेज
२) lovevin (२ मोठे + १ छोटा) १ व्हेज/नॉन-व्हेज, १ व्हेज
३) runi (२ मोठे) १ नॉन-व्हेज, १ व्हेज
४) fiona (२ मोठे) **tentative १ व्हेज/नॉन-व्हेज, १ नॉन-व्हेज
५) adm (१ मोठा) १ नॉन-व्हेज
६) Mo (२ मोठे + १ छोटा) २ व्हेज
एकूण : ११ मोठे + ४ छोटे
विनायकच्या घरी ३:०० वाजे पर्यंत जमायचे आहे.
३:३० वाजता स्मोकीजसाठी निघायचे आहे.
अटलांटाहून जाणार्‍यांसाठी एस कार रेंटल कडे एक व्हॅन बूक केली आहे.
https://www.acerentacar.com/resview.aspx?1375579=90440

शिट्टी ते स्मोकीज थेट ड्राईव्ह करून येणारे -
७) Cinderella (२ मोठे + १ छोटा) १ व्हेज/नॉन-व्हेज, १ व्हेज
८) सुमीत आणि खुशबु २ व्हेज
एकूण : ४ मोठे + १ छोटा
रात्री ९:०० पर्यंत थेट केबीनवर पोहोचणार.

लाँग आयलंड ते स्मोकीज थेट उडत येणार -
९) सँटी (१ मोठा)
रात्री ११:०० पर्यंत थेट केबीनवर पोहोचणार.

एकूण : १६ मोठे + ५ छोटे

===============================

शनिवारचा कार्यक्रम -

१. Roaring Fork Motor Nature Trail : हा सिनीक ड्राइव्ह आहे. निसर्गसौंदर्य खूप पहायला मिळेल. इथे मध्ये मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी थांबता येते. तसेच ह्या रोडवर इतर ट्रेल्सही घेता येतात. उदा.: Grotto Falls ची ट्रेल. सोपी आहे. फॅमिलीसकट सर्वांना जाता येते. मुले एन्जॉय करतात.

२. Clingman's Dome : इथे चढावे लागते. ०.४ माइल्सच आहे पण खूप चढ आहे. हा स्मोकीजमधला सर्वात उंच पॉइंट आहे. वरून खूप सुंदर दिसते असे नेटवर वाचले.

३. Alum Cave : ही ४.६ माइल्सची ट्रेल आहे. थोडी अवघड आहे. फॅमिलीसकट सर्वांना जाता येण्यासारखी आहे की नाही माहीत नाही. बहुतेक नाही. पण सर्वाधिक पॉप्युलर ट्रेल आहे.

४. Cades Cove Loop Road: हा पण ड्राइव्ह आहे. सीनरी मस्त. गर्दी असते. लोक गाड्या मध्येच थांबवून फोटो काढत असतात. चिडचिड होण्याची शक्यता.

५. गॅटलीनबर्ग डाऊन-टाऊन फेरफटका.

रविवारचा कार्यक्रम -

१. Newfound Gap Road : हा सुध्दा ड्राइव्ह आहे. ३३ माइल्स. हा पूर्ण स्मोकी माऊंटन ओलांडून नॉर्थ कॅरोलायनाच्या पश्चिम टोकापर्यंत जातो. इथेही मध्येमध्ये बरेच पॉइंटस आहेत. तसेच Fall Foliage बघण्यासाठी हा ड्राइव्ह प्रसिध्द आहे.

===============================
मेन्यू -

शुक्रवार डिनर : स्मोकीज च्या वाटेवर बाहेर कुठेतरी.
शनिवार ब्रेफा : झटपट ब्रेफा. टोस्ट, बेगल्स, मफीन्स, वै.
शनिवार लंच : पराठे.
शनिवार डिनर : ग्रील (चिकन/व्हेज), मिसळ
रविवार ब्रेफा : पोहे, वै.
===============================

कामाची वाटणी -

सिंडी - मिसळीसाठी मटकी, डिस्पोजेबल
पूर्वा - लहान मुलांसाठी डाळ/तांदूळ, देसी ग्रोसरी (पोहे, फरसाण, पनीर, कोथींबीर, कढीपत्ता, आलं)
आर्जे - बार्बेक्यु तयारी आणि इतर (योगर्ट, चिप्स, सॉफ्ट ड्रिंक्स, वॉटर बॉटल्स), क्लिनींग सप्लाईज
मो - मुलांसाठी फळे (केळी, सफरचंद, वै.), भाज्या (कांदे, बटाटे, शिमला मिरची)

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी वृत्तांत रे अडमा...मजा आली वाचायला... Happy

विनायकने तो भला मोठा व्हॅन नावाचा रणगाडा खरंच सही चालवला. कुठेही प्रॉब्लेम झाला नाही गाडीमुळे.

'सिंडी कामाचं नाटक करत होती'.... Rofl खरं आहे...

मलाही सिड्या दिल्या दोन तिने जाताना... बोर होत्या त्याही. Proud

जबरी वृ अडमा!! Happy
आर्जे, फोटोही मस्त!!

>>"आधी व्ययली आणि मग ओकली >> Lol Lol

सिंडीने टेलगेटींगचे धडे हूडाकडून गिरवलेले दिसताहेत!! Wink

मुरारबाजी - मुरारभाई, छम्मा छम्मा बाजे रे मेरी पैठणीयां >> Rofl

तूफान धमाल केलेली दिसतेय पब्लिकने!! सहीये!! हे गटग जरा जास्तच मिस केलं.. गणेशोत्सव ग्रूपकडून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आग्रह होत होता. त्यातून गणेशोत्सवानंतरही नियमीत चालू असलेल्या फोन्समूळे आतल्या गोटातल्या बातम्याही सगळ्या कळत होत्या (अगदी एकमेकांबद्दलच्या गार्‍हाण्यांसकट :P)

तटी : काही 'खास पंचेस'बद्दल ऑफलाईन प्रतिक्रिया देण्यात येईल. (कॉ.कॉ. वर, त्यावर कोणीही बहीष्कार टाकू नये) Proud

अगदी एकमेकांबद्दलच्या गार्‍हाण्यांसकट >>>>>>> ही कोणी केली ??? डिटेल्स सांग... !!! मी फक्त सिंडी ला नावं ठेवली हां Proud ... बाकीच्यांना नाही.. अटलांटा कंपूतल्या कोणालातर नाहिच नाही...

अगदी एकमेकांबद्दलच्या गार्‍हाण्यांसकट >>> काय हे अडम, हमने तुमसे ये उम्मिद नही की थी!!
(गटग ला जाऊन सगळ्यांचं हिंदी मात्र सुधारलय :))

मो, काळजी करू नकोस. अडम तुझ्याबद्दल फक्त चांगलं आणि चांगलच बोललाय Proud भरपूर तारीफही केलीये! Happy

मी मिसलेला भाग पण लिहा कोणितरी... ! मी सँटीच्या गाडीत असतानाचा.. आणि इतरही..>> थोडासा लिहिते, रणगाड्यातल्या बाकी जणांनी पण अ‍ॅड करा रे!!

तर झाले असे की रवीवारी भल्या पहाटे १०:३० ला आम्ही सगळे स्मोकी मधला सर्वात उंच पॉईंट पहायला निघालो. ३ गाड्या होत्या. रणगाड्यात सगळा अ‍ॅटलांटा कंपू सर्वात पुढे, सिंडी आणि कंपू त्या मागे आणि बॅचलर कंपू सगळ्यात मागे एका लालभडक गाडीत.
मजल दरमजल करत आम्ही पर्वतराशींमध्ये शिरलो तो पर्यंत ह्या दोन्हीही गाड्या शहाण्या मुलांसारख्या वडिलधार्‍या गाडीच्या मागे होत्या. Happy मध्ये आम्ही मुख्य रस्ता सोडून एका आडरस्त्याला लागलो. मला आणि माझ्या कुटूंबियांना रणगाड्यात सगळ्यात शेवटची जागा देण्यात आली होती Angry त्यामुळे आम्ही मागच्या गाड्यांवर लक्ष ठेवून होतो. मध्ये अचानक लालभडक गाडी दिसेनाशी झाली. आम्ही पुढे हे ड्रायव्हर-किन्नरला ताबडतोब सांगितले पण त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. "जाऊदे मरुदे, नस्ती पिडा टळली, फार बोअर मारत होते दोघेही" असे त्यांच्या मनातले विचार आम्हाला स्पष्ट दिसले. Happy तरीही आम्ही पाठपुरावा करतच राहिलो. नंतर हे ही लक्षात आले की सिंडी आणि कंपू ह्यांची गाडीही जी आम्ही समजत होतो ती नाहीच आहे. वेगळीच गाडी मागे आहे. फिकट रंगाची गाडी घेऊन येण्याचा तोटा!!! असो, मग खूप चर्चा करून आम्ही पुढे जाऊन थांबलो. सिग्नल नसल्याने कोणाचाच फोन लागत नव्हता! समजा ते सापडलेच नाही तर आमचा एक गडी जो लाल गाडीत होता त्याला आत सँटी बरोबर सरळ नॉक्स्व्हीलला जाऊन विमान पकडून अटलांटाला ये असेही (काँटॅक्ट झाल्यावर) सांगायचे असे सर्वानुमते ठरले. सगळ्यांचा ह्याला जाहिर पाठींबा होता कारण तेवढीच आमच्या ठासून भरलेल्या गाडीत जागा झाली असती. Wink
खूप वाट पाहून दोन्हीही कार न आल्याने आम्ही परत त्यांना शोधात जायचे ठरवले. परत जाता जाता दोन्हीही गाड्या विरुद्ध् दिशेला आम्हाला पास झाल्या. नितीनचे म्हणणे होते की त्यांनी रस्त्यावरचा एवढा मोठा रणगाडा मिसणे शक्य नाही, त्यानी आपल्याला पाहिले आहे आणि ते परत येतील. त्यामुळे आम्ही परत त्यांची वाट पाहत थांबलो. खूप वेळ वाट पाहिली. तेवढ्या वेळात नितीनने बाहेर उतरून बरेच मॉडेलींग चे प्रकार केले आणि पोराबाळांची करमणूक केली ;). कोणीही परत न आल्याने आम्ही हायेस्ट पॉईंट ला जायचे ठरवले. तिथे जाऊन पाहतो तर काय ही मंडळी मस्त भटकत होती Angry . रणगाड्यातले सगळेच (छोटी मुले धरुन) खूप संतापले की आपण आपले काळजीवाहू सरकार सारखे ह्यांची काळजी करत थांबलो आणि हे बघा इथे हिंडत बसलेत!! ते सगळे जवळ आल्यावर रणगाड्यातल्या सगळ्यांनी तार स्वरात (मुलेही मागे नव्हती) त्यांच्यावर आरडाओरडा करून मन जरा शांत करून घेतले. Happy अडमलाही मोठ्या मनाने सर्वांनी माफ करून परत आपल्यात घेतले.

आता ह्यापुढचा वॄ अडम ने लिहिलाय.

मस्त अ‍ॅडीशन. Happy

मागचे रस्ता चुकले, ह्याला (आमच्या) डायवरची काही चूक नव्हती. डायवर काय फास्ट गाडी मारत नव्हता... असे म्हैस मधले ड्वायलाग सुद्धा तयार करून ठेवले होते. Happy

सहीच गं मोहिनी... मात्र मी बोर करतो या विधानाचा जाहीर निषेध! आधी आयडी बोर आहे म्हणालात, आता मीच बोर करतो म्हणताय... Proud

आर्जे... Lol

अडमा, मो सही वृतांत Happy खूप धम्माल आली. अटलांटा गँग रॉक्स Happy सगळ्यात जास्त टीआर्पी घेतला तो नितीनने. मायबोलीकर नसूनही आणि कुठलेही मायबो लीकर न घेता त्याने मायबोलीकरांवर त्याने लै भारी जोक्स मारले. ह्यावरुन रुनी किती कर्तव्यतत्पर बायको आहे हे लक्षात येते Wink पण सगळे अटलांटाकर सगळे फार आतल्या गाठीचे आहेत. मी १०१ वेळा फोन केला पण रणगाड्यात काय गॉसिप सुरु आहे इसका ताक को तूर नही लगने दिया. बाकी इतक्या लहान वयातही विनायक लै भारी ड्रायविंग करतो Wink त्याबद्दल त्याचे कौतुक तर आहेच पण विनायक व सँटी हे दोघेही वयाने माझ्यापेक्षा लहान आहेत ह्याची मी जाहीर कबुली देते आहे Proud गटगमधे ठरल्याप्रमाणे सँटीने त्याच्या जुन्या आयडीने पुनर्प्रवेश केला बघून आनंद वाटला. नाहीतर तो नवा आयडी बघून त्याची (पण) चाळीशी आली की काय असे वाटायचे Wink पण 'त्या' मायबोलीकराच्या वयाचा एवढा मोठा शॉक बसलेला असून देखील सँटीने फोटो मात्र भरपूर काढून घेतले..कशासाठी ते विचारु नका..त बोले तो ताकभात ओळख लेलो Proud लाँग आयलंडकरांची अशी अवस्था बघून आर्जेला मात्र फारच गम्माडी गम्मत झम्माडी झम्मड वाटत होती. ह्या दोघांचे काय सेटिंग आहे ते मात्र शेवटपर्यंत कळले नाही Wink

शनिवारी सकाळीच उठुन मी आर्जे आणि पुर्वाच्या आख्या फ्यामिलीला चांगला आलं घालुन \चहा केला. त्यामुळेच एनर्जी येउन शिल्पा पोहे करायला उभी राहिली. अ‍ॅडमाने मधेच तिला आदित्य उठला असे सांगुन तिथुन पिटाळले (लागोलाग आर्जे पण गायब झाला Wink ) आणि घाई घाई पोह्यांबरोबर स्वतःचा फोटो काढुन घेतला. त्याने फक्त मीठ घातले होते पण ते कमीच पडले. त्याने पनीर पण नीट मॅरिनेट केले नाही कारण तेव्हा तो 'गॅब्रिएला सबातीनी ही स्टेफी ग्राफपेक्षा चांगली 'खेळाडु' (?) आहे' अशी टेनिस ह्या खेळाशी संबंध नसलेली स्टेटमेंट्स देण्यात गुंगला होता. मिसळीसाठी सँटीने दोनच टॉमॅटो चिरल्याने मिसळीची चव जरा बिघडली होती. कांदे पण इतके मोठे मोठे चिरले होते. त्यामुळेच नितीनला मुंडकी कापल्याची उपमा सुचली असणार. अ‍ॅडम आणि आर्जे दोघेही नव्या नवरीने सासरी आल्यावर पहिल्यांदा स्वयंपाक करावा तसे करत होते. एकच ट्रे लावला ग्रिल करायला, त्यात काही काही तुकड्यांना मसालाच नाही, टायमर सेट करायला विसरले आणि दर दोन मिनिटांनी अवन उघडुन बघत 'झाले का आमचे चिकन' असे म्हणत होते. शेवटी तर गौरीहार पुजायला तिथे अवनसमोरच येऊन बसले. त्या अवनची झळ लागुन माझा चेहरा काळवंडला आणि माझा एकही फोटो चांगला आला नाही Sad

खुशबु आणि सुमीतला बरेचसे बोलणे मराठी + मायबोली अशा संदर्भात असल्याने कळले नाही पण तरी त्यांनी वेळोवेळी हसून साजरे केले Wink सुमीतला एकुणच मायबोली आणि मायबोलीकर ही concept फार नवीन होती. कधी न भेटलेल्या लोकांबरोबर मी कँपिंग ठरवले आणि त्याला यायला नितेश एक पाय पे तयार झाला ऐकुन त्याला फारच आश्चर्य वाटले होते. पण सगळ्यांना भेटल्यावर त्याला भारीच वाटले असे म्हणाला. पहिल्यांना भेटतोय असे वाटलेच नाही म्हणे. परतीच्या वाटेत आम्ही त्यांच्या (नितेश आणि सुमीत) एका मित्राकडे मुक्कामाला होतो. मित्र म्हणत होता की त्याला मराठी बोलता येत नाही पण दुसर्‍याने बोललेले समजते. त्यावर सुमीत म्हणाला, 'मुझे भी कल तक ऐसा ही लगता था |' Proud

तटि: घासभर फरसाण घेतला तर काय मेलं ते इथे येऊन सांगायचं. खारट तर होता. म्हणत असाल तर उरलेला पाठवुन देते. माझ्या सीड्या पाठवा आधी Proud

सिंडे, अशक्य!!! Rofl
अडम काम करायचे नाटक उत्तम वठवत होता.. नुसताच किचनमधून इकडून तिकडे भटकत होता असा रीपोर्ट मला अजून एका खात्रीलायक माबोकराकडून मिळाला आहे, त्यावर तू शिक्कामोर्तबच केलेस Proud

सिंडे, झकास ग, मस्त लिहिलयस!!
आम्ही "रॉक्स" आणि "आतल्या गाठीचे" सुद्धा, म्हणजे तुला कसे लोक आवडतात बघ!! Happy (दिवे घे बाई नाही तर माझ्याशी खुन्नस काढायला निघशील ;))
मुझे भी कल तक ऐसा ही लगता था>> Proud
इतक्या लहान वयातही विनायक लै भारी ड्रायविंग करतो>> Proud

अगं तुम्ही तसे असलात म्हणून काय झालं, मी तर चांगली आहे ना Proud मी नाही काढणार हो खुन्नस बिन्नस (घाबरतेस की काय मला) Lol

वृत्तांत झकास !!!
नितीन लय भारी जोक्स टाकतो हे खरच. त्याच्यामुळे खरतर आम्हाला रणगाड्यात (सिंडीच्या टुकार) सिड्यांची गरज पडली नाही. प्रवासात सुद्धा त्याची नॉन-स्टॉप कॉमेडी चालू होती.

त्.टी. : इथे जाहीर करणेत येते आहे की, सिंडीने पाठवलेले मसाल्याचे पाकीट शेवटी गटग साठीच वापरण्यात आले. अटलांटा कंपू पर जो ढापूगिरीका इल्जाम लगाया गया था, उसे परत ले लिया जाये !

सिंडे लय भारी. तुझ्या वृत्तांताला उत्तेजनार्थ बक्षीस. Happy
मला आज सकाळीच बसस्टॉपवर परत एकदा हिंदी झाडायची संधी मिळाली आणि त्या दिल्लीकरणीने मी खूप छान हिन्दी बोलते असे सर्टिफिकेट दिलय, त्यामुळे मी एकदम पेटके उठलेय. Proud

सँटीनोला सगळ्यांनी (त्याचे वय काहीही असले तरी) फचिन मामा म्हणावे Proud - हुकूमावरून

फचिन मामा Rofl

रुनि, मला हसायला येतेय पण रडायला सुद्धा येतेय. आता ललित पाडल्याशिवाय गत्यंतर नाही भोआकफ Wink

सिंडे Lol सहीच...

अडमाने पोह्यांबरोबर स्वत:चा फोटो काढून घेतला का? आता दाखवेल सगळ्यांना मी पोहे केले म्हणून...
काय ही आजकालची पिढी.. Proud

मी कांदे व्यवस्थित चिरले होते बरं का.. त्याच्यापेक्षा बारीक तर फक्त भेळवाला चिरू शकेल..

मी मो ला तेच सांगत होतो की सगळ्या मुलांनी माझा मामा आणि काका केला. पूर्वी सगळे दादा म्हणायचे... Happy

>>>काय ही आजकालची पिढी..
सँटोबा, खरं बोल्ला बर्का! आता हेच बघा, नव्या नवर्‍या आधी सासरी स्वयंपाक करून मग गौरीहार पुजायला. शोभतं का? Proud

सिंडे, ह्या ना त्या कारणानं, तुझ्या नावानं शंख करणारी बरीच पब्लिक निघाली हां या जीटीजीत. आम्ही नवतं गंऽ बाई असं काई म्हंटलं!

वृतांत जुगलबंदी झकास! Lol अरे हे सगळे सिंडी वर का खार खाऊन आहेत. तरी तिनी वृत्तांत तसा सौम्य लिहीला, मला तर वाटलं आता सँटी आणि आडमावर पेशल फार्सं येणार. :)एकंदरित धमाल केलेली दिसते.
बाकी अडमा मी तुझा वृत्तांत आता वाचत होतो, हे वाक्य काही कळलं नाही.
"सिंडी तिथे परप्रांतियांच्या कळपात फसलेली असल्याने फोन वर ती सारखे आमच्या गप्पांचे अपडेट घेत होती.."

Pages