ज्युनियर मास्टरशेफ - झटपट ब्रेडची रसमलाई- श्रावणी - वय ११ वर्षे.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 September, 2017 - 15:11

आई आणि किचन हे समिकरण श्रावणीला समजू लागल्यापासून कळू लागल होत. आईची जागेपणीची जास्तीत जास्त सोबत किचन मधेच. बाळ असताना जेवण करताना घरातली चमचे, वाटी, बशी देउन किचन मधेच खेळात गुंग असलेल बाळ कधी आईच अनुकरण करू लागल ते कळलही नाही. खेळण्यातल्या चपात्या करता करता आई शेवटची चपाती मी करते अस करत करत श्रावणी आता बरेचसे खाद्य पदार्थ बनवू लागली आहे. चहा, गरज पडल्यास वरण-भात , पिझ्झा, ऑमलेट, कांदेपोहे, बिस्कीट केक, सॅडविच असे अनेक पदार्थ त्ती बनवतेच पण आता यूट्युबवरच्या तिला झेपतील अशा पाकक्रियेच्या विविध रेसिपीजही ती ट्राय करते. बनवलेले पदार्थ बहुतांशी चविष्टच असतात. खालची रेसिपीही तिने यू ट्युबचा आधार घेउन केली आहे.

साहित्यः
अर्धा लिटर दूध
अर्धा वाटी किंवा आवडीनुसार कमी जास्त साखर
थोडे ड्राय फ्रुट्स
१ चमचा दूधाचा मसाला किंवा केसर, वेलची पावडर
ब्रेड (तिने पुरी कापतो तसे धारदार वाटीच्या सहाय्याने ब्रेड गोल कापून घेतले)

कृती
प्रथम दूध थोडे आटवा. त्यात साखर व ड्रायफ्रुट घालून अजून थोडे उकळा.

दूध गार करा. साधारण झाल्यावर थोडावेळ फ्रिज मधे ठेवा.

सर्विंग डिश मधे ब्रेड लावून घ्या. त्यावर आटवलेले दूधाचे मिश्रण ओता.

तयार आहे झटपट ब्रेड रसमलाई. चव अप्रतिम लागते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Pages