माझ्या "मी"ची व "त्या"ची मैत्री

Submitted by सेन्साय on 27 July, 2017 - 21:57

माझ्या "मी"ची व "त्या"ची मैत्री
म्हणजे ....
उधाण आलेल्या भक्तीसमुद्राच्या
बेधुंद उत्साही सळसळत्या लाटा.
"तो" माझा" मित्र असल्याची
शाश्वत सुंदर छटा
वय, जात, धर्म, झुगारून
जोडलेल्या असंख्य वाटा.

"त्या"चा प्रेमळ शब्द म्हणजे
माणुसकीचं झाड उगविण्यासाठी
टाकलेलं हळवं खत.
पश्चातापदग्ध मी खंबीरपणे
उलगड़तो तेथे माझे मनोगत

"त्या"ची मैत्री म्हणजे
रणरणत्या उन्हात फुलणारा तो गुलमोहर,
अव्यक्त भावनांचे मूर्त रूप
प्रत्येक क्षणात सुख-दुःखात
दिलेला आपुलकीचा वेळ
आयुष्यभर क्षणाक्षणांची संगत.
ठेचकाळून पडताना सावरणारा तो हात.
श्रद्धावान मित्रांनो ही त्याची साद
शेवटच्या प्रवासात रेंगाळणाऱ्या
त्या आठवणी,
जन्मांतरीच्या साथीचं ते आश्वासन.

माझी "त्या"च्यासंगे मैत्री म्हणजे....
असहाय्य "मी"च्या मदतीस
त्याचा अनन्य प्रतिसाद
विगताचाही सुगती करणारी
मला गवसलेली पाऊलवाट

- अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंबज्ञजी भारी...मलाही 'त्या'च्याशी मैत्रीचं नातं जुळवणं खुप भावतं किंवा मग विठ्याशी असलेलं जनीचं नातं..शिव्या शाप देऊन असलेली भक्तीपरंपरा... Happy

छानच !