प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ३ - खेळ मांडियेला!

Submitted by संयोजक on 2 September, 2017 - 10:38

प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ३ - विषय - खेळ मांडियेला!

"All work and no play makes jack a dull boy!" असे कोणीतरी म्हटले आहेच. या खेळांना आपल्या जीवनात एक महत्त्वाचे स्थान आहे. आपण लहानाचे मोठे होतो ते खेळ खेळतच. सुरूवातीला खेळलेले विटी-दांडू , गोट्या, सागरगोटे असोत की मोठे झाल्यावर खेळलेले खोखो, क्रिकेट असोत, या खेळांची मजा आपण सर्वांनी लुटली असेलच. झालंच तर पत्ते, कॅरम वगैरे बैठे खेळ संगतीला असतातच. या खेळांतून आपण बरेच काही शिकतही जातो मग ती हार-जीत असो की टीम स्पिरीट.
तर मंडळी मायबोली गणेशोत्सव २०१७ घेऊन येतोय तिसरा झब्बू - " खेळ मांडीयेला " म्हणजेच विविध खेळांची प्रकशचित्रे.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635

बास्केटबॉल
bball.png

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults