झब्बू क्रमांक १ पयलं नमन

Submitted by संयोजक on 21 August, 2017 - 20:42

Swaminarayan Temple.jpg

गणपती बाप्पा मोरया!

मायबोली गणेशोत्सव २०१७ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि पहिला विषय आहे - पयलं नमन - देवळांची प्रकाशचित्रे.

देवाचे अस्तित्व चराचरामधे व्यापून राहिलंय हे कितीही खरं असलं तरी देवळांमधे किंवा मंदिरांमधे गेल्यावर मिळणारी मन:शांती निराळीच! काहींना तिथलं मांगल्यं भावतं तर काहींना शांती, कोणी तिथे इतिहास शोधतो तर कोणाला वास्तुरचना भावते. देवाचं हे घर प्रत्येकाला आपल्या नजरेतून वेगळं भासतं आणि प्रत्येक जण त्याला आपल्या मनामधे, आठवणींमधे स्वत:ला हवं त्या प्रमाणे साठवून घेतो. जगातलं प्रत्येक देऊळ हे असंच सुंदर आहे याची आम्हाला खात्री आहे. तेंव्हा तुम्ही पाहिलेल्या, तुम्हाला आवडलेल्या आणि तुम्ही साठवलेल्या देवळांच्या प्रकाशचित्रांचा सगळ्यांनाच आस्वाद घेऊ द्या.. काय?

अनेकार्थाने सुंदर असलेल्या देवळांची प्रकाशचित्रे सगळ्यांसाठीच उपलब्ध करुन देऊया.

मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस्‌ अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?
आपण जशी इतरांनी उपलब्ध करून दिलेली चित्रं वापरतो, त्याच सागरात आपल्याला काही थेंब टाकता आले, काही खारीचा वाटा उचलता आला तर, असा विचार करून पहिला झब्बू हा देवाला, अर्थात आंतरजाल वापरणाऱ्या समुदायाला अर्पण करायचं आम्ही ठरवलं आहे.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.

हे लक्षात ठेवा -
१. या धाग्यावरचे नियम इतर झब्बूच्या नियमांपेक्षा वेगळे आहेत.
२. ही स्पर्धा नसून खेळ आहे. प्रत्येक चित्राखाली ते नंतर शोधायला सोपं जाईल, अशा काही शब्दखुणा अपेक्षित आहेत. या शब्दखुणांमुळे नंतर वर्गीकरण करणं सोपं होईल.
३. इथे तुमच्याकडे असलेली देवळांची प्रकाशचित्रं किंवा रेखाटनं, जी तुम्हांला पूर्णपणे प्रताधिकारमुक्त करावयाची आहेत, ती टाकणं अपेक्षित आहे. ती चित्रं नंतर वापरताना, किंवा काही बदल करताना तुमचा नामोल्लेख केला जाण्याचं बंधन, परवानगी घेण्याचं बंधन वापरकर्त्यावर असणार नाही.
४. या धाग्यावरची प्रकाशचित्रं आंतरजालावरील कुणीही व्यक्ती वा संस्था , कुणाचीही परवानगी न घेता, कुठल्याही कारणासाठी (व्यावसायिक / अव्यावसायिक commercial / non commercial) वापरू शकेल (Public Domain).
५. या प्रकाशचित्रांमध्ये कुणीही काहीही बदल करू शकेल.
६. या धाग्यावरची प्रकाशचित्रं पुन्हा वापर करायला सोपं जावं म्हणून मायबोलीवर एक कायमस्वरूपी अल्बम केला जाईल.
७. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊन शकणार नाही.
९. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्ं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.
१०. या धाग्यावर प्रकाशित केलेलं प्रकाशचित्र तुम्ही कायमचं प्रताधिकारमुक्त करत आहात, हे लक्षात ठेवा. चित्र प्रकाशित झाल्यावर त्यावर तुमचा काहीही हक्क असणार नाही. तुम्ही ते देवाला दान करता आहात. प्रकाशचित्राखाली ते कुणी दान केलं, याचा उल्लेख असेल.
११.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनीमोहोर, ती जागाच सुंदर आहे. पण जंगलीमहाराज मंदीर आणि जंगली महाराज रस्त्याच्या ग्लॅमर मुळे नेहेमीच झाकोळलेली..
--

सुवर्ण्मंदिर, अमृतसर
IMG_1225.JPG

सगळेच फोटो मस्त
साजिऱ्याचा पातळेंश्वराचा फोटो आणि मध्यलोक यांचा गिरनारचा फोटो भारी आलेत

धन्यवाद धनि, मैत्रेयी, जाई आणि सगळे _/\_

साजिरा भुलेश्वरचा फोटो सुंदर आलाय, सारिवा ने जालना येथील गणपती मंदिर सुरेख छायांकित केले आहे वाह !

पुढील झब्बू

दिग्रस, जि. यवतमाळ येथील जैन मंदिर

Jain Mandir Digras.JPG

Pages