कोण आहे हा पाखंडी बाबा राम रहीम?

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 August, 2017 - 11:25

कोण आहे हा संत बाबा राम रहीम?
याला यौन शोषणच्या आरोपाखाली तो गुन्हा सिद्ध होत कोर्टाने शिक्षा सुनावली आणि देशातील पाच राज्ये पेटली. बसेस ट्रेन जाळल्या जात आहेत, मिडीयाच्या वॅनलाही नाही सोडले, एक पॉवर स्टेशनही उडवले, आतापर्यंत तब्बल 30 जण यात मेले तर शेकडो जखमी झालेत. हरयाणा सरकारने 15 हजार सशस्त्र सैनिकांची तुकडी हे दंगे रोखायला कामाला लावली. 200 च्या वर ट्रेन्स रद्द झाल्यात. कामकाज कर्फ्यू लागल्यासारखे ठप्प झालेय. काय आहे हा प्रकार नक्की. लोकं वेडी आहेत का आपल्याकडची? ज्याच्यावर एवढा घाणेरडा आरोप कोर्टात सिद्ध झालाय त्याच्याच पाया पडायची अक्कल कुठे गहाण ठेवून येतात ही लोकं?
आणि हे मुक्ताफळ ऐकून तर मी धन्य झालो !
साक्षी महाराज ने कहा है, 'अगर किसी व्यक्ति पर यौन उत्पीड़न का आरोप है लेकिन उसके साथ करोड़ों लोग खड़े हैं, तो उन करोड़ों लोगों की आवाज क्यों नहीं सुनी जा रही है?"

सविस्तर ईथे वाचा....
http://m.dailyhunt.in/news/india/hindi/the+quint+hindi-epaper-hquint/liv...

तळटीप - धागा चालू घडामोडीमध्ये काढला आहे. बाबा खरेच पूज्यनीय संत असतील तर धार्मिक विभागात हलवायला तयार आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<कालपासून सोशल मीडियावर भाजप समर्थक राम रहिमला व त्याच्या गुंडांना विरोध करत आहेत, भाजपला प्रश्न विचारत आहेत>
काही काही (तथाकथित, स्वयंघोषित) नवदेशभक्त फक्त हिंदू बाबा लोकांवरच बलात्काराचे आरोप होतात (नित्यानंद (हेच नाव ना?आसाराम, आता हे रामरहीम गुरमीत सिंग - जरी सनव यांनी त्यांच्या नावात फक्त रहीम ठेवला असला तरी)
पण इतर धर्मांतल्या बलात्कार्‍यांना धरत नाहीत असा ओरडा करताहेत.

आपण दोन-चार नावं घेतो, पण आजकालचे बहुतांश बाबा असेच असतात. लोक लागतात त्यांच्या नादी (का???) आणि ते घेतात त्याचा फायदा …

http://www.openthemagazine.com/article/india/the-sex-lives-of-godmen

http://indianexpress.com/article/india/dera-violence-toll-up-to-32-punja...

National integration and law and order are above everything. We are one nation, not a party nation. Politicians need to understand that the nation is one. It is the Prime Minister of India, not BJP. It is the Chief Minister of the state, not BJP. You (Satya Pal Jain) are Additional Solicitor General of India, not of any party,” said a full Bench of the High Court at a special hearing on Saturday.

Stating that the Centre was treating Punjab and Haryana like a “colony”, the court said it should play a more active role. On Thursday, the court had noted that the Centre should not “abdicate or avoid its responsibility”. The court observed that the Khattar government seemed to have “surrendered before the followers of Dera Sacha Sauda for political considerations.” “This was a political surrender to allure vote bank,” it observed, adding that Khattar was “protecting” the Dera.
The Chief Minister is also the Home Minister. Why could you not prevent the crowd from gathering for the last seven days? They were all outsiders, but were allowed to enter Panchkula, stay there and occupy public place,” said the Bench, comprising Acting Chief Justice S S Saron and Justices Surya Kant and Avneesh Jhingan. “You have been misleading us. There has been a sea difference between administrative and political decisions. Administrative decisions were paralysed because of the political reasons,” it said.

Taking note of the suspension of Panchkula DCP Ashok Kumar, the court said a deeper probe was required to ascertain who was behind the flip-flop over the orders to impose Section 144. “It has strengthened our belief that it is all political,” said the bench. “You allowed the crowd to gather. A probe will expose it.”

आसारामबापूप्रकरणी थेट सोनिया गांधी आणि काँग्रेसवर हिंदुद्वेषाचा आरोप करणार्‍या नेत्याच्या पक्षाच्या समर्थकांनी सद्य स्थितीत, नामशेष होऊ घातलेल्या कॉंग्रेसकडे बोट दाखवावे, यासारखी गंमत दुसरी नाही.

शहामृगांनो , भूतकाळाच्या वाळूत माना खुपसून बसा. काँग्रेसच्या नावाची जपमाळ घ्या. सद्य स्थितीला तुम्ही निवडून दिलेली सरकारे आणि तुमचे देवतुल्य नेते जबाबदार आहेत हे विसरा. त्यांच्या कार्याबद्दल एकही अक्षर बोलू नका. काँग्रेस काँग्रेस अशी पोपटपंची करत रहा. वर काँग्रेस नामशेष होते आहे हेही आळवा.

आता या न्यायाधीशांवरही पक्षपातीपणाचे आरोप करा

धर्मसत्ता ही राजसत्तेपेक्षा श्रेष्ठ असे विधानसभेत सभापतीपेक्षा उच्चासनावर एका धर्मगुरूला बसवून सिद्ध केलेच आहे. चालू द्या. तुमच्या स्वप्नातला भारत हा असाच आहे, हे मान्य करण्याचे धैर्य तरी दाखवा.

मागे गोरखपूरच्या धाग्यावर कोणीतरी "गरिबांची मुलांना पोसायची ऐपत" असा मुद्दा काढलेला. इथे दुसरं काही बोलायच्या अगोदर काँग्रेसकडे बोटं दाखवायला सुरुवात होते, बलात्काऱ्या चा उल्लेख राम वगळून फक्त रहीम म्हणून केला जातो. कविमनाचा आयडी एका वाक्याचा गुळमुळीत निषेध करताना "भक्तांमध्ये समाजकंटक घुसले असतील" अशी पुस्ती जोडायला विसरत नाही. ही आणि अशी कित्येक उदाहरणे सोशल मीडियावर रोज बघायला मिळतात. मोदीभक्तांमधली मूलभूत संवेदनशीलता हरवत चाललेली बघून चिंता वाटते.

कविमनाचा आयडी एका वाक्याचा गुळमुळीत निषेध करताना "भक्तांमध्ये समाजकंटक घुसले असतील" अशी पुस्ती जोडायला विसरत नाही. >>>

व्यत्ययजी,
सदर आयडीचं स्पष्ट नाव आपण घेतलं नसलंत तरी, आपण अड्ड्यावर लिहीलेल्या प्रतिक्रियेतून आपला रोख माझ्याकडे आहे हे लक्षात येतंच!

Submitted by व्यत्यय on 26 August, 2017 - 10:05
"समाज भरकटलेला आहे" हेच वाक्य भाजपाच्या संदर्भातही किती फिट्ट बसतं ना. बाकी निषेधाचं एखादं गुळमुळीत वाक्य टाकून विषयांतराची ८-१० वाक्य टाकायची स्ट्रॅटेजी कशी वाटते?

हि आपली अड्ड्यावरील प्रतिक्रिया.

या धाग्यावर मी सुरूवातीला दोनच प्रतिसाद लिहीलेत. त्यापैकी एका प्रतिसादात मी ह्या बलात्कारी प्रवृत्तींचा समूळ नायनाट व्हायला हवा अशा अर्थानं लिहीलेलं आहे.

Submitted by व्यत्यय on 25 August, 2017 - 22:25
भक्त म्हणून काही समाजकंटकही घुसलेले असतील.

हि आपली या धाग्यावरील पहिली प्रतिक्रिया जी उपरोधानं दिलेली असेल तर माहीत नाही पण आता हेच आपलं वाक्य आपण माझ्या माथी का मारत आहात?

IMG-20170827-WA0000.jpg

महाभ्रष्टाचारी, महादंगेखोर, डब्बल ढोलकी, खोटे बोलण्यात विश्वविक्रमवीर कपटी कारस्थानी भाजपाचे निर्लज्ज नेते अजून बाबाचीच बाजू घेत आहे किती ते गुलामगिरी करावी काही लिमिट ठेवलीच नाही.

त्यामानाने कॉंगेसचे नेते के़ैकपटीने समजूतदार आहे.

राहुल, ते वाक्य आपले सगळ्यांचे लाडके गझलनवाझ बेफिकीर यांच्या धाग्यातून उचललेलं आहे. तुम्ही लोड घेऊ नका.

नवीन Submitted by व्यत्यय on 27 August, 2017 - 12:22
राहुल, ते वाक्य आपले सगळ्यांचे लाडके गझलनवाझ बेफिकीर यांच्या धाग्यातून उचललेलं आहे. तुम्ही लोड घेऊ नका.
>>>
ओक्के! गैरसमज नसावा. Happy

मगाशी फेसबूकवर एक फोटो पोस्ट पाहिली. तांत्रिक कारणाने ईथे देऊ शकत नाही. तशी गरजही नाही. पण त्यानुसार येत्या वर्ष-दिड वर्षात अश्या म्हणजे गोरखपूर ऑक्सिजनकाण्ड आणि हे हरियाणा राम रहीम दंगल प्रकरण सारख्या घटना बरेच घडतील. 2019 च्या निवडणूकांना डोळ्यासमोर ठेवत भाजपाला बदनाम करायला आणि त्यांच्या राज्यात अनागोंदी माजवायला या घटना घडवून आणल्या जातील.

यात भाजपाला बदनाम करायचा संबंध कुठे आला ?

बाबाची पुर्वी काँग्रेसात ऊठबस होती , आता भाजपात आहे.

जे हेलिकॉप्टर मोदी वापरतात , तेच वापरून बाबालाही अटक केली.

बाबा हिंदू स्वामी आहे , मठ आहे म्हणजे हिंदू / भाजपा / भक्त यांचा एक कॉमन सबसेट असणार. तो गट चिडणार हे स्वाभाविक असते. कोणताही प्रश्न निर्माण झाला की डिनायल मोडमध्ये जाणे , ही मानवी वृत्ती आहे.
विनाकारण विरोधी पक्षाला का बदनाम करायचे ?

.....

लालूच्या सभेचे फोटो आले की म्हणायचे हे फोटोशॉप केले आहे , यांच्याकडे आता लोकच जास्त नाहीत.

आणि बाबाच्या डेऋयात तोडफोड झाली की बोलायचे ... अबब ! किती ही विरोधी पक्षाची माणसे ! बघा कशी मोठ्या संख्य्ने नासधूस करताहेत .

डब्बल ढोलकी नका वाजवू .

मोदीभक्तांमधली मूलभूत संवेदनशीलता हरवत चाललेली बघून चिंता वाटते.
<<

तथाकथित सुशिक्षित भक्त. हे संभावित, सो कॉल्ड सभ्य लोक, ज्यांनी समाजाची धुरा वाहणे अपेक्षित आहे, ते असे वागू लागलेले पाहून चिंता वाटू लागते.

बाबूनी वर परफेक्ट बोट ठेवलंय प्रॉब्लेम वर.

सोनू यांचा प्रतिसादही बोलका आहे. पोलिस, एसारपी, मिलिटरी यांना फक्त गम्मत पहायला ठेवलं असे त्या म्हणतात. मी म्हणेन की स्टेट मशिनरी त्या डेराभक्तांच्या प्रोटेक्शनसाठी होती. स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम चा प्रयोग गुजरातेत सुरू झाला, अन तो आता देशभर पसरवत न्यायचा आहे.

डोळे उघडा रे माझ्या सुशिक्षित मित्रांनो, किमान काय चाललं आहे आजूबाजूला, ते तरी नीट बघा. लिहावाचायला शिकला आहात ना? किमान इतिहास वाचा. व्हॉट्सॅप फॉर्वर्ड्स नव्हेत..

आज पेपर मध्ये वाचले,
न्यायालयाच्या आवारातून बाबाला पळवून नेण्याचा प्लॅन होता, ज्यात 4 पोलीस सामील होते,
ऐनवेळी हा प्लॅन उघडकीस आला आणि बाबांचे पलायन फसले, या नंतर काही फोन कॉल केले गेले आणि हिंसक कारवायांना सुरवात झाली.

मुस्लिम बहनों को न्याय मिलने पर हम सब खुश हो रहे थे ।
आज एक हिन्दू बहन को न्याय मिला है तो तांडव हो रहा है ।
वाकई अपना देश बदल रहा है ।।।

Proud

मुस्लिम बहनों को न्याय मिलने पर हम सब खुश हो रहे थे ।
आज एक हिन्दू बहन को न्याय मिला है तो तांडव हो रहा है ।
वाकई अपना देश बदल रहा है ।।।

मोदीभक्तांमधली मूलभूत संवेदनशीलता हरवत चाललेली बघून चिंता वाटते.>>> मोदी आणि भाजपविरोधी आपली संवेदनशीलता फक्त्त् मोदींना विरोध होइल किंवा विरोध करण्यापुरती वापरतात ते ही चिंताजनकच

@ टकमक टोक, जय महाराष्ट्र वरील बातम्यांनुसार बाबा राम रहीमला २ प्रकरणामध्ये १०-१० वर्षे अशी एकूण २० वर्ष + ३० लाख रुपये दंड अशी शिक्षा झाली आहे.

शिक्षा झाल्यावर बाबा राम रहीम रडत होता म्हणे!!!

मस्त १०+ १० अशी वीस वर्षे शिक्षा
हा निर्लज्ज गुरमीत अधिकार्यांना "मुलीला सोबत राहू द्या नाहीतर खट्टर ला सांगून सस्पेंड करेन" अशी धमकी देत होता.

कसला नीच माणूस आहे

ह्या बुवाला शिक्षा झाली हे उत्तम पण हकनाक 3७ जिवांचा बळी गेला.सिएम आणि पिएम यांच्या कमजोरपणाने ही घटना.घडली आहे।

एक व्हॉटसप पोस्ट

बाबा गुरमीत सिंह राम रहीम याच्या अटकेनंतर डेरा सच्चा सौदा प्रकाशात आला आहे... हा डेरा काय आहे, त्याचे सदस्य कोण आहेत, ते एका बलात्कारी बाबाच्या बचावासाठी का हिंस्त्र झाले आहेत, यावर प्रकाश टाकणारी हरनीध कौर यांची मूळ इंग्रजीतली फेसबुक पोस्ट इथे स्वैर अनुवादली आहे. केवळ डेरा सच्चा सौदाच नाही, तर आपल्या आसपास एखाद्या बाबा-बुवापासून राजकीय नेते, पक्ष, संघटना, जाती, जमाती आणि थोरांच्या वारसांभोवती जी बेबंद गर्दी गोळा होते, तिचाही काहीसा अन्वयार्थ लावण्यासाठी या मजकुराची मदत होऊ शकेल.

हरनीध कौर लिहितात,
पंजाबमध्ये मुळात डेरा कसे तयार झाले आणि त्यांची भूमिका कसकशी बदलत गेली, हे लक्षात घेतल्याशिवाय डेरा सच्चा सौदाच्या हिंसाचाराने भयाकुल होण्यातही काही मतलब नाही.

उत्तर भारतातल्या एका मोठ्या जनसमुदायाला भोगाव्या लागलेल्या ऐतिहासिक जुलूमांमधून मुक्त करणारी ओळख डेरा सच्चा सौदाने दिली आहे. या डेऱ्याचे बहुतेक सदस्य मागासवर्गीय आहेत. त्यांनी जातीच्या जोखडातून सुटकेसाठी शीख धर्माचा स्वीकार केला. पण, तिथेही त्यांना जातविग्रह, तीच उतरंड आणि त्याच अत्याचारांचा सामना करावा लागला. शीख धर्म सैद्धांतिकदृष्ट्या जातविरहित आहे. मात्र, प्रत्यक्षातली परिस्थिती दुर्दैवाने फारच वेगळी आहे. जाट-खत्री या उच्चवर्णीय जातींचा शिखांच्या धार्मिक राजकारणावर प्रभाव आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी आणि इतर गुरुद्वारा समित्यांमध्ये त्यांचंच प्राबल्य आहे. त्यांच्यानंतर शीख धर्मात आलेल्यांना त्यांनी पद्धतशीरपणे सत्तास्थानांपासून दूर ठेवलं असून मुळातलं जातीय उच्चनीचतेचं समीकरण शीख धर्मातही अबांधित ठेवलं आहे.

या आणि अशा इतर घटकांमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे, हतबलता आहे, भ्रमनिरासाची भावना आहे. उत्कर्षाची आणि उन्नयनाची वाट त्यांना दिसतच नाही. मग ते अंमली पदार्थांकडे वळतात. घातक नशा ही आता पंजाबची ओळख बनून बसली आहे. त्याचबरोबर आर्थिक असुरक्षितता आणि शिक्षणाचा अभाव यांनीही परिस्थिती आणखी बिघडवली आहे. समाजाचा हा वर्ग दिशा हरवलेला वर्ग आहे. म्हणूनच डेरा सच्चा सौदासारखी संघटना भक्कमपणे त्यांच्या पाठिशी उभी राहते, तेव्हा तिचा त्यांना आधार वाटतो. डेरा त्यांना प्रतिष्ठा देतो. तो त्यांना शिक्षण देतो, दोन वेळचं अन्न देतो, अंमली पदार्थांपासून दूर ठेवतो, त्यांना नोकऱ्या देतो आणि मुख्य म्हणजे जगण्याला उद्देश देतो, आपण कोणीतरी आहोत, अशी जाणीव देतो. आता ही दिशा एक बलात्कारी देतो आहे का, अन्न भरवणारा हात एका खुन्याचा आहे का, याची पर्वा या देशातला कोणताही भरकटलेला माणूस किंवा उपाशी माणूस करत नाही; डेराचे अनुयायी अपवाद कसे ठरतील?

राम रहीम बाबाच्या अटकेनंतर उसळलेला उद्रेक हा निव्वळ व्यक्तिपूजेच्या स्तोमातून उद्भवलेला धार्मिक उन्माद नाही. आपला आधार आता जाणार, या असुरक्षिततेच्या भावनेचीही त्याला जोड आहे. बलात्कार प्रकरणात झालेला न्याय हा डेराच्या अनुयायांसाठी पुन्हा एकदा सामाजिक उतरंडीत तळाला लोटले जाण्याची भीती घेऊन आला आहे. त्यातून ते नुकतेच बाहेर पडायला शिकले आहेत. आताचा हिंसाचार हा जवळपास दोन पिढ्यांच्या खदखदीतून जन्मला आहे. आपल्या विकासाच्या कल्पना किती अन्यायकारक आणि वरवरच्या, दिखाऊ असतात, याचं भान आणून देणारी ही घडामोड आहे. यातून आपण धडा शिकणार का, हा मुळातला प्रश्न आहे. दुसऱ्याच्या पाठीवर पाय देऊन विकास घडवून आणला की कधी ना कधी पिचलेली माणसं बंड करून उठतात, हा या उद्रेकाचा एक अन्वयार्थ आहे.

राजकारण्यांना हे कळतं. त्यांना व्होटबँक ओळखता येते. म्हणूनच तर ते राजकारणी असतात. त्यांनी असे डेरे उभे राहू दिले, त्यांचा उत्कर्ष होऊ दिला, त्यांची संख्या वाढू दिली. या डेऱ्यांना त्यांनी मोकळं रान दिलं. त्यांना सर्व प्रकारचं पाठबळ देऊन त्यांच्या रूपाने हक्काची मतपेढी निर्माण केली. हे डेरे एकमेकांमध्ये भांडत राहतील आणि जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जातील, याची काळजी त्यांनी घेतली. यातून त्यांना डेरे आणि त्यांचे जथेदार उपकृत करून अंकित करून घेता आले.

यातून अंमली पदार्थांपासून दूर ठेवणारी पण धर्म आणि सुरक्षा यांचं त्याहून घातक कॉकटेल पाजणारी ही व्यवस्था जन्माला आली आहे. धर्म ही अफूची गोळी असेल, तर श्रद्धा हा चिलमीचा झुरका आहे, जो एका क्षणात वेगळ्या जगात पोहोचवतो. त्यामुळेच डेरा सच्चा सौदाच्या रूपाने श्रद्धेसाठी जीव घेणारी फौज उभी राहिली आहे. ती उभी राहण्याची जबाबदारी संपूर्ण समाजावर आहे.

Pages