STY - ये विल है मुश्किल (ढूँढना)

Submitted by संयोजक on 21 August, 2017 - 13:52

ये विल है मुश्किल (ढूँढना)

सुंदरनगर… समुद्रसपाटीपासून ० फूट उंचीवर वसलेले गाव जे एक सफरचंदाच्या बागा असलेले हिल स्टेशनसुद्धा होते, तिथे बीजी राहत होती. हो आता ‘होती’च म्हणायला हवे कारण बीजी अब इस दुनियामें नही है.. दहा दिवसांपूर्वीच बीजी देवाघरी गेली. पण आता हयात नसलेल्या या बीजीबद्दल आपण का बोलतोय?

थोडं भूतकाळात जाऊ. सुंदरनगरात सगळ्यांत मोठी टी-शेप हवेली असलेले रुद्रप्रताप सिंह ठाकूर म्हणजे बीजीचे सासरे.. टी फॉर ठाकूर. म्हणून हवेली पण टी शेप होती शिवाय त्यांच्या टी इस्टेट्स पण होत्या. या सर्व बिझनेसमुळे ते चांगलेच खानदानी रईस झाले होते. त्यांनी त्यांच्या धाकट्या मुलासाठी अवघ्या सोळा वर्षांच्या बीजीला पसंत केले व वयाच्या अठराव्या वर्षी बीजी लग्न होऊन सुंदरनगरात आली. अर्थात बीजी तेव्हा वेगळ्या नावाने ओळखली जात असे पण बीजीचे खरे नाव तिलासुद्धा चटकन आठवले नसते, इतके ‘बीजी’पण आता तिच्यात भिनले होते. बीजीची तरुणपणाची वर्षे मेकअप, वेणीफणी, घरसंसार, रसोई, करवाचौथ, मुलेबाळे यात बीजी आपलं… बिझी गेली होती. बीजीला सात मुले होती. चार मुलगे आणि तीन मुली! त्यांचीही लग्ने होऊन भरपूर नातवंडे आणि एका नातवंडाने लग्नाची व नंतरही भलतीच घाई केल्याने एक पणतू एवढा प्रचंड परिवार बीजीला लाभला होता. खेरीज जवळपास पन्नासेक वर्षे सुंदरनगरातच काढल्याने बीजीच्या पंचक्रोशीतही ओळखी खूप होत्या. हिवाळा ऋतू येताच ठाकुरांच्या सफरचंदाच्या बागेतून टोपली टोपली सफरचंदे शेजारपाजाऱ्यांकडे ऍपल पाय करण्यासाठी धाडली जात. चहासाठी दूध हवे, म्हणून रिकामा कप घेऊन कुणी शेजारीण आल्यास बीजी थेट आपली गाय तिच्या अंगणात नेऊन बांधत असे. (गायीचा चारा खायचा अफाट वेग पाहून शेजारीण अर्ध्या तासात गायीला बीजीकडे पुन्हा आणून सोडत असे, हा भाग वेगळा.) एकदा ‘साखर देता का थोडी?’ असे विचारत आलेल्या शेजारणीला बीजीने डायरेक्ट उसाच्या मळ्यात धाडले होते. अशा विधायक कामांमुळे बीजी पंचक्रोशीत ‘परोपकारी बीजी’ म्हणून प्रसिद्ध होती.

बीजीचा नवरा रुद्रप्रताप सिंह ठाकुरांचा धाकटा मुलगा हे आपण पाहिलंच. मग ठाकुरांचा मोठा मुलगा व त्याचं कुटुंब कुठे होतं? तर बीजीच्या लग्नाआधीच ठाकुरांचा थोरला मुलगा बॅगेत कपडे आणि डोक्यात राख घालून घेऊन त्याच्या बायकोसकट बाहेर पडला होता. कुणी म्हणे तो कॅनडाला स्थायिक झालाय, कुणी म्हणायचे लंडनला राहतो, कुणी म्हणायचे तो मादागास्करमध्ये राहतो. तात्पुरत्या भांडणामुळे घर सोडून गेला तरी त्याचे कुटुंबावर खूप प्रेम होते म्हणे! जाताना तो माँ बाऊजींचा एक मोठा फोटो घेऊन गेला होता. त्या फोटोपुढे त्याची बायको रोज भक्तिभावाने धूप जाळत असावी, कारण रोज एका विशिष्ट वेळेला रुद्रप्रताप सिंह ठाकूर आणि मिसेस रुद्रप्रताप यांना जोरदार ठसका लागत असे. दोघांनाही धुपाची ऍलर्जी होती. दहाएक वर्षे तो ठसका सहन करून अखेर त्या दोघांनी डोळे मिटले. मोठ्या मुलाच्या कुटुंबाचा काहीच कॉन्टॅक्ट नसल्याने त्यांनी सगळी इस्टेट आपली मनोभावे सेवा करणाऱ्या बीजीच्या नावे केली.

मुले मोठी होऊन मार्गाला लागल्यावर बीजीने घरची इस्टेट वाढवण्यात लक्ष घातले. गावात असलेल्या एकुलत्या एक बँकेत पैसे मावेनात, इतकं प्रचंड उत्पन्न बीजीने सफरचंदाच्या एका बागेतून मिळवून दाखवलं. हे सारं होईपर्यंत बीजी पन्नाशीपलिकडे पोचली होती. तेव्हाच धाकट्या ठाकुरांचंही निधन झाल्याने बीजीच्या आयुष्यात मिड लाईफ क्रायसिस सुरू झाला. आणि सुरू झाली तिची कुणाच्याही नावे मृत्युपत्र उर्फ विल करायची सवय! दर दहा पंधरा दिवसांनी विल बदलायचा तिला छंद लागला. सुंदरनगरातल्या एकमेव वकिलाने बीजीने दर विलबदलाच्या वेळी दिलेल्या फीमधून प्रशस्त बंगला बांधला. नंतर गाडीसुद्धा घेतली.

… आता बीजी सत्तरी पार करून पंचाहत्तरीकडे निघाली होती. सगळ्या कामातून आता तिने निवृत्ती घेतली असली तरी विल बनवण्याचा छंद तसाच होता. दर दहा पंधरा दिवसांनी बीजी तिला आवडेल त्या व्यक्तीच्या नावे सारी इस्टेट करून ठेवत असे. बाकीच्या नातेवाईकांना आधी विलाबद्दल बरीच उत्सुकता असायची, पण ते रुटीन झाल्यावर त्यांनी त्याकडे लक्ष देणं सोडून दिलं होतं.

जानेवारीतली अशीच एक निवांत संध्याकाळ होती. बीजी अंगणात टीव्ही पाहत बसली होती. बंगल्यासमोरच्या प्रशस्त हिरवळीवर नुकतीच एक बंजाऱ्यांची टोळी येऊन उतरली होती. संध्याकाळी ते ‘बंजारा नॉनस्टॉप २४ धमाका गीते’ ही कॅसेट लावून त्यावर नाचाचा कार्यक्रम करत असत. तोच आत्ताही चालू होता. नाचता नाचता मुख्य बंजारा जोडीतल्या त्या हिरव्या डोळ्यांच्या मुलाने बीजीकडे कटाक्ष टाकला आणि योगायोगाने बीजीचेही लक्ष त्याच्याकडे गेले. बीजीला जबरदस्त धक्का बसला व तिने जग सोडले. बीजीच्या नातलगांना मात्र मुख्य धक्का त्यानंतर काही तासांनी बसला. जेव्हा त्यांना कळले की, बीजीचे लेटेस्ट विल आणि ते बनवणारा वकील दोघेही गायब आहेत. बीजीच्या नातलगांच्या पायाखालची वाळूच सरकली त्या बातमीने आणि सुरू झाला शोध..

बीजीच्या लेटेस्ट विलाचा!

नियमावली:
१) कथेचा शेवट अतिरंजित चालेल पण पटेल असा असावा
२) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
३) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
४) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परिचय करून देऊ नये.
५) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोळ्यांचे बदलते रंग, समुद्रसपाटीपासून 0 उंचीवर हिलस्टेशन तिथेच चहाचे मळे,तीन पोपट, जस्टिस चौधरी, लाईक्स, where there is a wil .. सगळंच मॅडगिरी अॅट इट्स बेस्ट Lol

त्यानंतर खूप खूप खूप वर्षे निघून गेली. बीजी, निळ्या डोळ्यांचे लोक, पोपट, असे सगळे जगातून गेल्याला खूपच काळ लोटला. दीपशिखाची खापरपणती सध्या टी शेप हवेलीची मालकीण होती. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या पोपटांच्या आणि निळ्या डोळ्यांच्या लोकांच्या गोष्टी तिने लहानपणापासून तिला सांभाळणाऱ्या दाईकडून ऐकल्या होत्या. आणि बीजीबद्दलही ऐकले होते. बीजीचे डोळे निळे होण्याआधी तिचे काढलेले एक चित्र टी शेप हवेलीच्या एका टोकाला असलेल्या पुरानी देवरीमध्ये ठेवले होते. तिथे लावलेले पांढरे पडदे वारा असो नसो सदैव उडत असत आणि अधूनमधून तिथे बर्फ पडत असे. पुरानी देवरी म्हणूनच सतत कुलूपबंद असे.

जानेवारीच महिन्यातली ती एक सकाळ होती. पिठल्याइतके दाट धुके पडले होते. सफरचंदाच्या बागेला पाणी देणारा नोकर रामू भराभर बागेकडे निघाला होता. वाटेत त्याला माळीकाका दिसले. 'ऑल मेन मस्ट सर्व, माळीकाका' त्याने टी शेप हवेलीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांना अभिवादन केले. 'ऑल मेन मस्ट सर्व... पोरा' त्यांनी अभिवादनाची परतफेड केली. 'आज पहाटेच बागेकडे?'
'होय, आज मला तिथे माझी लाडकी रामप्यारी भेटायला येणार आहे.' रामू लाजत म्हणाला.
'अरे वा... तरीच भर थंडीत निघालास की.. तुम्हांला थंडीचं के म्हणा.. गरम उसळतं रक्त तुमचं... मीही जेव्हा नौजवान होतो.. म्हणजे बघ.. पंचेचाळीस साल असेल. एकोणीसशे नव्हे.. अठराशे..' माळीकाकांची ही बडबड ऐकायला रामू अजिबात थांबला नव्हता. तो केव्हाच बागेकडे सटकला होता.

बागेमध्ये आज अशक्य सन्नाटा होता. रामुच्या मनात आले की गेटवरच्या पहारेकऱ्यांना सोबत बोलवावे पण रामप्यारीला किती ऑकवर्ड वाटेल, याचा विचार करून तो एकटाच निघाला. ठरल्या ठिकाणी जाऊन थांबला.

थोडा वेळ गेला. झाडामागे काही खसफस झाली. एक मुलगी तेथून चालत चालत येऊ लागली. धुके तर होतेच पण हिमवर्षावही सुरू झाला. एकदम गाणे ऐकू येऊ लागले,
'नीली नीली आंखे मेरी मैं क्या करू
गोरे गोरे गाल मेरे मैं क्या करू...'

आपले आवडते गाणे रामप्यारीला कसे कळले, असा विचार येऊन रामू आनंदित होत होता तोवर ती जवळ आली. ती रामप्यारी नव्हतीच. तिचे निळे डोळे चमकले. रामूचा भलामोठ्ठा पोपट झाला.

... त्यादिवशी कित्येक युगानंतर सुंदरनगरात पुन्हा पोपट दिसला. पण त्यादिवशीनंतर रामू कुणालाच दिसला नाही.

बापरे! Lol
पिठल्याइतके दाट धुके ही उपमा भारी आहे.

लोल श्र. यातले संदर्भ समजायला कालचा गॉट फायनल बघावा लागेल असे दिसते Happy

पण तोपर्यंत हे काही फन फॅक्ट्स

यातला माळीकाका व रामू यांच्यातला एक संवाद "मेकिंग ऑफ..." मधे आहे.
माळीकाका: "मीही जेव्हा नौजवान होतो.. म्हणजे बघ.. पंचेचाळीस साल असेल..."
रामू: "ओके (व्हॉटेव्हर). मी जातो..."
माळीकाका: "थांब. पंचेचाळीस म्हणजे एकोणीसशे"
इथे रामू वैतागून पण मुश्किलीने रेंगाळतो.
माळीकाका: "नाही थांब. एकोणीसशे नाही अठराशे"
रामू: "ओके" आणि जायला निघतो. त्याच्या डोक्यात रामप्यारी आहे
माळीकाका: "नाही नाही थांब. एकोणीसशेच, ते दुसरे महायुद्ध कधी होते?"
रामू आता वैतागून: "माळीकाका, You have to stop the Q tip when there is resistance!"

Lol

रच्याकने, गॉटचा कालचा फायनल एपिसोड बघायची गरज नाही. ह्याला s1e1 चा संदर्भ आहे. अचानकच हजारो वर्षांनी व्हाईट वॉकर उर्फ नीली आंखोवाले लोक परत दिसायला लागतात तो.

मादागस्कर मधली एक प्रसन्न संध्याकाळ. रुडी उर्फ रुद्र ज्युनिय क्र ४ च्या घरी मोठा समारंभ सुरु होता, रुडी म्हणजे बीजीचा थोरला रागावून गेलेला दीर वीरप्रताप याचा पणतू. वीरप्रताप ने बाउजींच्या नाववरूनच सर्व वंशजांची नावे ठेवण्याचा प्रघात पाडला होता. तर या रुडी च्या मुलीचे, दीना चे आज स्थानिक रेस्कोर्स चा मालक ड्रोगो शी लग्न होते. लग्नाला बरेच स्थानिक आणि परदेशी मान्यवर उपस्थित होते.
वधू वरांना आशीर्वाद आणि भेटवस्तू द्यायला रीघ लागली होती.
दीना कंटाळली होती. तेव्ढ्यात एक साधासा दिसणारा हिरव्या डोळ्यांचा माणुस आला आणि दीनाला अभिवादन करुन म्हणाला " न जाने कितने सावन बीत गये मगर आप तो आयी नही मोहतरमा! आज भी वो हवेली उसके असली वारीस की राह देख रही है. आप को आनाही होगा!" सगळ्या अफ्रिकन बोलणर्‍यांमधे हा आपली भाषा बोलणारा कुठून आला असे म्हणेपर्यन्त तिच्या हातात एक लहानशी पेटी देऊन तो माणूस आला तसा निघून पण गेला!
दीना चकित झाली होती पण तिला काहीतरी अंधूक अंधूक आठवूही लागलं होतं तिला! एक गाव, एक टी आकाराची हवेली. त्यातली ती खानदानी खोली, उडणारे पडदे, एक खानदानी खुर्ची, एक तसबीर , कुणा स्त्रीची .....आणि ती दचकून भानावर आली. घामाने तिचा चेहरा डबडबला होता.
लगेच ड्रोगो ने तिची विचारपूस केली, आपल्या रुमालाने तिचा घाम पुसला. आणि तिने हातात अजूनही घट्ट धरलेल्या पेटीची चौकशी केली.
दीनाने हळूच ती पेटी उघडली. आतले बबल रॅप चे पॅकिंग बाजूला केले, बघते तर काय! आत मधे होती ३ अंडी! पोपटाची!!!
त्या अंड्यांमधून "कितने सावन बीत गये मेरे प्यासे नैना तरस गये" असं गाणं फक्त दीनालाच ऐकू आलं . परत तिच्या मनात मघाची ती हवेली ची क्लिप रिप्ले झाली. यावेळी बरेच क्लियर दिसत होते सगळे, ती हवेली, ती खोली, खुर्ची, ती तसबीर, आणि त्या तसबिरीत .... ती स्वतः ??? कसं शक्य आहे ??? पण तसबिरीतली बई अगदी हुबेहुब दीनासारखी दिसत होती! फक्त -- फक्त एक फरक सोडून. तसबिरीतल्या बाईचे डोळे फोटोशॉप केल्यासारखे निळे होते!! दीना अति ताणाने तिथल्या तिथे चक्कर येऊन पडली. पण उठली तेव्हा तिने एक पक्के ठरवले! ती टी हवेली शोधून त्या तसबिरीतल्या बाईचे रहस्य समजून घ्यायचेच!

कितने सावन बीत गये मेरे प्यासे नैना तरस गये<<<<<
तरसला ऱ्हायमिंग म्हणून कितने सावन 'बरस' गये सुद्धा चालू शकेल.

रुडी म्हणजे बीजीचा थोरला रागावून गेलेला दीर वीरप्रताप याचा पणतू. >>> Lol तुंबाडच्या खोत फॅमिलीच्या वरताण फ्यामिली ड्रामा झाला आहे Happy

दीना अति ताणाने तिथल्या तिथे चक्कर येऊन पडली. पण उठली तेव्हा तिने एक पक्के ठरवले! >>> दीना ने मधल्या काळात एक नाट्यपूर्ण घटना मिस केली. तिला चक्कर आल्यावर एक हौशी डॉक्टर तेथे येउन तिची नाडी तपासून लगेच "मुबारक हो...." वगैरे सुरू झाले. पण दिग्दर्शक व लेखक तेथे वेळीच धावले व "कट" ओरडून त्या डॉक्टर ला "ही ती तसली चक्कर नाही" म्हणाले. संदर्भ: "मेकिंग ऑफ..."

आतले बबल रॅप चे पॅकिंग बाजूला केले, बघते तर काय! आत मधे होती ३ अंडी! पोपटाची!!!<<<<<
*असामी मोड ऑन*
तिने लगेच अंड्यांचे वेगवेगळ्या कोनातून फोटो काढून फेसबुकवर पोस्ट केले व त्याला लोकांचे लाईक आले.
*असामी मोड ऑफ*

एव्हाना कार्यक्रम सम्पला होता. दीना ने त्या ३ अन्ड्याना मैना बनून आईची ऊब दिली. अन्डी ऊबे पर्यंत तीने फकत "मौन" व्रत धारण केले होते. ड्रोगो साहेब भेटायला आले की फकत "मैना बोलूँगी..मैना बोलूँगी" गाणे म्हणने तीने पसन्त केले होते. काही दिवसान्मध्येच अन्डे फुटून त्यातून "नीले नीले अंबर पर" गाणे म्हनणारे पोपट-पिल्ले जन्माला आले. दीना कोणालाही ह्या दिवसान्मध्ये तिच्या खोलीत येऊ देत नव्हती. ड्रोगो साहेबानी नाराज़ होऊन रेस-कोर्स मधल्या घोड़याना स्वता: खरारा करणे चालू केले होते. एकंदरच भावी पती-पत्नीने प्राणी-सेवेमध्ये स्वत: ला "बीजी" केले होते.

पोपट-पिल्ले पेरू-ऐवजी पेर खात-खात मोठी होऊ लागली, तशी एक दिवस दीना ने खोली चे दार उघडले. "पन्छी बनू..उडती फिरू मस्त गगन में..." म्हणत फायनली उडायचा निर्णय घेतला. टी-हवेली ची तिकीटे बुक करन्याची आद्न्या येताच, तिच्या लॅपटॉप च्या माउस ने स्वत:च टिकेट बुक केले.

Pages