खेळ शब्दांचा १ - खाण्याचे पदार्थ

Submitted by संयोजक on 23 August, 2017 - 19:47

खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.

काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !

पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!

पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक क्लू - ती पहिल्या तीन अक्षरांनी जी वस्तू बनते, तीच वापरतात हा पदार्थ करताना, म्हणून तसं नाव पडलंय या पदार्थाचं.

नाही. मालवणसाईडचा पदार्थ आहे - तांदूळ्/नारळाचं दूध घालून करतात आणि वर सांगितलेत्या वस्तूवर भाजतात (पारंपरिक पद्धतीत).

उसळ

Pages