गणेशोत्सव २०१७ : श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 23 August, 2017 - 23:43

maayboli_Ganesh-2017-640.jpg

हिंदू परंपरा जीवनाभिमुख आणि सौंदर्योपासक आहे. तीत अर्थ आणि काम यांना धर्म आणि मोक्षाच्या बरोबरीने पुरुषार्थांत गणले गेले आहे. आपले सर्व देवदेवता अस्त्रशस्त्रांसोबतच 'गीतं वाद्यं च नृत्यं च' कलांतही निपुण आहेत. गणपतीतर चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिदेव! त्याच्या साजिर्‍या सुलक्षण नृत्यमग्न मूर्तीचं श्रीसमर्थ रामदासांनी दासबोधाच्या प्रथम दशकातील दुसर्‍या समासात केलेलं हे वर्णन स्वाती आंबोळे यांच्या आवाजात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Bappa Moraya!
Sundar distoy Bappa.
Audio clip chan jhaliye. Shant VaTala aikun.

गणपतीबाप्पा बाप्पा मोरया !
नानाकळा यांची आरास आणि मखर अप्रतिम.
स्वातीची ऑडिओ क्लिप पण सुरेख आणि सुरेल!!

धन्यवाद, मंडळी.
उत्सवात सेवेची संधी दिल्याबद्दल मंडळाचे आभार. Happy

उत्सवाची सुरुवात अगदी दणक्यात झालेली आहे - मूर्ती, सजावट, अनेकविध कल्पक उपक्रम - संयोजकांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. Happy

मस्त आहे अॉडियो क्लिप! किती सुंदर वर्णन केले आहे गणपतीचे! रामदासांनी लिहीलेली आपली 'सुखकर्ता दुःखहर्ता' पण किती गोड आहे! एकदम प्रसन्न वाटलं ऐकून Happy

स्वाती.. खुप सुंदर गायलंय तुम्ही... खरे तर तुमची क्लिप पहिल्यांदा ऐकली तेव्हा जे अंतर्बाह्य जाणवलं तेच आरासवर काम करतांना मनात भरुन होतं.... तोच मंगल आणि उदात्त अनुभव आरास बघतांना यावा असे फार वाटत होते.

आता क्लिप आणि आरास एकत्रच आल्याने धन्य धन्य वाटले खूप!

--- योगदानाची संधी दिल्याबद्दल संयोजक मंडळ आणि मायबोली प्रशासनाचे अनेक आभार!
--- शेवटच्या दिवशी "मेकिंग ऑफ आरास" येणारंय बरं का मंडळी!!

गणेश प्रतिष्ठापना , गणेश मूर्ती , गणेश स्तवन अगदी सुरेख जमून आलेय.
मूर्ती अगदी देखणी आणि सजावट देखील सुंदर.
स्वाती, सुरेल गायलं आहे तुम्ही .
||गणपती बाप्पा मोरया ||

मोरया!
सुंदर आरास आणि स्वातीच्या आवाजातले स्तवन पण सुंदर.
संयोजकांचे पण कौतुक!!

गणपती बाप्पा मोरया! स्वाती, गणेशस्तवन अतिशय सुंदर झाले आहे. आज संध्याकाळी आरती झाल्यावर घरच्या गणपतीलाही हा स्वराभिषेक करेन. Happy

विजया केळकर - वा! सुंदर !! घरी केली का तुम्ही ही मूर्ती ? फारच सुरेख. स्टेप बाय स्टेप फोटो असतील तर बघायला आवडतील.

छान आहे मूर्ती. क्लिप भारीच!
बाई,
श नी ष चा वेगळा नी स्पष्ट उच्चार करता येतो असे एकमेव माझे एक संस्कृत चे शिक्षक होते नी आता दुसऱ्या तुम्ही. लय भारी वाटलं ऐकून.

Pages