खेळ शब्दांचा १ - खाण्याचे पदार्थ

Submitted by संयोजक on 23 August, 2017 - 19:47

खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.

काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !

पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!

पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"शिकरण" चालेल Happy
पण माझ्या डोक्यात "सुधारस" होते Wink

पण माझ्या डोक्यात "सुधारस" होते>>>>>> जे तुमच्या डोक्यात होते तेच बरोबर सांगायचे ना?
एकदम सोप्पे झटपट असे क्लु देउ नये खरंतर. व्यक्तीसापेक्ष यु क्नो. Happy
एकदम सोपे म्हणल्यावर इथे माझ्या डोक्याचं शिकरण झालेलं विचार करुन Happy

भेळ

कुंदा

Pages