खेळ शब्दांचा १ - खाण्याचे पदार्थ

Submitted by संयोजक on 23 August, 2017 - 19:47

खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.

काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !

पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!

पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सस्मित, साले.

स्वैपाक करताना हा बसतो म्हणून तो खायचा?
तीन अक्षरी शब्द.

Chataka

ओह हो साले. Happy
मी तर कम्बखत वैगेरे विचार करत होते Lol

गोड निघालेलं ऑरेंज चालेल पण माझ्या मनात ते न्हवते Sad . पुढच्या वेळी एक अक्षर पण देईन म्हणजे गोंधळ नाही होणार.

किती इंग्रजी रंग माहिती?>> मला हा रंग कसा दिसतो हे माहीत नाही Lol
नाव ' असा मी असामी ' मुळे माहिती आहे फक्त! Lol

Pages