शेती बरोबरच वेळ जाण्यासाठी काय कामधंदा करावा?? काहीतरी सूचवा!!!!

Submitted by सिंथेटिक जिनियस on 23 August, 2017 - 07:54

मी शेती करतो व त्यावर माझ्यापुरता चरीतार्थ चालवतो.सातारा शहराजवळच आमचे शेत असल्याने मला शेतात राहवे लागत नाही.आठवड्यातून दोन तीन चकरा होतात तेव्हढेच.शेतात पुर्वी गहू ,ज्वारी,मका हे पीक वडील घेत होते.गहू ज्वारी घरी खायला व्हायची.पण आजकाल असल्या भुस्कट पिकाच्या फंदात कोणच पडत नसल्याने आम्हीही उस हेच पीक घेतो.उसाला एकदा पक्की बांधणी (लागणीनंतर चार पाच महीन्याने) झाल्यानंतर फक्त पाणी द्यायला लागते.त्यासाठी एक माणूस ठेवला आहे.
तर!!! मी आठवड्यातले पाच दिवस रिकामटेकडाच असतो.पुर्वि मित्र असायचे त्यांच्यामुळे वेळ जायचा .पण सातारा एमआय्डीसीचे बारा वाजल्याने बरेच मित्र पुण्यात व काही परदेशात आहेत.इंटरनेटचे मला खूप आकर्षण होते ,अजुनही आहे.सुरवातीला वेळ चांगला जायचा नेटमुळे पण सध्या माझा वेळ जाता जात नाही.घर खायला उठते.बाहेर बोंबलत कीति फिरनार ,मग नेटवर काही कुचाळक्या करणे,एकटाच ट्रेकला जाणे असले खर्चिक उद्योग करत बसतो.माझे हे उद्योग आता खिशावरही ताण टाकत आहेत.माझे दिवसाला दहा सिगरेटचे प्रमाणही जैसे थे आहेच.(यावर एक धागा काढला होता)
मला काम करायचे आहे ,असे काहीतरी काम ज्याने वेळ जाईल आणि बर्यापैकी पैसे मिळतील.व नवीन मित्र जोडता येतील.पण मला सोशल फोबीया आहे,म्हणजे मला कामाच्या ठीकाणी भीती वाटते,मुल्यांकनाची(performance anxiety)प्रचंड भीती वाटते.पण यावर ट्रीटमेंट चालू असल्याने यावर कंट्रोल आहे.माझे शिक्षण बीएस्सी इतके झाले आहे.वय तीस आहे.
तर काय करता येईल मला?
पब्लिक रिलेशन जॉब अर्थातच नकोय. असे कोणतेतरी काम मला सूचवा जेणेकरुन् महीण्यातले वीस बाविस दिवस बसून राहणे कमी होईल.व्यवसाय सूचवला तरी चालेल.धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या वड्डी गावात इवेन्ट ऑर्गनाइज करणे, बीयाणाची एजन्सी, काकवीची एजन्सी (??) असे सल्ले दिले तर मला कृपामयी इस्पितळ (येड्यांचा दवाखाना) मध्ये स्वत:च्या खर्चाने टाकतील.>> Lol

लहान असताना पुण्यात मंडईत गेलो होतो मामाबरोबर. तिथे उसाच्या कराव्या विकणाऱ्याला "कसा दिला टन" असं विचारलं होतं. तसे आहेत सल्ले इथे.

लहान असताना पुण्यात मंडईत गेलो होतो मामाबरोबर. तिथे उसाच्या कराव्या विकणाऱ्याला "कसा दिला टन" असं विचारलं होतं. तसे आहेत सल्ले इथे.
>>
Biggrin
पण तुम्ही कापडी पिशवी सोबत घेऊन गेला होतात का?

तुम्ही जो उस पिकवता त्याचे काय करता? म्हणजे स्वतः घरी खाता(क?) की बाहेर साखर कारखान्याना देता?>>>>>> एक एकर उस तोडायला दोनदिवस लागतात ,घरी खायला बाराशे वर्ष लागतील.
शहरी पब्लिकचे इग्नोरन्स समजू शकतो.
बियाण्यांची एजन्सी चालवायची असेल तर त्या स्पॉटला स्वतःचा किमान ३००चौ फू गाळा लागतो.माझा घास तेव्हढा नाही.
काकवी-ज्यांची गुर्हांळं आहेत तेच लॉसमध्ये किंवा लो मार्जिन आहेत.कारण गुर्हाळावर काम करायला मजुर मिळत नाही.
काकवीचे मार्केटींग होऊ शकते पण पुर्वीसारखी काकवी फेमस नाही.आणि आजकाल ज्वारीचीही काकवी आल्याने उसाची काकवी तेव्हढी चालत नाही.
असो,येऊ द्यात सल्ले.काहीतरी आय्डीया नक्कीच मिळेल.

सिंजी आधी तुम्हाला इंटरेस्ट/आवड कशात आहे ते सांगा किंवा स्वत: पडताळून पहा..म्हणजे त्या अनुशंगाने डिसिजन घेता येईल ...

सिंजी, लहान मुलांचे संस्कारवर्ग घ्या. मनाचे श्लोक, तुक्याचे अभंग यांतून येणार्या भावी पिढ्यांचं प्रबोधन होऊन समाजकार्यही घडेल आणि त्यांच्या पालकांशी नियमितपणे चर्चा करून आपला सोशल फोबिया दुर होण्यास मदत होईल आणि लहान मुलांत मिसळायचंय म्हणून आपलं सिगारेटचं वेडही कमीकमी होत जाईल.

Pages