Submitted by अनन्त्_यात्री on 23 August, 2017 - 01:36
मग निळ्या दरीतुन हाक
येताच काफिला उठला
नक्षत्रजडित रात्रीला
हुंदका अनावर फुटला
त्या निळ्या दरीच्या गर्भी
घननीळ गूढसे काही
नि:शब्द काफिला भोगी
ती पिठुर रानभुल देही
रिमझिमत्या निळसर रात्री
गारूड निळेसे भिनले
की स्वप्न निळावन्तीचे
मी माझ्यावर पांघरले
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुरेख खूप भावले !
सुरेख खूप भावले !
ओ हो हो.....
ओ हो हो.....
अफाट.....
_____/\____
मस्त!
मस्त!
गुढरम्य!!
गुढरम्य!!
साळुंकेजी, प्रतिसादाबद्दल
साळुंकेजी, प्रतिसादाबद्दल आभार !
निलकमल्.. छान... आवडली
निलकमल्.. छान... आवडली
शशांक, आपल्या उत्स्फूर्त
शशांक, आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!
रावी, प्रतिसादाबद्दल आभार!
रावी, प्रतिसादाबद्दल आभार!
राजेंद्र देवी, प्रतिसादाबद्दल
राजेंद्र देवी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
राहुल, कवितेतील गूढरम्यता
राहुल, कवितेतील गूढरम्यता ओळखणार्या आपल्या प्रतिसादाबद्दल आभार!