चक्रव्युहात हरवलय स्वतःला आपण

Submitted by निखिल झिंगाडे on 27 July, 2017 - 11:43

चक्रव्युहात हरवलय स्वतःला आपण
शोधत बसतो मग का देवाला आपण

आनंदाने जगण्याची गंमतच निराळी
उगाच करतो तमाशा कशाला आपण

पसरताना हात कर पुनर्विचार एकदा
लाचारी का बाळगायची उशाला आपण

जमत नसेल तर नको देऊस वचन
तोडायचे का उगाच भरवशाला आपण

किती काळ जगायचे किड्यामुंग्यासारखे
चल घालूया गवसणी आकाशाला आपण

Group content visibility: 
Use group defaults

छान !