भटकंती पुरेपुर @ कोल्हापूर

Submitted by जिप्सी on 12 June, 2017 - 12:49

 खिद्रापूर
महाराष्ट्रातील खजुराहो अशी ओळख होईल इतके सुंदर आणि अप्रतिम मंदिर म्हणजेच खिद्रापुर येथील कोपेश्वर मंदिर. कोल्हापुर जिल्ह्यापासुन साधारण ६५ किमी अंतरावर कृष्णा नदीच्या काठी वसलेले खिद्रापुरचे कोपेश्वर मंदीर हे स्थापत्य रचनेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. इथल्या महादेवाचे नाव कोपेश्वर. अर्थातच रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला महादेव कोपेश्वर. मग साहजिकच त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे. ते काम श्री विष्णूनी केले त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. या मंदिराचे खरे सौंदर्य त्याच्या रचनेत आहे. छोटय़ाशा दरवाजातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश झाल्यावर समोर कित्येक शतकांचा इतिहास उलगडत जातो. देवळाबाहेर ४८ खांबांवर तोललेला एक मंडप आहे.या मंडपाला छत नाही. संपूर्ण वर्तुळाकार जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आली आहे. या मंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. त्यामुळे होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५
 नरसोबाची वाडी
नृसिंहवाडी (पर्यायी नावे: नरसोबावाडी/नृसिंहवाडी) हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील गाव. कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली मंदिर आहे. मंदिरातच नृसिंह सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. वाडीहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत. म्हणून त्याची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात.

प्रचि ०६
 कृष्णाकाठचा सूर्योदय
प्रचि ०७
 श्री महालक्ष्मी मंदिर
प्रचि ०८
 पंचगंगा नदीकाठ
प्रचि ०९
 छत्रपती शाहू महाराजांचा राजवाडा व वस्तुसंग्रहालय
प्रचि १०

प्रचि ११
 भवानी मंडप
प्रचि १२

प्रचि १३
 ज्योतिबाच्या नावानं चांगभल
प्रचि १४

प्रचि १५
 रंकाळा
प्रचि १६

प्रचि १७
 सिद्धगिरी म्युझियम, कणेरी मठ
कोल्हापूरहुन साधारण १५ किमी अंतरावर सिद्धगिरी म्युझियम, कणेरी मठ आहे. सदर म्युझियम तीन विभागात विभागले असुन पहिल्या विभागात प्राचीन भारतातील ऋषी व त्यांचे योगदान, दुस-या भागात ग्रामीण भागातील बारा बलुतेदारी, शेतकऱ्यांचे जीवन, विविध पारंपरिक खेळ, जुन्या पद्धतीची घरे अशा ग्रामीण संस्कृती व तिसर्‍या भागात भारतातील स्वातंत्र्यसैनिक इ. शिल्परूपात मांडले आहे.
(सिद्धगिरी म्युझियम मध्ये फोटोग्राफीला बंदी आहे. सदर फोटो आम्ही मठात रीतसर पत्र देऊन, परवानगी घेऊन काढले आहेत.)

भारतातील ऋषी व त्यांचे योगदान
प्रचि १९
 गावातील पाणवठा आणि गावकरी
प्रचि २०
 सासरी निघालेली लेक
प्रचि २१
 गावातील जत्रा
प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
 पन्हाळा

पन्हाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तसेच पन्हाळा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य गाव आहे.सध्या पन्हाळा हे एक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. पन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महत्त्वाचा किल्ला आहे. पन्हाळ्याला पर्णालदुर्ग देखील म्हणतात. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला.
प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

Group content visibility: 
Use group defaults

Pages