"कुत्ते कमीने.....!"

Submitted by निर्झरा on 16 August, 2017 - 03:24

"कुत्ते....... कमीने......!"
काय? शीर्षक वाचून धर्मेंद्रची आठवण झाली ना. पण थांबा, हा धर्मेंद्रचा डायलॉग नसून हे एका नाटकाचे नाव आहे. कालच याचा पहिला प्रयोग पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यरगृहात झाला.
नाटकातील पात्र :- सुचित्रा बांदेकर, सागर देशमुख (वाय झेड चित्रपट फेम), पुष्कराज चिरपुट्कर (दिल दोस्ती फेम) आणि विद्याधर जोशी
लेखक- डॉ. विवेक बेळे.
दिग्दर्शन - चन्द्रकांत कुलकर्णी.
तर.... सर्वांनी बघाव अस हे नाटक. खास करून युवा पिढी आणि पालक यांनी एकत्र बघाव अस हे नाटक आहे. विषय खरं तर वेगळा नाहीये. आपला नेहमीचाच, पालक आणि घरात असणार एकच किशोर वयीन मुल आजच्या पिढितल. ज्यांना फोन, ईंटरनेट तसेच सगळ्या सुखसोई आयत्या मिळतात अशा प्रत्येक घरातील मुलांवर आणि पालकांवर भाष्य करणारा विषय.
नाटक वर्तमान-भूत-वर्तमान अशा काळात घडत. एक एक विचार करायला लावणारे सीन, प्रत्येकानी केलेला सशक्त अभिनय यामुळे नाटक एका उंचीवर जाऊन पोहोचते. नेमक काय दाखवलयं हे ईथे मी मुद्दमच लिहित नाही कारण इथे वाचण्यापेक्षा ते रंगमंचावर बघण्यातच मजा आहे. कारण सागर देशमुखने केलेली कुत्र्याची भुमिका ईथे वाचून कळणार नाही. ती भुमिका अतिशय छान झाली आहे. कुठेही हा मनुष्य आहे अस वाटत नाही. त्याच्या कडे आपण एक कुत्रा म्हणूनच बघत बसतो नाटक भर. कुत्र्याच्या असणार्‍या एक एक लकबी खुप सुंदर आणि सहज पणे त्याच्या अभिनयातून दिसून येतात. केवळ 'बनी' या पात्रालाच कळणारी त्याची भाषा आणि त्या मुळे घडणारे किस्से बघायला फार मजा येते.
पुष्कराजने सुद्धा किशोरवयीन मुलची भुमिका छान पार पाडली.
सुचित्रा आणि विद्याधर जोशी यांनी पण आई आणि वडीलांची भुमिका अगदी चोख पार पाडली आहे.
नाटकाचा शेवट आपल्याला आपल्या बर्‍याच प्रश्नांची उत्तर देऊन जातो.
त्यामुळे नक्की बघा 'कुत्ते कमीने!'

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users