नशिबवान

Submitted by अंकि on 29 July, 2017 - 06:14

नमस्कार मायबोलीकर,
मी मायबोलीवर नवीन असून हा माझा लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे. आपल्याकडून प्रतिसादांची अपेक्षा आहे. कथा आवडली नाही तरी कृपया मनमोकळेपणाने कळवावे.
**********************************************************************************************************
“अरे तू प्लीज ऐकून तर घे ना. खरच अस काहीच नाहीये रे. तुझा गैरसमज होतोय. माझ खरच फक्त तुझ्यावर प्रेम आहे. त्याला मी नीट ओळखतही नाही.” दिप्ती निशांतला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती. एकीकडे रडतही होती. कारण ज्याच्यावर तिने मनापासून प्रेम केलं तो तिचा निशांत तिच्यावर विश्वासघाताचा आरोप करत होता. तीचे काहीही ऐकून न घेता तो तिला तिथे एकटीला सोडून निघून गेला. कसेबसे स्वतःला सावरत दिप्ती घरी आली. आपल्या खोलीत बसून रडताना नकळत तीचे मन तिला एक वर्ष मागे घेऊन गेले.

दिप्ती, एक सुंदर, सुस्वभावी, हसरी मुलगी. तिचे हसणे बघून कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशीच होती ती. डिप्लोमा च्या पहिल्या वर्षात असताना तिच्या जीवनात निशांत चा प्रवेश झाला. दिप्ती कॉलेजला जाण्यासाठी ज्या बसने प्रवास करायची त्याच बसने तोही ऑफिसला जाण्यासाठी प्रवास करायचा. असेच एका प्रवासात त्यांची ओळख झाली. आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. भेटीगाठीही वाढू लागल्या. लवकरच त्यांनी एकमेकांकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली. दिप्ती खूप खुश होती. आपण ज्याच्यावर प्रेम करतो तोही आपल्यावर प्रेम करतो याच आनंदात ती होती. खरेतर निशांत तिच्यापेक्षा बराच मोठा होता. तसेच स्वभावाने खूपच लहरी होता. त्याच्या या स्वभावाची तिलाही जाणीव होती. पण म्हणतात ना प्रेम आंधळे असते. तसेच काहीसे तिचे झाले होते.

नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे सुरुवातीचे काही महिने खरच खूप सुखद होते. आपल्या प्रियकरासोबत फिरताना दिप्तीला वेळेचे भान राहत नसे. आता मात्र निशांतचा खरा स्वभाव आता आपले रंग दाखवू लागला. छोट्या छोट्या गोष्टींवरून तो दिप्तीशी वाद घालू लागला. त्यातच तीचे आई वडील तिच्या लग्नासाठी स्थळ शोधत होते. दिप्तीला या सर्व गोष्टींचा खूपच त्रास होत होता. या तणावामुळे अभ्यास न झाल्याने दिप्तीला डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात ड्रॉपही लागला. परंतू तरीही दिप्तीने समजुतीने घेत परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. निशांतवरील प्रेमापोटी ती त्याचे सर्व बोलणे ऐकून घेत असे. त्याला समजावून सांगत असे. तिने समजावल्यावर तो थोडे दिवस शांत होत असे, पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या. हल्ली तर तो तिच्यावर संशय घेऊ लागला होता. त्यावरून त्यांचे प्रत्येक भेटीत वाद होऊ लागले होते.

आजही तेच झाले होते. बसस्थानकावर निशांतने दिप्तीला एका मुलाशी बोलताना पाहिले. खरेतर तो तिच्या एका मैत्रिणीचा भाऊ होता. मात्र त्यांची फार अशी ओळख नव्हती. पण तो मैत्रिणीचा भाऊ असल्याने ती त्याच्याशी बोलत होती. पण हे सर्व माहित नसल्याने निशांत च्या मनातील संशय उफाळून आला आणि त्याने पुन्हा तिच्याशी भांडण केले. आणि तिला एकटीला ठेऊन निघून गेला होता. दरवेळी भांडण होऊनही समजुतीने घेणाऱ्या दिप्तीला यावेळी मात्र ते सहन झाले नाही. विचार करता करताच ती उठली. घरातील अडगळीच्या खोलीत ठेवलेली कीटकनाशक औषधाची बाटली तिने उचलली झाकण उघडून तोंडाला लावली. तिने थोडेसे औषध प्यायले तेवढ्यात तिचा भाऊ मितेश तेथे आला. त्याने हा प्रकार पाहून तिच्या हातातील कीटकनाशकाची बाटली खेचून घेऊन फेकून दिली. पण तोपर्यंत दिप्ती बेशुद्ध झाली होती. तिच्या तोंडातून फेस येऊ लागला होता. मितेशने आरडाओरडा करून घरातल्यांना बोलावले व दिप्तीला दवाखान्यात नेले.

५-६ तासांनी शुद्धीवर आलेल्या दिप्तीला घरातील सर्वजण असे करण्याचे कारण विचारात होते. पण ती काहीच बोलली नाही. २ दिवसांनी दवाखान्यातून घरी आल्यावर मात्र तिने आईला विश्वासात घेऊन सर्व काही सांगून टाकले. तिच्या घरातल्यांनीही तिला समजून घेत तिला सावरण्यास मदत केली. सर्वांनी मिळून तिला समजावले कि आता तिने निशांतचा विचार मनातून काढून टाकावा. पण ती निशांतला विसरू शकत नव्हती.

शेवटी नको तेच झाले. निशांतने अनेकदा तिची माफी मागितल्यावर तिने त्याला माफ केले. आई-वडील, भाऊ-बहिण तसेच मैत्रीणींनी समजावून देखील काहीच फायदा झाला नाही. निशांत आता चांगले वागत असल्याने दिप्तीही सर्व विसरुन गेली. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. थोड्या दिवसांतच निशांत पूर्वीसारखा वागू लागला. तिच्याशी वाद घालू लागला. त्यातच त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारी एक मुलगी त्याला आवडायला लागली. त्यामुळे तो आता दिप्तीला टाळू लागला. हळूहळू ही गोष्ट दिप्तीच्या लक्षात आली. त्याबाबत तिने निशांतला जाब विचारला असता त्याने निर्लज्जपणे त्याच्या ऑफिसमधील प्रेयसीबद्दल सांगून टाकले. वर तो असेही म्हणाला की आता त्याला दिप्तीची काही गरज नसून तिने त्याच्या आयुष्यातून निघून जावे.

या सर्व प्रकाराने दिप्तीला खूप मनस्ताप झाला. पण यावेळी मात्र तिने उन्मळून न पडता खंबीर व्हायचे ठरवले. निशांतला मनातून काढून टाकत तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. आपले पहिल्या वर्षात राहिलेले सर्व विषय सोडविण्यासाठी तिने झटून अभ्यास केला. आणि त्यात ती यशस्वीही झाली. त्यानंतरच्या काळातही तसाच अभ्यास करत तिने शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण होताच तिला एक चांगल्या पगाराची नोकरी मिळाली.

अधूनमधून निशांतची आठवण येत असली तरीही तिने त्याकडे दुर्लक्ष करत स्वतःला सावरले होते. अशातच एके दिवशी अभिषेक तिच्या आयुष्यात आला आणि तिचे जीवन पूर्णपणे बदलून गेले. अभिषेक एक खूप चांगला मुलगा होता. तो नेहमीच दिप्तीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत असे. दिप्तीनेही त्याच्यापासून काहीही न लपवता त्याला निशांतबद्दल सर्व काही सांगितले होते. ती आता अगदी मोकळेपणाने अभिषेकशी बोलत असे.

एके दिवशी अभिषेकला भेटल्यावर तो नेहमीसारखा उत्साही, हसरा न दिसता थोडा तणावाखाली असल्यासारखा दिसत होता. त्याबद्दल दिप्तीने विचारले असता त्याने थोड अडखळत त्याचे तिच्यावर प्रेम असल्याचे सांगत तिला लग्नाची मागणी घातली. तेव्हा दिप्तीनेही थोडा विचार करत त्याला घरी येऊन घरच्यांना भेटण्यास सांगितले.

अभिषेकसारखा समजूतदार मुलगा असल्याने दिप्तीचे आई-वडील या लग्नास लगेच तयार झाले. परंतू अभिषेकच्या घरी मात्र थोडा विरोध झाला. पण अभिषेकने आपल्या घरच्यांना समजावून लग्नासाठी परवानगी मिळवली. आणि दिप्ती अभिषेकचे लग्न झाले. दिप्तीनेही मग आपल्या मनमिळाऊ स्वभावाने सासरच्या सर्वांची माने लवकरच जिंकून घेतली. अभिषेक सारखा पती मिळाल्याने ती स्वतःला नशीबवान समजत होती.

३ वर्षांनी आपल्या दीड वर्षांच्या छकुलीशी खेळताना ती विचार करत होती कि, “खरच जर मी तेव्हा रडत बसले असते तर......... ?”
समाप्त.
****************************************************************************************************************
त.टी. :- शुद्धलेखनाच्या चुका असल्यास सांभाळून घ्यावे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलिये कथा...
मस्त ... आवडलं तुमचं लिखाण...लिहित रहा..
पु.ले.शु. ... Happy

मस्त पॉझिटिव्ह कथानक
सर्व विचार छान मांडलेत
अळवावरील दव बिंदु कितीही प्रयत्न केले तरी निसटणारच हे सत्य नेमके त्या अल्लड वयात कित्येकांच्या ध्यानात येतच नाही. त्यातून सावरून आयुष्यात उचित प्रगति साधल्यास पुढील प्रपंच सर्वार्थाने सुखकर होतो हेच खरे

पुलेशु

छान लिहिलेय.

पण डिप्लोमाच्या पहिल्या वर्षालाच मुलींना त्यांच्या घरचे स्थळे शोधू लागले तर डिप्लोमाच्या मुलांचे फार अवघड होईल Happy

@ ऋन्मेषजी

तुमचे म्हणणे नक्कीच योग्य आहे. पण मुलींनी १२ वी करुन डिप्लोमाला प्रवेश घेतल्यास हे शक्य आहे. तसेही आजच्या काळात मुलीच लग्न लवकर करावे ही मानसिकता बदलली असली तरीही कुटुंबात १ पेक्षा जास्त मुली असल्यास पहिल्या मुलीचे लग्न लवकर उरकण्याकडे पालकांचा कल जास्त दिसून येतो.