आई

Submitted by अक्षय. on 28 December, 2016 - 06:51

आई
जिचं प्रेम मोजता येत नाही ती आई...
उगवत्या सूर्याची तेज आई...
काटेरी वनातल नाजूक फुल आई...
पावसाळ्यातली छत्री, थंडीतली शाल,
उन्हाळ्यातली सावली जिच्या पदरात
आहे ती आई पहिला श्वास म्हणजे आई...
आयुष्याच्या पुस्तकातील पहिले पान आई...
घरातल्या घरात गजबजलेल गाव आई...
घराचा पाया, मंदिरातील देव आई...
समईतून उजेड देणारा धागा आई...
मायेचा फटका, जेवणातल मीठ आई...
प्रश्नाला पडलेले उत्तर आई...
बहिर्याचे कान लंगड्याचा पाय
वासराची गाय तशी लेकराची माय आई...
सरतही नाही आणि पुरतही नाही अशी
जन्माची शिदोरी आई...
कवितेची ओळ, गाण्याची चाल आई...
आयुष्याच्या मुव्हीची डायरेक्टर आई...
जिवंतपणी दिसनारं देवाच रूप आई
आत्मा आणि ईश्वर यांचा मिलन आई...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयुष्याच्या मुव्हीची डायरेक्टर आई...

ही एक लाईन सोडली तर बाकी कविता खूप अप्रतिम वाटतेय.. माफ करा माझं वैयक्तिक मत..

दादू , च्रप्स, सायू, राहुल धन्यवाद
च्रप्स एक ओळ नाही आवडली त्यापेक्षा बाकी ओळी आवडल्या ह्याचा आनंद जास्त आहे Happy