मरणाची थंडी पडली हुती. म्या श्याल गुंडाळून चौकीवर गेलो. इनस्पेक्टरला म्हणलं मर्डर झालाय लवणावर. मग त्यनं गाडी काढली. फटफटी. दोघंच निघालो लवणावर. लय रात झालती. त्यो म्हणला, फुकणीच्या कुठं झालाय मर्डर?
म्या म्हणलो, फुलाच्या खाली.
मग त्याला घेऊन खाली गेलो. एक बाई पडली हुती तिथं नागडी. म्या ब्याटरी मारून त्यला दाखवलं. बघ म्हणलं.
त्यो म्हणला, रेप झाला का हिच्यावर?
म्हणलं, कुणाला म्हाईत.
त्यो म्हणला, तुला कसं कळलं?
म्या म्हणलं, लिंबं आणायला गेलतो. ही दिसली फुलाखाली जाताना. बघितलं तर ह्ये आसं.
मग त्यानं ब्याटरी मारून नीट तिला बघितली. टकुरं फुटलं हुतं. नुसतं रगात. म्हटलं, दादा, तुला भ्याव वाटत न्हाय का?
त्यो म्हणला, जिंदगी गीली ह्यात. आता कसलं आलंय भ्याव.
म्या म्हनलं, बरूबर.
त्यो म्हणला, लफड्याची केस दिसतीय. पण ही इथं आलीच कशी. हीची कापडंबी कुटं दिसत न्हायीत.
म्या म्हनलं, लय झाडवान हाय हीत. पडली आसतील सांदीत.
त्यो म्हणला, मला अजून कळ्ळं न्हाय. तुला ह्ये कळलंच कसं. जरा नीट सांग.
म्हणलं, सांगितलं की. खाली येताना दिसली. यीऊन बघितलं तर ह्ये आसं.
त्यो म्हणला, आजून कोण कोण हुतं इथं?
म्हणलं, कुणाला म्हाईत.
त्यो म्हणला, फुकणीच्या मला गंडवतो का?
म्या म्हनलं, काय झालं?
त्याच्या हातात एक मोठं लांबडं दांडकं हुतं. काय कळायच्या आत त्यनं माज्या पाठीवर हाणलं.
लय पाऊस पडत हुता. येवढ्या दुपारचंपण समदं काळवंडल्यावन झालं हुतं. समदं आंग ना आंग भिजलं हुतं. ह्या भागात नुसतं डुंगूरच डुंगर. एक घर कुटं म्हणून दिसना. शेवटाला एक झोपडं दिसलं. म्हाता-म्हातारी दोघंबी शेकत बसली हुती.
म्या घरात शिरलू. म्हणलू, लय पाऊस पडतूय गड्या.
म्हातारं म्हणलं, कुटनं आलाव?
म्या म्हनलं, गाडी बंद पडलीय. इंजनात पाणी गेलंय.
म्हातारं मनलं, जारं किस्न्या, बघून यं.
तसं भिताडाच्या कडंला झोपलेला उघडाबंबू काळा माणूस जागा झाला.
म्या म्हणलं, येवढ्याश्या घरात लय माणसं ऱ्हात्यात गड्या.
किस्नानं सायकल काढली. म्हणला कुटं पडली गाडी बंद.
म्हणलं, ही काय हितंच लवणावर.
तिथं गेल्यावर तो म्हणला, नवीन दिसतीय फटफटी. बघू च्यावी.
म्या म्हणलं, फुलाच्या खाली पडली का काय, या. हुडकू.
मग त्यो मुकाट्यानं खाली चालत आला. चिखुल नुसता. झाडी गवात मायंदाळं.
फुलाखाली आल्यावर तिथं एक पोलिस दिसला मरून पडलेला. आन त्येचा जवळंच एक नागडी बाई. पार टकुरं फुटलेलं.
किस्नाची दातखिळीच बसली. पार ततपप कराय लागला.
म्या म्हणलं, मर्डर झालेला दिसतूय. आपुन लगीच पुलिसांना कळवू.
त्यो म्हणला, पण ह्ये झालंच कसं?
म्या म्हणलं, कुणाला म्हाईत.
मरणाचा पाऊस पडत हुता. आन त्या झोपड्यात म्हाता-म्हातारी शेकत बसली हुती. सायकलवर टांग टाकून मी कुडकुडत तिकडं निघालो.
जबरी ! जव्हेरगंज इज ब्याक .
जबरी !
जव्हेरगंज इज ब्याक .
फ्यूज नाव का दिलं असावं याचा
फ्यूज नाव का दिलं असावं याचा विचार करतेय...
भौतेक त्याचा फ्युज उडत असतो
भौतेक त्याचा फ्युज उडत असतो म्हणुन.
मरणाचं भारी लिहिलंय...
मरणाचं भारी लिहिलंय...
मरणाचा पाऊस पडत हुता. आन त्या झोपड्यात म्हाता-म्हातारी शेकत बसली हुती. >>>> +१११
जबरी !
जबरी !
जव्हेरगंज इज ब्याक .>>>>+ 1
भारी... मजा आली वाचायला
भारी... मजा आली वाचायला
बर्याच दिवसांनी आलात. जोरदार!
बर्याच दिवसांनी आलात. जोरदार!
जवहेरगंज इस बेक... मस्त कथा !
जवहेरगंज इस बेक... मस्त कथा !!
वाह् जव्हेरगंज। इतक्या
वाह् जव्हेरगंज। इतक्या दिवसांनी पाहून आनंद झाला!
फस्सकलास.
फस्सकलास.
तुमचं नाव वाचून लगेच धागा उघडला त्याचं सार्थक झालं.
अरे वा, खुप दिवसांनी! कथा
अरे वा, खुप दिवसांनी! कथा आवडली.
तुमचं नाव वाचून लगेच धागा
तुमचं नाव वाचून लगेच धागा उघडला त्याचं सार्थक झालं.>>१११+++
जबरदस्त लिहिलय
फस्सकलास.
फस्सकलास.
तुमचं नाव वाचून लगेच धागा उघडला त्याचं सार्थक झालं>>>+११११११११११
मस्तच.....
मस्तच.....
मरणाची थंडी पडली हुती.........
मस्त
मस्त
बेस्ट...
बेस्ट...
sorry ,pan samjli nahi..konin
sorry ,pan samjli nahi..konin samjavel ka?
@ किल्ली. परत वाचा. कळेलच.
@ किल्ली. परत वाचा. कळेलच.
व्वा !, मस्तच.म्या म्हणलं,
व्वा !, मस्तच.
म्या म्हणलं, मर्डर झालेला दिसतूय. आपुन लगीच पुलिसांना कळवू.
त्यो म्हणला, पण ह्ये झालंच कसं?
म्या म्हणलं, कुणाला म्हाईत.
वाह!!
वाह!!
सॉरी, पण मलाही समजली नाही.
सॉरी, पण मलाही समजली नाही. दोन वेळा वाचून पण समजली नाही.
सेम हियर अंकी..... जरा उसकटून
सेम हियर अंकी..... जरा उसकटून सांगता का?
मस्तच....
मस्तच....
छान आहे पण खूप प्रेडिक्टेबल
छान आहे पण खूप प्रेडिक्टेबल वाटली.
अंकी, गुब, जो गोष्ट सांगतोय त्यानेच सगळे खून केलेत. आधी बाई, मग पोलिसाला आणले, तो जास्त टीवटीव करू लागला तेव्हा त्याला गप्प केले, नंतर सायकलवला. आता म्हातारा म्हातारीचे काय होतंय हे ते काय प्रकारची प्रतिक्रिया देतात त्यावर आहे.
खासच!
खासच! पण नावाचा संदर्भ लागला नाही...
ह्ये झालंच कसं हा प्रश्न ऐकला
ह्ये झालंच कसं हा प्रश्न ऐकला की आपला फ्युजच उडतो..
बर्याच दिवसांनी आलात. जोरदार!
बर्याच दिवसांनी आलात. जोरदार!
सही !!!!!
सही !!!!!
धन्स साधना.....
धन्स साधना.....
जव्हेरगंज इज ब्याक>>> >+१
जव्हेरगंज इज ब्याक>>> >+१
जबरी नेहमीप्रमाणेच. आणि मला पहिल्याच वाचनात कळली आज
Pages